महाराष्ट्र भूगोल संपूर्ण माहिती | Maharashtracha Bhugol in Marathi

महाराष्ट्र भूगोल संपूर्ण माहिती | Maharashtracha Bhugol in Marathi

Maharashtracha Bhugol in Marathi: विद्यार्थीमित्रांनो आपल्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राच्या भूगोलात स्वतंत्र अभ्यास विषयक म्हणून महत्व लक्षात घेऊन परीक्षेच्या दृष्टिकोनातून या लेखात आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचा व अनुषंगिक अभ्यास करणार आहोत.

भूगोला संबंधी भरपूर प्रश्न स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणतीही महाराष्ट्र भरती परीक्षा असो त्यामध्ये नक्कीच विचारले जातात. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण 150+ हून अधिक भूगोलासंबंधी महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत.

Maharashtracha Bhugol in Marathi

Maharashtracha Bhugol
Maharashtracha Bhugol

1. राज्याच्या दक्षिणेस सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व नांदेड या सात जिल्ह्यांच्या सीमा …..राज्यास भिडल्या आहेत.

उत्तर – कर्नाटक

2. सातमाळा-अजिंठा डोंगररांगांमुळे गोदावरी खोरे तापी खोऱ्यापासून, तर ….. . डोंगररांगांमुळे भीमा खोऱ्यापासून अलग झाले आहे.

उत्तर – हरिश्चंद्र- बालाघाट

3. उत्तरेकडील सातपुडा पर्वत व दक्षिणेकडील सातमाळा- अजिंठ्याचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात…..चे खोरे पसरलेले आहे.

उत्तर – तापी-पूर्णा

4. उत्तरेस सातमाळा-अजिंठ्याचे डोंगर व दक्षिणेस हरिश्चंद्र- बालाघाटचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात …चे खोरे पसरलेले आहे.

उत्तर – गोदावरी

5. उत्तरेला हरिश्चंद्र – बालाघाटचे डोंगर व दक्षिणेला महादेव डोंगररांगा यांच्या दरम्यान राज्यात …… नदीचे खोरे पसरलेले आहे.

उत्तर – भीमा

6. कृष्णा नदी – खोऱ्यात राज्यातील …. या जिल्ह्यांचा प्रदेशसमाविष्ट होतो.

उत्तर – सांगली, सातारा व कोल्हापूर

7. दारणा, प्रवरा, मुळा, सिंदफणा, पूर्णा, दुधना, शिवना व कादवा या …..च्या महत्त्वाच्या उपनद्या होत.

उत्तर – गोदावरी

8. वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास ‘प्राणहिता’ असे संबोधिले जाते. प्राणहिता …….जवळ गोदावरीस मिळते.

उत्तर – सिरोंचा (गडचिरोली)

9. पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमा नदी कर्नाटक राज्यात रायचूर जिल्ह्यात…… येथे कृष्णेस मिळते.

उत्तर – कुरुगड्डी

10. राज्यात ‘जांभी’ किंवा ‘लॅटेराइट’ मृदा …. या जिल्ह्यांमध्येआढळते.

उत्तर – रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर

11. एकूण भौगोलिक क्षेत्राशी असलेले वनक्षेत्राचे प्रमाण……या जिल्ह्यात राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ ६८.८१ टक्के इतके आहे.

उत्तर – गडचिरोली

12. कोणत्याही प्रदेशात पर्यावरणाच्या संतुलनासाठी ३३ टक्के जमीन वनांखाली असणे आवश्यक असते. राज्यातील…. या सहा जिल्ह्यांमध्ये ३३ टक्क्यांहून अधिक क्षेत्र वनांखाली आहे. (उतरत्या क्रमाने)

उत्तर – गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, गोंदिया, चंद्रपूर

13. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१ मधील उपलब्ध माहितीनुसार, (२०१६ -१७ मधील स्थिती ) राष्ट्रीय स्तरावर एकूण भू-क्षेत्रापैकी ४२.४ टक्के क्षेत्र निव्वळ पेरणीखाली होते, तर राज्यात हे प्रमाण……टक्के होते.

उत्तर – ५४.९५

14. हिरड्यापासून ‘टॅनिन’ तयार करण्याचा कारखाना कोल्हापूर जिल्ह्यात ….येथे आहे.

उत्तर – अंबा

15. राज्यात काडीपेटी तयार करण्याचे कारखाने ……येथे आहेत.

उत्तर – अंबरनाथ, मुंबई व नागपूर

16. नागपूर जिल्ह्यातील ….. हा पट्टा मँगनीजच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे.

उत्तर – रामटेक ते सावनेर

17. भारतातील एकूण लोहखनिज साठ्यांच्या २ टक्के साठे महाराष्ट्रात आहेत. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, सिंधुदुर्ग हे जिल्हे लोहसाठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. राज्यातील लोहखनिजाच्या एकूण साठ्यांपैकी ७० टक्के साठे …….या जिल्ह्यात आहेत.

उत्तर – गडचिरोली

18. लोहखनिजाच्या साठ्यांसाठी प्रसिद्ध असलेली गडचिरोली जिल्ह्यामधील ठिकाणे….

उत्तर – देऊळगाव, सुरजागड व भामरागड

19. …… जिल्ह्यात ‘खुर्सीपार’ व ‘आंबेतलाव’ येथे मॅग्नेटाइट प्रकारचे लोहखनिज सापडते.

उत्तर – गोंदिया

20. राज्यात मँगनीजचे (मंगल धातू) जवळ जवळ ५० कोटी टन इतके साठे आहेत. देशातील एकूण साठ्यांच्या किती टक्के साठे राज्यात आहेत ?

उत्तर – ७ टक्के

21. लोकसंख्येचा विचार करता बृहन्मुंबई हे राज्यातील पहिल्या क्रमांकाचे तर देशातील …….. क्रमांकाचे विस्तारित नागरी संकुल ठरते.

उत्तर – दुसऱ्या

22. लोकसंख्येचा विचार करता …… हे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे तर देशातील तेराव्या क्रमांकाचे विस्तारित नागरी संकुल ठरते.

उत्तर – नागपूर

23. ‘पुणे’ हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे, तर देशातील ….. क्रमांकाचे विस्तारित नागरी संकुल आहे.

उत्तर – आठव्या

24. …..या जिल्ह्यास ‘पांढरे सोने पिकविणारा जिल्हा’ म्हणूनच ओळखले जाते.

उत्तर – यवतमाळ

25. …… हे विदर्भातील एकमेव गिरिस्थान होय.

उत्तर – चिखलदरा

26. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी व त्यांनी स्थापन ‘केलेला ‘गुरुकुंज आश्रम’ अमरावती जिल्ह्यात ….. येथे आहे.

उत्तर – मोझरी

27. विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून ‘जिजामाता सहकारी साखर कारखान्या’चा उल्लेख करावा लागेल. हा साखर कारखाना कोठे आहे ?

उत्तर – दुसरबीड (बुलढाणा)

28. मैसुरू येथील वृंदावन गार्डन व काश्मीरमधील शालिमार उद्यान या दोहोंच्या धर्तीवर रचना करण्यात आलेले पैठण येथील उद्यान …..

उत्तर – ज्ञानेश्वर उद्यान

29. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र सोलापूर जिल्ह्यात…..येथे कार्यरत आहे.

उत्तर – मुळेगाव

30. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे ‘सागरीय उद्यान’ सिंधुदुर्ग जिल्ह्यात….. परिसरात साकारले जात आहे.

उत्तर – मालवण

31. महाराष्ट्रातील तसेच भारतातीलही पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान या जिल्ह्यास मिळाला आहे.

उत्तर – सिंधुदुर्ग

32. राज्यातील पहिले व एकमेव सागरी उद्यान कोणत्या नावाने ओळखले जात आहे ?

उत्तर – राजा शिवछत्रपती सागरी उद्यान

33. संगमनेरहून रंधा धबधब्याकडे जाताना …….हा घाट लागतो.

उत्तर – विटा

34. महाराष्ट्राच्या किनारपट्टीत बोलल्या जाणाऱ्या……….या भाषेस मराठीची उपभाषा मानले जात असले तरी घटनेच्या आठव्या परिशिष्टात स्थान मिळाल्यामुळे तिला स्वतंत्र आणि अधिकृत भारतीय भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.

उत्तर – कोंकणी

35. …….या भाषेस गोवा राज्यात राजभाषेचा दर्जा देण्यात आला असला तरी भाषाशास्त्रीयदृष्ट्या मात्र तिला मराठीची उपभाषाच म्हणावे लागते.

उत्तर – कोंकणी

36. कोंकणी भाषेचे उत्तर कोंकणी, दक्षिण कोंकणी व ….असे प्रमुख उपभेद आहेत.

उत्तर – कुडाळी

37. उत्तर कोंकणी भाषेच्या……. या बोलीवर उर्दूचा प्रभाव आढळतो.

उत्तर – बाणकोटी

38. भौगोलिक निकटत्वामुळे मराठीच्या …..या उपभाषेवरकिंवा बोलीवर काहीसा गुजरातीचाही ठसा आढळतो.

उत्तर – खानदेशी

39. मराठीच्या….. या बोलीस किंवा उपभाषेस अहिरांची भाषा म्हणून ‘अहिराणी’ असेही म्हणतात

उत्तर – खानदेशी

40. ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअम’, ‘कावसजी जहांगीर ‘हॉल’ व ‘गेट वे ऑफ इंडिया’ या वास्तूंची रचना करण्याचे श्रेय सुप्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद…..यांना द्यावे लागेल.

उत्तर – जॉर्ज विटेट

41. सात बेटे एकमेकांना जोडून आजचे मुंबई शहर साकार करण्यात पायाभूत ठरणाऱ्या….. या ब्रिटिश गव्हर्नरला ‘आधुनिक मुंबईचा शिल्पकार’ म्हटले जाते.

उत्तर – जेराल्ड अँजिअर

42. राज्यात मगर प्रजनन केंद्र कोठे आहे?

उत्तर – ताडोबा राष्ट्रीय उद्यान, चंद्रपूर

43. कोल्हापूर जिल्हा…..च्या खोऱ्यात वसला आहे, असे म्हणता येईल.

उत्तर – कृष्णा-पंचगंगा

44. नागपूरजवळ ….. येथे संरक्षण साहित्यनिर्मितीचा कारखाना आहे.

उत्तर – अंबाझरी

45. ‘दी बेलापूर शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज’ हा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना इ. स. १९१९ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूरजवळ…..येथे प्रथमतः खाजगी क्षेत्रात सुरू केला गेला.

उत्तर – बेलापूर

46. …… ही सहकारी क्षेत्रातील आशिया खंडातील सर्वात मोठी बँक म्हणता येईल.

उत्तर – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

47. स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात ……येथील भुईकोट किल्ल्यात ब्रिटिश शासनाने जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल व मौलाना आझाद यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांना कैदेत ठेवले होते.

उत्तर – अहमदनगर

48. ……या परिसरात एकवटलेली साखर कारखान्यांची संख्या लक्षात घेता या परिसरास ‘भारताची साखरपेठ’ असेच संबोधले जाते.

उत्तर – कोपरगाव, जि. अहमदनगर

49. भुईकोट किल्ला असलेल्या ……या ठिकाणी मराठ्यांनी इतिहासातील आपला शेवटचा विजय नोंदविला.

उत्तर – खर्डा, जि. अहमदनगर

50. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली ज्या गावाने ‘राळेगण शिंदी’ ते ‘राळेगण सिद्धी’ असा प्रवास केला ते गाव अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे ?

उत्तर – पारनेर

महाराष्ट्र भूगोल संपूर्ण माहिती

महाराष्ट्र भूगोल संपूर्ण माहिती
महाराष्ट्र भूगोल संपूर्ण माहिती

51. पुणे जिल्ह्यातील ………….या घाटातून ठाणे जिल्ह्यात उतरता येते.

उत्तर – नाणेघाट

52. सन १९३३ पासून सोलापूर जिल्ह्यातील मुळेगाव येथे कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कार्यरत आहे. हे केंद्र सुरुवातीस इ. स. १९२३ मध्ये पुण्याजवळ…… येथे सुरू करण्यात आले होते.

उत्तर – मांजरी

53. अनेक शतके काळाच्या पडद्याआड लपलेल्या फर्दापूर येथील अजिंठ्याच्या लेण्यांचा शोध एप्रिल, १८१९ मध्ये ……या इंग्रज अधिकाऱ्याने लावला.

उत्तर – स्मिथ

54. सन १८६५ मध्ये ‘वॉयने’ या भूगर्भ शास्त्रज्ञाला…….. येथे मध्यपुराश्मयुगीन दगडी हत्यारे सापडली

उत्तर – मुंगी (पैठण)

55. महाराष्ट्रातील … परिसरात आद्य शेतकऱ्यांची वस्ती होती, असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

उत्तर – आपेगाव (पैठण)

56. ‘छागल’ नावाचे चामड्याचे बुधले जेथे तयार होतात त्या…. या ठिकाणी मराठवाडा विकास महामंडळातर्फे चर्मोद्योग प्रकल्प राबविला जातो.

उत्तर – बीड

57. मन्मथस्वामींचे मंदिर’ व ‘कपिलधार’ नावाचा धबधबा यांमुळे प्रसिद्धीस आलेले बीड जिल्ह्यातील ठिकाण …..

उत्तर – मांजरसुभा

58. नांदेड जिल्ह्यातील किनवट, कंधार व मुखेड या तालुक्यांमध्ये…. या भटक्या म्हणून गणल्या गेलेल्या जमातीची वस्ती एकवटली आहे.

उत्तर – लमाण

59. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर व चिखली या तालुक्यांत……या विमुक्त व भटक्या गणल्या गेलेल्या जमातीची वस्ती अधिक आहे.

उत्तर – बंजारा

60. ‘मन’ व ‘म्हैस’ या नद्यांचा संगम अकोला जिल्ह्यात….. येथे झाला आहे.

उत्तर – बाळापूर

61. जगाच्या इतिहासात सर्वांत मोठे धर्मांतर एकाच दिवशी आणि तेही शांततामय मार्गाने कोणत्या दिवशी नागपूर येथे घडून आले.

उत्तर – १४ ऑक्टोबर, १९५६

62. ‘नागझिरा’ हे वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये पसरले आहे?

उत्तर – भंडारा व गोंदिया

63. गोंदिया जिल्ह्यातील सर्वांत मोठा तलाव …… येथे आहे.

उत्तर – नवेगाव बांध

64. प्रसिद्ध संस्कृत नाटककार ‘भवभूती’ यांचे स्मारक …..

उत्तर – आमगाव (गोंदिया)

65. ‘चुलबंद’ ही. …… जिल्ह्यातील प्रमुख दक्षिणवाहिनी नदी होय.

उत्तर – गोंदिया

66. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, घुगुस व बल्लारपूर ही ठिकाणे……. नदीकाठी वसली आहेत.

उत्तर – वर्धा

67. वर्धा व पैनगंगेच्या संगमाजवळ वसलेले चंद्रपूर जिल्ह्यातील गाव……..

उत्तर – बढा

68. चंद्रपूर जिल्ह्यातील ‘सावली’ हे ठिकाण…. निर्मितीच्या लघुउद्योगाबाबत प्रसिद्ध आहे.

उत्तर – रेशमी कापड

69. ‘असोलमेंढा’ हा चंद्रपूर जिल्ह्यातील जलाशय …..या नदीवर आहे.

उत्तर – पाथरी

70. ……या जिल्ह्याचा उल्लेख महानुभाव पंथीयांच्या साहित्यात विशेषत्वाने आढळतो.

उत्तर – भंडारा

71. चंद्रपूर जिल्ह्यातील ‘चंद्रपूर’ हे जिल्ह्याचे ठिकाण ….. या नदीकाठी वसले आहे.

उत्तर – इरई

72. पुण्याजवळ पानशेत येथे ‘अंबी’ नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयास …..नावाने ओळखले जाते.

उत्तर – ‘तानाजीसागर’

73. ७०० कि. मी. दक्षिण-उत्तर विस्तार असलेल्या महाराष्ट्रास सुमारे…. कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

उत्तर – ७२०

74. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ…….

उत्तर – ३,०७,७१३ चौ. कि. मी.

75. सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर……

उत्तर – अस्तंभा (१,३२५.मी.)

76. राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जाते?

उत्तर – कृष्णा

77. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले नागपूर हे शहर ……… या नदीच्या काठी वसले आहे.

उत्तर – नाग

78. भोगावती नदीवर बांधण्यात आलेले राधानगरी हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर – कोल्हापूर

79. भंडारा जिल्ह्यात……येथे मँगनीजच्या खाणी तसेच मैंगनीज शुद्ध करण्याचा कारखाना आहे.

उत्तर – तुमसर

80. रायगड जिल्ह्याचे…. हे मुख्य ठिकाण पूर्वी मराठ्यांचे आरमारप्रमुख आंग्रे यांच्या राजधानीचे ठिकाण होते.

उत्तर – अलिबाग

81. देशातील पहिली सहकारी सूत गिरणी

उत्तर – कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी

82. महाराष्ट्रातील एकूण सिंचनक्षमतेपैकी ७० टक्के सिंचनक्षमता…. या पिकासाठी वापरली जाते.

उत्तर – ऊस

83. देशातील एकूण सहकारी संस्थांपैकी जवळजवळ…….. संस्था महाराष्ट्रात आहेत.

उत्तर – २५ टक्के

84. दोनशे हेक्टरहून अधिक क्षेत्रफळाचे ‘सातपुडा वनस्पती उद्यान’ कोठे आहे?

उत्तर – नागपूर

85. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या भारतातील वाघांची स्थिती, २०१८ अहवालानुसार महाराष्ट्रातील वाघांची अंदाजित संख्या…… इतकी आहे.

उत्तर – ३१२

86. वेण्णा, वेरळा, वारणा व पंचगंगा या…… नदीच्या उपनद्या वा तिला येऊन मिळणाऱ्या नद्या होत.

उत्तर – कृष्णा

87. ‘पूर्णा’ व ‘गिरणा’ या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ?

उत्तर – तापी

88. बहे (रामलिंग), औदुंबर (दत्तात्रय) व नरसिंगपूर (नृसिंह) ही सांगली जिल्ह्यातील पवित्र स्थळे कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत?

उत्तर – कृष्णा

89. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी’ (यशदा) कोठे आहे?

उत्तर – पुणे

90. सावंतवाडीहून बेळगावीला जाताना लागणारा घाट…..

उत्तर – आंबोली

91. महाराष्ट्रात येथे रासायनिक द्रव्यांचे कारखाने आहेत.

उत्तर – पनवेल व अंबरनाथ

92. खादी व ग्रामोद्योग वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेले ‘मगन संग्रहालय’…. येथे आहे.

उत्तर – वर्धा

93. चोखामेळा, दामाजीपंत व कान्होपात्रा या संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेले सोलापूर जिल्ह्यातील ठिकाण….

उत्तर – मंगळवेढा

94. महाराष्ट्राची रचना काहीशी काटकोन त्रिकोणासारखे आहे, असे म्हणावयाचे झाल्यास……. समुद्राला या काटकोन त्रिकोणाचा ‘पाया’ असे म्हणता येईल

उत्तर- अरबी समुद्र

95. महाराष्ट्रातील आदिवासी समाज….. या वंशाचा असल्याचे अनुमान काढता येते

उत्तर – प्रोटो-आस्ट्रॉलॉईड

96. सन 2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार देशातील एकूण लोकसंख्येतील महाराष्ट्रातील लोकसंख्येचे प्रमाण किती आहे?

उत्तर – 9.28 टक्के

97. सन 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या…… इतकी होती?

उत्तर – 9 कोटी 68 लाख 78 हजार 627

98. 2001- 2011 या दशकात भारताची लोकसंख्या 17.7० टक्के इतकी वाढली, तर महाराष्ट्राची लोकसंख्या……. टक्के इतकी वाढली?

उत्तर – 15.99 टक्के

99. 2001 ते 2011 या दशकातील महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर 15.9 टक्के इतका होता. हा दर 1991 ते 2001 या दशकातील…… या दरापेक्षा कमी होता?

उत्तर – 22. 73%

100. सन 2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येशी नागरी लोकसंख्येचे प्रमाण……

उत्तर – ४५.२२%

Maharashtra GK Questions in Marathi

Maharashtra GK Questions in Marathi
Maharashtra GK Questions in Marathi

101. सन 2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येशी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण…….

उत्तर – 54.78%

102. महाराष्ट्रात 59 जाती अनुसूचित जाती म्हणून अधिसूचित करण्यात आले आहेत; तर अनुसूचित जमाती म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या जमातींची संख्या किती आहे?

उत्तर – ४७

103. सन 2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्ष राज्यात 1000 पुरुषांमागे 929 स्त्रिया हे प्रमाण असले तरी ० ते ६ वर्षे या वयोगटाचा विचार करता मात्र 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण……. इतके आहे

उत्तर – 984

104. सन 2001 च्या जनगणनेनुसार राज्यात दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण….. इतक्या होते

उत्तर – 922

105. सन 2001 च्या जनगणनेनुसार राज्यातील प्रति चौ. कि. मी. ला 315 इतकी लोकसंख्येची घनता होती; सन 2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार ती आता…… इतकी वाढली आहे

उत्तर – ३६५

106. सन 2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत अनुसूचित जातींचे प्रमाण 11.8 टक्के इतके, तर अनुसूचित जमातींचे प्रमाण…… टक्के इतके आहे

उत्तर – ९.४%

107. सन 2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार महाराष्ट्रातील दर 100 व्यक्तींपैकी किती व्यक्ती साक्षर या संज्ञेत मोडतात?

उत्तर – 82.3

108. सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात एकूण…….. शहरे आहेत

उत्तर – ५३५

109. सन 2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार एक लाखाहून अधिक लोकसंख्येची किती शहरे राज्यात आहेत

उत्तर – 37

110. सन 2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार राज्यातील दशलक्षी शहरांची संख्या किती आहे

उत्तर – 10

111. सन 2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार राज्यातील दशलक्षी महानगरपालिकांची संख्या किती आहे

उत्तर – 10

112. ….. या जिल्ह्याचा निर्देश राज्यातील निरक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक असलेला जिल्हा म्हणून करावा लागेल

उत्तर – नंदुरबार

113. ….. हा राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा होय

उत्तर – सिंधुदुर्ग

114. देशातील सिंचनाखालील एकूण क्षेत्रापैकी सुमारे…… इतके क्षेत्र महाराष्ट्रात आहे

उत्तर – 4.7 टक्के

115. वनस्पती अहवाल 2019 अनुसार राज्याच्या भौगोलिक क्षेत्राशी प्रत्यक्ष वनव्यात क्षेत्राचे प्रमाण ….

उत्तर – 16.50 टक्के

116. सन 2019 च्या वनस्पती अहवालानुसार भारतातील एकूण क्षेत्राच्या अवघे……. वनक्षेत्र महाराष्ट्रात आहे

उत्तर – ७.१३ टक्के

117. महाबळेश्वर परिसरातील कृष्णा कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने……. प्रकारची आहेत

उत्तर – उष्णकटिबंधीय सदाहरित वने

118. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील वने…….. प्रकारची आहेत

उत्तर – आद्र पानझडी वृक्षांची वने

119. सह्याद्रीच्या पूर्वाभिमुख उतारावर कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात

उत्तर – शुष्क पानझडी वृक्षांची वने

120. राज्यातील 50 सेमी पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात उष्ण कटिबंधीय काटेरी वृक्षांची वने आढळतात. अशा वन क्षेत्रांनी राज्यातील जवळजवळ……. इतके क्षेत्र व्यापले आहे

उत्तर – 17%

121. राज्यात दर 100 चौ.कि.मी. क्षेत्रामध्ये…… लांबीचे रस्ते आहेत

उत्तर – 100.5 किमी

122. सन 2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार लोकसंख्येच्या बाबतीत राज्याचा देशात दुसरा तर आकारमानाच्या बाबतीत……. क्रमांक लागतो

उत्तर – तिसरा

123. विदर्भात वाशिम व गोंदिया हे दोन नवे जिल्हे अस्तित्वात आल्याने विदर्भातील जिल्ह्यांची संख्या आता……. इतकी झाली आहे

उत्तर – 11

124. नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीमुळे राज्यातील खानदेश या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशातील जिल्ह्यांची संख्या……… झाली आहे

उत्तर – ३

125. …… या पर्वताला महाराष्ट्राचा प्रमुख जलदुर्ग म्हटले जाते

उत्तर – सह्य

126. राज्यातील उत्तरेकडील बोर्डी- तलासरीपासून दक्षिणेकडील…… पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो

उत्तर – रेडी-बांदे

127. सह्य पर्वताच्या वातसन्मुख व वातविन्मुख अशा दोन्ही बाजूंनी प्रामुख्याने…….. या महिन्यात पर्जन्य पडते

उत्तर – जून ते सप्टेंबर

128. चिंचोळ्या कोकण किनारपट्टी ची रुंदी उत्तरेकडे…….. नदीच्या खोऱ्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे 130 किमी आहे

उत्तर – उल्हास

129. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनाऱ्यावर ……….. जवळ सागरी गुहा आढळतात

उत्तर – मालवण

130. सह्य पर्वताची एकूण लांबी सुमारे 1600 किमी असून त्यापैकी सुमारे…… लांबीचा भाग महाराष्ट्रात आहे

उत्तर – 640 किमी

131. गोदावरीचे खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे असून या खोऱ्याने राज्याचा…….. भूप्रदेश व्यापला आहे

उत्तर – 50%

132. राज्याच्या आग्नेयस गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड या चार जिल्ह्यांच्या सीमा…….. राज्याला भिडलेले आहेत

उत्तर – तेलंगणा

133. राज्याच्या वायव्येस पालघर, नाशिक, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांच्या सीमा….. राज्याला भिडल्या आहेत.

उत्तर – गुजरात

134. भीमा नदीचे उगमस्थान असलेले भीमाशंकर पुणेजिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

उत्तर – आंबेगाव.

135. घोड, सीना, भामा, इंद्रायणी, नीरा या…… च्या उपनद्या होत.

उत्तर – भीमा

136. पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद ही शहरे ..नदीच्या खोऱ्यात वसली आहेत. उत्तर

उत्तर – भीमा

137. सातारा, सांगली, कऱ्हाड व कोल्हापूर ही शहरे …नदीच्या खोऱ्यात वसली आहेत.

उत्तर – कृष्णा

138. तानसा व वैतरणा या नद्यांच्या मुखाजवळ……जिल्ह्यात दातिवऱ्याची खाडी आहे.

उत्तर – पालघर

139. कोकणातील सर्वाधिक म्हणजे १३० कि. मी. लांबीची उल्हास नदी सह्य पर्वतावर …. जवळ उगम पावते.

उत्तर – खंडाळा

140. सातपुडा पर्वतरांगांत मध्य प्रदेशात मुलताईजवळ उगम पावणारी पश्चिमवाहिनी तापी नदी…..जवळ अरबी समुद्रास मिळते.

उत्तर – सुरत (गुजरात)

141. गिरणा, पांझरा व बुराई या …….. च्या उपनद्या होत.

उत्तर – तापी

142. ……या विदर्भातील प्रमुख दक्षिणवाहिनी नद्या होत.

उत्तर – वर्धा व वैनगंगा

143. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…..येथे होते.

उत्तर – आंबोली ( ७२० सें. मी. पेक्षा जास्त )

144. मोसमी पावसाचे आगमन केरळमध्ये १ जून रोजी होते तर, पुणे येथे ७ जून रोजी. मुंबईमध्ये हा पाऊस….च्या सुमारास पोहोचतो.

उत्तर – १० जून

145. राज्यातील किमान तापमानाची नोंद……. येथे होते.

उत्तर – मालेगाव (नाशिक)

146. महाराष्ट्रातील …… हे विभाग कापूस उत्पादनात अग्रेसर आहेत.

उत्तर – खानदेश व विदर्भ

147. ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ पुण्याजवळ …..येथे आहे.

उत्तर – मांजरी

148. विभागनिहाय विचार करता ……..विभाग राज्यात साखर ‘उद्योगात आघाडीवर आहे, असे म्हणता येईल.

उत्तर – पश्चिम महाराष्ट्र

149. महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर लागणारा घाट…

उत्तर – आंबेनळी

150. राज्यातील सर्वाधिक मागासलेला जिल्हा म्हणून ……या जिल्ह्याचा निर्देश करावा लागेल.

उत्तर – गडचिरोली

Maharashtra general knowledge in Marathi

Maharashtra general knowledge in Marathi
Maharashtra general knowledge in Marathi

151. …….जिल्ह्यात सिरोंचा परिसरात गोदावरी नदीत मगरी आढळतात.

उत्तर – गडचिरोली

152. ‘इटियाडोह’ हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर – गोंदिया

153. मांडवा, दिघी, करंजा, आगरदांडा व रेवस ही छोटी- मोठी बंदरे राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

उत्तर – रायगड

154. नागपूरजवळ…… येथे असलेले विमानतळ भारतातील मध्यवर्ती विमानतळ गणले जाते.

उत्तर – सोनेगाव

155. तंतुवाद्यसाठी प्रसिद्ध असलेले पश्चिम महाराष्ट्रातील ठिकाण

उत्तर – मिरज

156. ‘पेंच’ प्रकल्पातील महाराष्ट्राचे सहकारी राज्य

उत्तर – मध्यप्रदेश

157. चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे

उत्तर – कोल्हापूर

158. राज्यातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा

उत्तर – अहमदनगर

159. देशातील पहिले रेडिओ केंद्र 1927 मध्ये सुरू झाले ते कोणत्या शहरात सुरू झाले

उत्तर – मुंबई

160. सहकारी दुग्धउत्पादन क्षेत्रात…… जिल्हा राज्यात अग्रेसर आहे

उत्तर – कोल्हापूर

161. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर राज्यात…… येथे आहे

उत्तर – पुणे

162. पश्चिम घाटाच्या एकात्मिक विकास योजनेतील महाराष्ट्राचे सहकारी राज्य

उत्तर – तामिळनाडू, केरळ, कर्नाटक व गोवा

163. केंद्र शासनाने अति मागास म्हणून जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील जमाती……

उत्तर – चंद्रपूर: माडिया-गोंड; यवतमाळ, नांदेड: कोलाम; पालघर, ठाणे, रायगड: कातकरी

164. रोहा ते मंगळूर या 762 किलोमीटर लांबीच्या कोकण रेल्वेचा…… किमी मार्ग महाराष्ट्रात आहे?

उत्तर – 382

165. राज्यात….. या वर्षी कुटुंब कल्याण कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा परिषदांकडे सोपवण्यात आली

उत्तर – 1966

166. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, 2020-21 मधील उपलब्ध माहितीनुसार 2018-19 मधील स्थितीनुसार राज्यात पिकांखालील निव्वळ क्षेत्र…… हेक्टर इतके होते?

उत्तर – १,६८,१५,००० हेक्टर

167. तुलनेसाठी उपलब्ध असलेली माहिती(2018-19) लक्षात घेता राज्यातील पिकांखालील निव्वळ क्षेत्रापैकी….. इतके क्षेत्र अन्नधान्य पिकांमध्ये येते?

उत्तर – 65%

168. तुलनेसाठी उपलब्ध असलेली माहिती(2018-19) विचारात घेता राज्यातील पिकांखालील स्थूल क्षेत्रांपैकी किती टक्के क्षेत्र अन्य धान्य पिकांसाठी होते?

उत्तर – 47. 25%

169. राज्यात 2011-12 मध्ये एकूण लोकसंख्येशी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी…… इतकी होती?

उत्तर – 17.30 टक्के

170. भारताच्या एकूण परदेशी व्यापाऱ्याची सुमारे…… व्यापार मुंबई बंदरातून चालतो?

उत्तर – 25%

तर विद्यार्थी मित्रांनो Maharashtracha Bhugol in Marathi या लेखात दिलेल्या माहिती संबंधी तुम्हाला काही शंका असतील किंवा एखादा प्रश्न तुम्हाला समजला नसेल तर कमेंटमध्ये नक्की त्यासंबंधी शंका विचारा, आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांचं निरसन करायचा प्रयत्न करू.

हे देखील वाचा

Maharashtra General Knowledge in Marathi

Talathi Bharti Previous Year Question in Marathi

इतिहास MCQ Quiz in मराठी

Maharashtra Bhugol Questions in Marathi

Leave a Comment