MPSC Science Questions and Answers in Marathi
MPSC Science Questions and Answers in Marathi: विज्ञान या विषयावर एमपीएससी परीक्षा मध्ये भरपूर प्रश्न विचारले जातात म्हणूनच या लेखात मी हिमानी म्हात्रे तुमच्या साठी घेऊन आले आहे विज्ञानासंबंधी आता पर्यंत झालेल्या MPSC परीक्षेमध्ये विचारले गेलेले महत्वाचे प्रश्न.
1. खालीलपैकी कोणकोणती संयुगे आपण दैनंदिन व्यवहारात वापरतो?
(१) सोडिअम क्लोराइड
(२) सोडिअम कार्बोनेट
(३) कॅल्शिअम सल्फेट
(४) सोडिअम-बाय-कार्बोनेट
(५) पोटॅशिअम परमँगनेट
(६) अमोनिअम नायट्रेट
(अ) फक्त १ व ६
(ब) फक्त २, ३, ५ व ६
(क) फक्त १, २ व ४
(ड) फक्त १, ४, ५, ६ व 6
2. प्लॅटिनम आणि सोने या धातूंना राजधातू म्हणतात कारण….
(अ) हे धातू निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात.
(ब) या धातूंवर हवा, पाणी, आम्ल, उष्णता यांचा परिणाम होत नाही.
(क) पूर्वी राजे-महाराजे यांचा वापर करीत असत.
(ड) यांचा वापर मुख्यतः अलंकार बनविण्यासाठी केला जातो.
3. खालीलपैकी कोणते विधान खरे नाही?
(अ) पदार्थाचे द्रवणांक व उत्कलनांक निश्चित असतात.
(ब) इथेनॉल व पाणी यांच्या उत्कलनांकात २० डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक फरक असल्यामुळे पाण्या- पासून इथेनॉल वेगळे करण्यासाठी प्रभाजी उर्ध्व- पातन ही प्रक्रिया प्रभावी ठरते.
(क) तेल विहिरीतून मिळालेल्या खनिजतेलात पेट्रोल, नॅप्था, केरोसीन, डिझेल इत्यादी घटक असतात.
(ड) खनिज तेल तापविल्यानंतर सर्वांत अगोदर त्यातील केरोसीन वेगळे होते.
4. जनावरांना तोंडाचे आणि पायाचे रोग मुख्यतः …… मुळे होतात.
(अ) जीवाणू (Bacteria)
(ब) विषाणू (Virus)
(क) कवक (Fungi)
(ड) बुरशी (Mould)
5. पाण्याचा जडपणा कायमचा कसा घालविला जातो?
(अ) सोडा टाकून
(ब) ऊर्ध्वपातन क्रियेने
(क) उकळून
(ड) गाळून
6. मानवी शरीरात यकृताचे कार्य काय?
(अ) अन्नपचनास मदत.
(ब) ग्लुकोजचा साठा करणे.
(क) पाचकरस तयार करणे.
(ड) रक्त शुद्ध करणे.
7. झाडाचे वय कशावरून ठरवितात ?
(अ) पानांची संख्या
(ब) झाडाच्या खोडावरील वर्तुळे
(क) पानांचा रंग
(ड) झाडाची उंची
8. हायड्रोजन सल्फाइड हा वायू खालीलपैकी कशात आढळतो?
(१) कच्च्या खनिजतेलात
(२) कोळशाच्या खाणीत
(३) नैसर्गिक वायूत
(४) वातावरणात
(५) ज्वालामुखीत
(६) दलदलीच्या प्रदेशात
(अ) १ ते ६ सर्व
(ब) फक्त २, ३, ५ व ६
(क) फक्त १, ३, ५ व ६
(ड) फक्त ५ व ६
9. केवळ विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांची नावे असलेला संच खालीलपैकी कोणता ?
(अ) गोवर, उपदंश, रेबिज, कॉलरा
(ब) पोलिओ, उपदंश, कांजिण्या, गलगंड
(क) गोवर, देवी, गलगंड, रेबिज
(ड) कॉलरा, क्षयरोग, मस्तिष्कावरण, उपदंश
10. सद्य:स्थितीत ‘एलईडी’ विजेचे दिवे ‘सीएफएल’ दिव्यांपेक्षा चांगले आहेत. याचे मुख्य कारण…..
(१) ते ‘सीएफएल’ दिव्यांपेक्षा जास्त प्रकाश देतात.
(२) वे ‘सीएफएल’ दिव्यांपेक्षा पाच ते सहापट जास्त काळ टिकतात.
(३) ते ‘सीएफएल’ दिव्यांपेक्षा स्वस्त आहेत.
(४) ते ‘सीएफएल’ दिव्यांपेक्षा चांगले दिसतात.
(अ) फक्त २
(क) फक्त ३
(ब) फक्त १ व ३
(ड) वरीलपैकी सर्व
11. कुष्ठरोगावरील प्रभावी औषध……
(अ) सल्फॉन व डॅप्सोन
(ब) प्रायमाक्वीन व मॉर्फिन
(क) ग्लुटेनिन व सल्फॉन
(ड) स्ट्रेप्ट्रोमायसिन व डॅप्सोन
12. खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरविते
(अ) युरिया
(ब) नायट्रेट
(क) अमोनिअम सल्फेट
(ड) कंपोस्ट
13. भारतामध्ये कोणत्या कारणामुळे अनिमिया आढळून येतो?
(अ) लोहाची कमतरता
(ब) कॅल्शिअमची कमतरता
(क) प्रथिनांची कमतरता
(ड) दूधदुभत्यांची टंचाई
14. वनस्पतीच्या एका पेशीपासून संपूर्ण झाड तयार करण्याच्या आनुवंशिक योग्यतेला …. म्हणतात.
(अ) पॉवर हाउस
(ब) टोटिपोटेंसी
(क) जर्मिनेशन
(ड) फर्टिलायझेशन
15. पुढे एका गटात जीवनसत्त्वाच्या अभावामुळे उद्भवणारे रोग दिले असून दुसऱ्या गटात जीवनसत्त्वे नमूद केली आहेत. रोग व ते ज्या जीवनसत्त्वांच्या अभावी होतात ती जीवनसत्त्वे यांच्या सुयोग्य जोड्या लावा.
रोग | औषध |
---|---|
१. रातांधळेपणा | य. रायबोफ्लेविन |
२. स्कन्हीं | र. ‘ए’ जीवनसत्त्व |
३. पेलाग्रा | ल. ‘सी’ जीवनसत्त्व |
४. बेरीबेरी | व. थायमिन |
श. निआसिन |
(अ) १-र, २-ल, ३-श, ४-व
(ब) १-र, २-ल, ३-व, ४-य
(क) १-र, २-ल, ३-श, ४-य
(ड) १-र, २-य, ३-श, ४-ल
16. जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो ?
(अ) कॅल्शिअम
(क) कार्बन
(ब) सोडिअम
(ड) क्लोरीन
17. खालीलपैकी कोणत्या वृक्षाच्या सालीपासून हिवतापावरील क्विनाईन (कोयनेल) हे औषधी द्रव्य मिळविले जाते ?
(अ) निलगिरी
(ब) रबर
(क) सिंकोना
(ड) बेहडा
18. उच्च वातावरणात ऑक्सिजनचे…..या वायूत परिवर्तन होते.
(अ) कार्बन-डाय-ऑक्साइड
(ब) हायड्रोजन
(क) ओझोन
(ड) नायट्रोजन
19. ‘गोबर गॅस’ मध्ये मुख्यत्वे …. हा घटक असतो.
(अ) मिथेन
(ब) ऑक्सिजन
(क) नायट्रोजन
(ड) प्रोपेन
20. …….या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून बीसीजीची लस टोचली जाते.
(अ) कॉलरा
(ब) मलेरिया
(क) क्षय
(ड) कर्करोग
Objective Question with Answer for General Science in Marathi
21. ‘लेप्रोस्कोपी’ ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
(अ) हवामानाचा अंदाज
(ब) अवकाशनिरीक्षण
(क) कुटुंबनियोजन
(ड) कर्करोगप्रतिबंध
22. स्टेनलेस स्टीलमध्ये खालील घटक असतात…..
(अ) क्रोमिअम, लोखंड, निकेल व कार्बन
(ब) निकेल व लोखंड
(क) लोखंड, कार्बन व निकेल
(ड) निकेल, क्रोमिअम व कार्बन
23. दुधाचे सत्त्व मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन…….
(अ) पायरेलिओमीटर
(ब) सॅलिनोमीटर
(क) लॅक्टोमीटर
(ड) बॅरोमीटर
24. निकेल-कॅडमिअम घटात ……
(१) कॅडमिअम हा धातू ऋण ध्रुव असतो.
(२) निकेल हा धातू धन ध्रुव असतो.
(३) झिंक क्लोराइड आणि अमोनिअम क्लोराइड यांचे मिश्रण दोन्ही ध्रुवांच्या मध्ये वापरतात.
(अ) १ व ३
(ब) १ व २
(क) फक्त ३
(ड) १, २ व ३
25. हवेला ….
(१) वस्तुमान असते.
(२) वजन असते.
(अ) फक्त
(ब) फक्त २
(क) ना 1 ना 2
(इ) १ व २ दोन्ही
26. गुरु हा
(१) आपल्या सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह आहे.
(२) आपल्या सूर्यमालेतील सर्वांत तेजस्वी ग्रह आहे.
(३) आकारमानाने पृथ्वीपेक्षा ३१८ पट मोठा आहे.
(४) वस्तुमानाचा विचार करता १३९७ पृथ्वीगोल महज मातील इतका मोठा आहे.
वरीलपैकी कोणती विधान/ने सत्य आहे?
(अ) फक्त १
(ब) फक्त ३ व ४
(क) फक्त १, ३ व ४
(ड) फक्त १ व २
27. पुढे एका स्तंभात वनस्पतीत आढळणारी वृद्धिसंप्रेरके व दुसऱ्या गटात त्यांची कार्ये दिली आहेत. दिलेल्या संकेता- क्षरांच्या साहाय्याने त्यांच्या अचूक जोड्या जुळवा.
विकार | उपचार |
---|---|
१. ऑक्झिन्स | य. पणजीर्णता विलंबन |
२. गिब्बरलिन्स | र. बीजांकुरण |
३. सायटोकायनिन्स | ल. अग्रवाढीस साहाय्य |
४. अबसिसिक आम्ल | व. प्ररोह दीर्घिकरण |
(अ) १-ल, २- र, ३-य, ४-व
(ब) १-ल, २- व, ३-य, ४-र =
(क) १- व, २-ल, ३-र,४-य
(ङ) १- व, २- र, ३-य, ४-ल
28. खालीलपैकी कोणती विद्युत्धारेच्या चुंबकीय परिणामाची उदाहरणे आहेत ?
(१) विद्युत इस्त्री
(२) विद्युत जनित्र
(३) विद्युत चलित्र
(४) विद्युत गीझर
(५) गॅल्व्हानोमीटर
(६) विद्युत घंटा
(अ) फक्त १, ५ व ६
(ब) फक्त २, ३, ५ व ६
(क) फक्त १, ३ व ४
(ड) फक्त २, ३ व ५
29. जीवनसत्त्वांच्या संदर्भात खालील विधाने काळजीपूर्वक अभ्यासा.
(१) ‘क’ जीवनसत्त्व हे एक अत्यंत अस्थिर स्वरूपाचे आणि शिजविताना व साठवल्यामुळे नष्ट होणारे जीवनसत्त्व आहे.
(२) ‘क’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणारा ‘पेलाग्रा’ हा एक त्वचारोग आहे.
(३) आतड्यातील जीवाणूंमुळे ‘ड’ जीवनसत्त्व तयार होते.
उपरोक्त विधानांपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहेत ?
(अ) फक्त ३
(ब) फक्त १ व २
(क) फक्त १
(ड) १, २ व ३
30. दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्य महत्त्वाचे ठरते?
(अ) सोडिअम
(ब) फ्लोरीन
(क) लोह
(ड) आयोडीन
31. पुढीलपैकी कोणते पदार्थ गंधक पुरवितात ?
(१) अंड्याचा बलक
(२) सागरी खाद्य
(३) हिरव्या भाज्या
(अ) १ व २
(ब) १ व ३
(क) २ व ३
(ड) १, २ व ३
32. स्थूलत्व असलेला मनुष्य पुढीलपैकी कोणत्या रोगाला बळी पडण्याची शक्यता अधिक असते ?
(१) अतिरक्तदाब
(२) मधुमेह
(३) हृदयविकार
(अ) १ व २
(क) १ व ३
(ब) २ व ३
(ड) १, २ व ३
33. आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो ?
(१) ‘क’ जीवनसत्त्व
(२) प्रथिने
(३) सोडिअम
(४) लोह
(अ) १ व ३
(ब) २ व ३
(क) २ व ४
(ड) १ व ४
34. आहारातील खाण्यायोग्य प्रथिनांसाठीचे सगळ्यात समृद्ध स्रोत पुढीलपैकी कोणते आहेत?
(अ) मटण व अंडी
(ब) दूध व भाज्या
(क) काही शेवाळ व इतर सूक्ष्मजीव
(ड) सोयाबीन व शेंगदाणे
35. जास्त चोथा असलेले अन्नघटक पुढीलपैकी कोणते ?
(अ) सफरचंद व तूप
(ब) केळी व दूध
(क) अंडी व केळी
(ड) काकडी व सफरचंद
36. चोथ्याचे(फायबर) आपल्या आहारातील महत्त्व काय ?
(१) शरीरात पाणी रोखून ठेवण्यासाठी चोथ्याची गरज असते.
(२) यकृताच्या सामान्य कार्यासाठी तो आवश्यक असतो.
(३) चोथा अन्नात मोठी भर घालतो व बद्धकोष्ठ रोखतो.
(अ) १ व २
(ब) १ व ३
(क) २ व ३
(ड) फक्त ३
37. पुढीलपैकी कोणत्या घटकात कर्बोदके आढळतात.
(१) पालक
(२) लोणी
(३) चीज
(४) मासे
(अ) फक्त १, ३ व ४
(ब) फक्त १, २ व ३
(क) फक्त २ व ४
(ड) वरील सर्व
38. ‘क्ष’ किरण व ‘गॅमा किरण यांतील फरक दर्शविण्यासाठी ‘खाली काही वाक्ये दिलेली आहेत. योग्य पर्याय निवडून सयुक्तिक फरक दर्शवा.
(१) ‘क्ष’ किरणे ऊर्जेच्या बदलामुळे केंद्रकाच्या बाह्य भागातून निघतात. याउलट, ‘गॅमा किरणे केंद्रकातून उत्सर्जित होतात.
(२) ‘क्ष’ किरणे विद्युतचुंबकीय लहरी आहेत तर ‘गॅमा’ किरणे तसे नाहीत.
(३) ‘क्ष’ किरणांच्या लहरींची वारंवारता ‘गॅमा किरणापेक्षा कमी असते.
(४) अन्नधान्याच्या परिरक्षणासाठी ‘क्ष’ किरणांचा उपयोग करू शकत नाही.
(अ) फक्त ३
(ब) फक्त १ व ३
(क) फक्त २ व ४
(ड) वरीलपैकी सर्व पर्याय योग्य आहेत.
39. पुढीलपैकी कोणता घटक रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी खाली आणण्यास साहाय्यभूत ठरतो ?
(अ) मशरुम
(क) लसूण
(ब) हळद
(ड) कापूर
40. मधुमेहाच्या रोग्यांनी पुढीलपैकी कोणते फळ निर्धास्तपणे खावे?
(अ) केळे
(ब) पेरू
(क) संत्रे
(ड) आंबा
सामान्य विज्ञान MCQ Quiz in मराठी
41. आपल्या आहारातील संरक्षक घटकतत्त्वे कोणती ?
अ) कर्बोदके व खनिजे
(ब) स्निग्ध पदार्थ व खनिजे
(क) जीवनसत्त्वे व खनिजे
(ड) प्रथिने व कर्बोदके
42. सुयोग्य जोड्या जुळवा.
उत्पाद | उपयोग |
---|---|
१ .इन्सुलिन | य. मधुमेह |
२. एरिथ्रोपायेटिन | र. रक्तक्षय |
३. इंटरल्युकिन | ल. विषाणू संक्रमण |
४. इंटरफेरॉन्स | व. कर्करोग |
(अ) १-व, २-ल, ३-र, ४-य
(ब) १-व, २-य, ३-ल, ४-र
(क) १-य, २-र, ३-ल, ४-व
(ड) १-र, २-य, ३-व, ४-ल
43. दृष्टीचे चेताकेंद्र येथे असते…..
(अ) छोटा मेंदू
(ब) मोठा मेंदू
(क) मध्यांग
(ड) मेड्युला
44. खालीलपैकी सर्वांत उत्तम विद्युतवाहक कोणता ?
(अ) जस्त
(ब)तांबे
(क) चांदी
(ड) अल्युमिनिअम
45. ‘टाल्कम पावडर’ तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो ?
(अ) कॅल्शिअम सिलिकेट
(ब) मॅग्नेशिअम सिलिकेट
(क) सोडिअम सिलिकेट
(ड) सिलिकॉन
46. खालीलपैकी विजेचा सर्वोत्कृष्ट वाहक म्हणजे…….होय.
(अ) गाळलेले गरम पाणी
(च) ऊर्ध्वपातित पाणी
(क) गाळलेले कोमट पाणी
(ड) खारे पाणी
47. खालीलपैकी कोणते झाड इतरांहून जलद वाढ़ते ?
(अ) आंबा
(ब) नारळ
(क) निलगिरी
(ड) साग
48. पुढीलपैकी कोणती जीवनसत्त्वे मानवी शरीरात तयार होतात ?
(१) ‘ब-६’ जीवनसत्त्व
(२) ‘ड’ जीवनसत्त्व
(३) ‘ई’ जीवनसत्त्व
(४) ‘के’ जीवनसत्त्व
(अ) २ व ४
(ब) २ व ३
(क) १ व २
(ड) १ व ४
49. पुढीलपैकी कोणत्या गटात दिलेले सर्व घटक प्रतिजैविके आहेत?
(अ) क्लोरोमायसिटीन, टेट्रामायसिन, कार्टिसन
(ब) पेनिसिलीन, टेट्रामायसिन, स्ट्रेप्टोमायसिन
(क) पेनिसिलीन, स्ट्रेप्टोमायसिन
(ड) सल्फेनीलामाइड, पेनिसिलीन
50. अन्नघटकांच्या पुढीलपैकी कोणत्या एका गटात प्रथिनांचे प्रमाण मटणामधील प्रथिनांच्या प्रमाणाइतकेच असते ?
(अ) गहू, डाळ व शेंगदाणे
(ब) पाव व लोणी
(क) शेंगदाणे व गूळ
(ड) मोड आलेले धान्य व शेंगदाणे
51. खालीलपैकी कोणते कार्य यकृताचे नाही ?
(अ) रक्तामधील साखरेचे नियमन
(ब) रक्त साठवणे
(क) उष्णतेचे उत्सर्जन
(ड) विषारी पदार्थांचे उत्सर्जन
52. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
(अ) जीवनसत्व ब-१२’ हे वनस्पतीमध्ये आढळत नाही.
(ब) गायीचे दूध ‘अ’ जीवनसत्वाचा महत्वाचा स्रोत
(क) अफूमध्ये मॉर्फिन हे द्रव्य प्रधान असते.
(ड) बेशुद्ध करण्यासाठी नायट्रोजन पॅरॉक्साइडचा वापर केला जातो.
53. पुढीलपैकी कोणते /ती विधान/ने असत्य आहे / त ?
(१) अस्कॉर्बिक आम्लामुळे हिरड्यांतील रक्तस्राव रोखला जातो.
(२) पाळीव प्राण्यांमध्ये रेनडिअरच्या दुधात सर्वांत कमी स्निग्धांश आढळतो.
(३) संत्रे ‘सी’ जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहे.
(४) बटाट्यामध्ये प्रथिने व तेल घटकांचे प्रमाण कमी तर कर्बोदकांचे प्रमाण सर्वाधिक असते.
(अ) फक्त २
(ब) फक्त १ व ३
(क) कोणतेही नाही.
(ड) १ ते ४ सर्व
54. पुढील विधाने काळजीपूर्वक अभ्यासा..
(१) प्रकाशनिर्मितीसाठी विजेच्या दिव्यात टंगस्टनची तार वापरली जाते.
(२) टंगस्टन धातूचा द्रवणांक ३,००० से. इतका अधिक असतो.
(अ) विधान १ चूक असून विधान २ बरोबर आहे.
(ब) विधान १ बरोबर असून विधान २ चूक आहे.
(क) दोन्ही विधाने बरोबर आहेत, पण २ हे १ चे स्पष्टीकरण नाही.
(ड) दोन्ही विधाने बरोबर असून २ हे १ चे स्पष्टीकरण आहे.
55. कापड गिरण्यांमध्ये कापड तयार करताना खालीलपैकी कशाचा विरंजक म्हणून उपयोग करतात ?
(अ) सल्फर डाय-ऑक्साइड
(ब) सोडिअम परबोरेट
(क) सोडिअम क्लोरेट
(ड) पोटॅशिअम स्टिअरेट
56. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात ?
(अ) कार्डिओग्राफ
(ब) स्टेथोस्कोप
(क) थर्मामीटर
(ड) अल्टिमीटर
57. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीस ‘ॲडमचे ॲपल’ म्हणून संबोधले जाते ?
(अ) थायरॉइड
(ब) प्लीहा
(क) यकृत
(ड) स्वादुपिंड
58. ………..प्राण्यांमध्ये फलनाची क्रिया शरीराबाहेर घडून येते.
(अ) जलचर
(ब) संधिपाद
(क) सरिसृप
(ड) सस्तन
59. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(१) मद्याच्या अतिसेवनाचा फुप्फुसांवर अतिशय वाईट परिणाम होतो..
(२) रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त ठरली आहे.
(३) मुत्रपिंडाच्या विकारावर उपचार करण्यासाठी डायलिसिस तंत्राचा वापर करतात.
(४) कर्करोगामुळे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो.
(अ) फक्त १ व २
(ब) फक्त २ व ३
(क) फक्त १ व ४
(ड) फक्त २ व ४
60. खालीलपैकी कोणता /ते रोग विषाणूंपासून होत नाही / त ?
(१) देवी
(२) इन्फ्ल्यूएंझा
(३) क्षय
(४) मलेरिया
(५) कावीळ
(६) हिमोफिलीआ
(अ) ४ सोडून सर्व
(ब) फक्त ३, ४ व ६
(क) फक्त १, ३, ५ व ६
(ड) ३ सोडून सर्व
MPSC Science Questions in Marathi
61. खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही गटाचे रक्त चालते ?
(अ) ए
(क) ओ
(ब) बी
(ड) एबी
62. खालीलपैकी सर्वात हलका वा कोणता?
(अ) हायड्रोजन
(ब) हेलिअम
(क) ऑक्सिजन
(ड)ओझोन
63. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोणी शोधून काढले?
(अ) गॅलिलिओ
(ब) अनुदर्शन
(क) रॉबर्ट पेरी
(ङ) कोपर्निकस
64. मानवी शरीरात रक्ताचे सरासरी प्रमाण किती असते?
(अ) ४० टक्के
(ब) ८ टक्के
(क) १३ टक्के
(ड) २१ टक्के
65. भारतात सार्वजनिक जलशुद्धीकरणासाठी सामान्यतः वापरले जाते.
(अ) तुरटी
(ब) सोडिअम क्लोराइड
(क) क्लोरीन
(ड) पोटॅशिअम परमँगनेट
66. खालीलपैकी वेदनाशामक औषध कोणते ?
(अ) इन्सुलिन
(ब) क्विनाईन
(क) मॉर्फिन
(ड) ड्युखीन
67. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही?
(अ) कॉलरा
(ब) देवी
(क) प्लेग
(ड) कर्करोग
68. खालीलपैकी कोणते रोग आनुवंशिक आहेत ?
(१) मधुमेह
(२) कॉलरा
(३) कर्करोग
(४) अतिताण
(५) रंगांधळेपणा
(६) दात्रपेशी पांडुरोग
(अ) २ सोडून सर्व
(ब) फक्त १ ते ५
(क) फक्त १,५, ६
(ड) फक्त २, ४. ६
69. पुढीलपैकी कोणत्या जोडया बरोबर आहेत?
(१) त्से-त्से माशी: निद्रारोग
(२) मादी अनाफिलीस डास: हिवताप
(३) वालुमक्षिका: काळा आजार
(४) कॉलरा: पिसवा
(अ) १ व २
(ब) २ व ३
(क) १ व ३
(ड) १, २ व ३ =
70. जोड्या लावा
जैविक आम्ल | पदार्थ |
---|---|
लॅक्टिक आम्ल | लिंबू |
असिटिक आम्ल | आंबलेले शिळे लोणी |
सायट्रिक आम्ल | दूध |
ब्युटिरिक आम्ल | व्हिनेगर |
मद्य |
(अ) य-२, २-५, ल-१, व-३
(ब) य-३, र-१, ल-४, व-५
(क) य-३, र-४, ल-१, व-२
(ड) य-५, २-४, ल-३, व-२
71. बियांमुळे आणि वनस्पती पदार्थोंमुळे पारेषित होणाऱ्या रोगांच्या निदानासाठी…….आणि…. या दोन पद्धतींचा अधिकाधिक वापर केला जातो.
(१) एलायझा
(२) उतीसंवर्धन
(३) पीसीआर
(४) फुटवीकर / क्लोनिंग
(अ) १ व ३
(ब) २ व ४
(क) १ व ४
(ड) २ व ३
72. आण्विक स्थितीत आढळणारा एक वायू…..
(अ) कार्बन डाय-ऑक्साइड
(ब) सिलिकॉन
(क) हेलिअम
(ड) ओझोन
73. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या मुळांवर गाठी असतात?
(१) गहू
(२) ज्वारी
(३) सोयाबीन
(४) कण्हेर
(५) पायनस
(६) हरभरा
(अ) 3 सोडून सर्व
(ब) फक्त ३ व ६
(क) फक्त १,३ व ५
(ड) फक्त १, २, ३ व ६
हे देखील वाचा
GK Questions in Marathi with Answers 2024
Police Bharti Science Questions in Marathi
Maharashtracha Bhugol in Marathi