Samajsudharak Questions in Marathi

Samajsudharak Questions in Marathi

Samajsudharak Questions in Marathi: विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत आपल्या महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे योगदान नाकारू शकत नाही हे लक्षात घेऊनच आजच्या या लेखामध्ये समाजसुधारकांसंबंधी आता पर्यंत विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न आजच्या लेखामध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.

1. ‘आधुनिक भगीरथ’ या शब्दात ज्यांचे वर्णन केले जाते त्या …… यांची तुलना अमेरिकेच्या ‘बुकर टी वॉशिंग्टन’शी करण्याचा मोह अनेकांचा होतो.

A. कर्मवीर भाऊ पाटील
B. राजश्री शाहू महाराज
C. महर्षी धो.के. कर्वे
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

2. (१) 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या हजारो अनुयायांसह नागपूर येथे आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला
(२) धर्मांतराचा मनोदय आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवले येथे व्यक्त केला होता.

(A) दोन्ही विधाने योग्य आहेत; दुसरे विधान पहिल्या विधानाचे कारण आहे
(B) दोन्ही विधाने योग्य आहेत: पहिले विधान दुसऱ्या विधानाचे कारण आहे
(C) दोन्ही विधाने योग्य आहेत
(D) दोन्ही विधाने अयोग्य आहेत

3. ….. यांनी 1928 मध्ये अमरावती मधील अंबादेवीचे देऊळ अनुसूचित जातींसाठी प्रवेश मुक्त व्हावे म्हणून सत्याग्रह केला.

A. भाऊसाहेब हिरे
B. विनोबा भावे
C. यशवंतराव चव्हाण
D. पंजाबराव देशमुख

4. …. यांनी महाराष्ट्रात शास्त्र जगद्गुरु पिठाची स्थापना करून व त्यावर सदाशिवराव बेनाडीकर या मराठी व्यक्तीची नेमणूक करून सनातनी वर्गाचा रोष ओढवून घेतला.

A. जेधे – जवळकर
B. राजश्री शाहू महाराज 
C. महात्मा फुले
D. ‘भाला’कार भोपटकर

5. माणसाच्या डोक्याच्या कवटीची नेहमीची अससमप्रमाण या विषयावर निबंध लिहून बर्लिन विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवणाऱ्या….. याच महाराष्ट्र लँड अँड इट्स पीपल या ग्रंथाच्या कर्त्या आहोत.

A. रमाबाई रानडे
B. आनंदीबाई उर्फ बाया कर्वे
D. इरावती कर्वे
D. दुर्गा भागवत

6. ….. हे गाडगे महाराज किंवा धोदडे बुवा म्हणून महाराष्ट्राला ज्ञात आहेत?

A. गोविंद विठ्ठल कुंटे
B. गोपाळ हरी देशमुख
C. डेबूजी झिंगराजी जानोरकर
D. गणेश वासुदेव जोशी

7. प्रभाकर पत्राचे कर्ते ….. यांना आपण भाऊ महाजन या नावानेच ओळखतो?

A. गोविंदराव कुंटे
B. भाऊ दाजी महाजन
C. आत्माराम पांडुरंग
D. गोपाळराव जोशी

8. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथालय कोणता ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर(१९५७) प्रकाशित झाला?

A. थॉट्स ऑन पाकिस्तान
B. हु वेअर द शुद्रास?
C. दि अनटचेबल्स
D. बुद्ध अँड हिज धम्म

9. …. यांनी 23 व 24 मार्च 1918 रोजी बडोदानरेश सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद आयोजित केली होती?

A. शंकर नायर
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. महर्षी वी. रा. शिंदे 
D. भास्करराव जाधव

10. प्रशासकीय प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून सन 1913 मध्ये कोल्हापुरात पाटील काढली……

A. भाई माधवराव बागल
B. बाळासाहेब खेर
C. कर्मवीर भाऊराव पाटील
D. राजश्री शाहू महाराज

महाराष्ट्रातील समाजसुधारक प्रश्न उत्तर

11. सन 1908 मध्ये रमाबाई रानडे यांनी पुणे येथे सेवा सदन ची स्थापना केली त्याच वर्षी मुंबई येथे….. यांनी ही सेवा सदन ची स्थापना केली?

A. बेहरामजी मलबारी
B. पंडिता रमाबाई
C. न्या. म. गो. रानडे
D. दादाभाई नवरोजी

12. अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी रुपी फंड कापड फंड व तांदूळ फंड असे विविध फंड चालू करण्यामागे…….. या समाजसुधारकाचा मोठा सहभाग होता?

A. महर्षी वी.रा. शिंदे
B. महात्मा ज्योतिबा फुले
C. डॉ बाबासाहेब आंबेडकर
D. गाडगे महाराज

13. राजश्री शाहूंनी….. येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली होती?

A. नाशिक
B. सातारा
C. कोल्हापूर
D. निपाणी

14. महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे संस्थापकत्व कोणाकडे जाते?

A. स्वातंत्र्यवीर सावरकर
B. लोकमान्य टिळक
C. डॉ. पंजाबराव देशमुख 
D. केशवराव जेधे

15. आजारी माणसांची सेवा करणे व निराश्रितांना आश्रय देणे, ही दोन कार्य करणाऱ्या निराश्रीत सेवादलाची ची स्थापना 1907 मध्ये….. या महान समाजसुधारकाने केली?

A. लाल लजपतराय
B. महर्षी वी.रा. शिंदे
C. महर्षी कर्वे
D. महात्मा गांधी

16. सामाजिक सुधारणांच्या प्रचार प्रसाराचे कार्य करणारे इंडियन स्पेक्टर हे इंग्रजी साप्ताहिक खालीलपैकी कोणी चालवले होते?

A. बेहरामजी मलबारी 
B. बाबा पदमजी
C. न्या. म. गो. रानडे
D. डॉ. रा. गो. भांडारकर

17. माती जागवील त्याला मत या पुस्तकाचे लेखन…… या महान समाजसुधारकाने केले आहे?

A. डॉ. आंबेडकर
B. विनोबा भावे
C. महर्षी शिंदे
D. डॉ. बाबा आमटे 

18. गांधीवादी तत्वांवर आधारित अशा इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या कामगार संघटनेची स्थापना….. स*** झाली

A. 1936
B. 1947
C. 1940
D. 1948

19. महर्षी वी.रा. शिंदे यांनी 18 ऑक्टोबर १९०६ रोजी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया या संस्थेचे प्रमुख उद्देश खालीलपैकी कोणते होते?

(१) मागासवर्गीयांचे शिक्षणाचा प्रसार घडवून आणणे
(२) मागासवर्गीय आज बांधवांना नोकरीच्या संधी मिळवून देणे
(३) मागासवर्गीयांमध्ये स्वजातीबद्दल अभिमानाची भावना निर्माण करणे
(४) मागासवर्गीय बांधवांना खऱ्या धर्माची शिकवण देऊन त्यांचे शील संवर्धन घडवून आणणे

संकेताक्षरांचा वापर करून योग्य पर्याय निवडा

(A) फक्त २ आणि ४
(B) फक्त १, २ व ४ 
(C) कोणतेही नाही
(D)फक्त २ व ३

20. अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी झगडणाऱ्या महर्षी वी. रा. शिंदे यांनी त्रावणकोर संस्थानात वायकोम येथे अनुसूचित जातींनी केलेल्या सत्याग्रहात भाग कोणत्या वर्षी घेतला होता?

A. 1921
B. 1924 
C. 1923
D. 1922

21. पुढे एका गटात समाजसुधारक तर दुसऱ्या गटांमध्ये त्यांनी चालवलेली वर्तमानपत्रे/ मुखपत्रे यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यांच्या सुयोग्य जोड्या जुळवा.

समाजसुधारक वर्तमानपत्र / मुखपत्र
य. महात्मा गांधी १. सुधारक
र. गो.ग. आगरकर २. हरिजन
ल. बाबासाहेब आंबेडकर ३. दर्पण
व. बाळशास्त्री जांभेकर ४. मूकनायक

A. य – २, र – १, ल – ४, व – ३ 
B. य – ३, र – १, ल – ४, व – २
C. य – १, र – ३, ल – ४, व – २
D. य – १, र – २, ल – ४, व – ३

22. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या सामाजिक संस्थांचा मला अनुक्रम लावा.

(१) विधवा विवाहोत्तेजक मंडळी
(२) निष्काम कर्ममठ
(३) समता संघाची स्थापना
(४) अनाथ बालिकाश्रम मंडळी

A. १, २, ३, ४
B. १, ४, २, ३ 
C. ४, ३, २, १
D.४, १, २, ३

23. स्त्रियांच्या उद्धारासाठी व स्त्रियांच्या उन्नतीसाठी 1883 मध्ये पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना करणाऱ्या……. या आनंद शास्त्री डोंगरे यांच्या कन्या होत.

A. रमाबाई रानडे
B. सरस्वतीबाई जोशी
C. पंडिता रमाबाई
D. सरोजिनी नायडू

24. गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित खालील विधानापैकी अचूक विधान ओळखा.

(१) गोपाळ हरी देशमुख यांनी चालवलेल्या लोकहितवादी या मासिका वरून त्यांना लोकहितवादी हे टोपण नाव मिळाले
(२) हिंदुस्तानच्या जनतेसाठी पार्लमेंट हवे हा विचार प्रथम गोपाळ हरी देशमुख यांनी मांडला

A. फक्त १
B. कोणतेही नाही
C. १ व २ दोन्ही 
D. फक्त २

25. ‘बहुजन-समाज’ हा शब्द…… यांनी सन १९२०-२१ च्या दरम्यान महाराष्ट्रात रूढ केला

A. केशवराव जेधे
B. राजश्री शाहू महाराज
C. महर्षी वी. रा. शिंदे
D. दिनकरराव जवळकर

26. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी खालीलपैकी कोणती सामाजिक सुधारणेचे कार्य केली

(१) 1946 मध्ये अमरावती येथे कुष्ठरोगाच्या पुनर्वसनासाठी तपोवन जगदंबा कुष्ठधामाची स्थापना केली
(२) दोघांच्या दृष्टीने अन्यायकारक असलेल्या 1898 चा भारतीय कुष्ठरोगी कायदा रद्द करून घेण्यात यश मिळवले

A.  फक्त १
B. १ व २ 
C.  फक्त २
D.   कोणतेही नाही

27. ….. यांनी नवयुग या साप्ताहिकाचा खास नाना पाटील गौरवांक काढून त्यांना क्रांतिसिंह ही पदवी दिली.

A. आचार्य प्र. के. अत्रे
B. प्रबोधनकार ठाकरे
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. यशवंतराव चव्हाण

28. वादाला भौतिकवाद व बुद्धिवाद यांची जोड देऊन सर्वांगीण सामाजिक सामाजिक कारणांचा आग्रहाने पाठपुरवठा करणाऱ्या….. या थोर समाजसुधारकांची पुण्यातील सनातन्यांनी त्यांच्या हयातीतच प्रेतयात्रा काढली होती?

A. सुधारक आगरकर 
B. महात्मा फुले
C. रा. गो भांडारकर
D. न्यायमूर्ती रानडे

29. सन 1832 मध्ये ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले साप्ताहिक व 1840 मध्ये ‘दिग्दर्शन’ हे पहिले मराठी मासिक सुरू करणारे…… यांचा मराठी वर्तमानपत्राचे जनक म्हणून यथार्थ गौरव केला जातो.

A. बाळशास्त्री जांभेकर
B. गोपाळ हरी देशमुख
C. विष्णुशास्त्री चिपळूणकर
D. गोपाळ गणेश आगरकर

30. दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाची खालीलपैकी कोण संबंधित आहे?

A. महर्षी वी.रा. शिंदे
B. राजश्री शाहू महाराज
C. महात्मा फुले
D. भाई माधवराव बागल

31. सन 1870 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक सभेचे पूर्वरूप असलेली पूना असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली होती?

A. 1863
B. 1835
C. 1867
D. 1860

32. खालीलपैकी कोणते विधान गोपाळ कृष्ण गोखले यांच्या बाबतीत अयोग्य आहे?

(A) त्यांचा 1909 च्या मॉर्ले – मिंटो सुधारणा कायद्याच्या जडणघडणीत महत्त्वाचा भाग होता
(B) त्यांची 1905 मध्ये बनारस येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती
(C) त्यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली
(D) ते आगरकरांनी सुरू केलेल्या केसरी वर्तमानपत्राच्या इंग्रजी विभागाचे संपादक होते 

33. पंडिता रमाबाई यांनी 11 मार्च 1889 रोजी मुंबई येथे स्थापन केलेल्या…. या संस्थेतील पहिल्या महिला विद्यार्थिनी गोदुताई म्हणजेच नंतरच्या आनंदीबाई बाया कर्वे होत.

A. सेवा सदन
B. शारदा सदन
C. मुक्ती सदन
D. बालिकाश्रम

34. ‘शून्यलब्धी’ वर मराठी भाषेत पुस्तक लिहिले व प्राचीन भारतीय शिलालेख आणि ताम्रपट यांचे संशोधन करून त्यावर विद्वत्तापूर्ण लेख लिहिले ते कोण?

A. बाळशास्त्री जांभेकर
B. डॉ. भाऊ दाजी लाड
C. गणेश वासुदेव जोशी
D. रँगलर परांजपे

35. 1 सप्टेंबर 1848 रोजी सामाजिक जागृतीचा उद्देशाने मुंबई स्थापन झालेले ज्ञानप्रसारक सभेच्या मराठी विभागाचे अध्यक्ष कोण होते?

A. विष्णू भिकाजी गोखले
B. आत्माराम पांडुरंग
C. भाऊ महाजन
D. दादोबा पांडुरंग

36. ….. यांनी 1933 मध्ये भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ लिहून या प्रश्नाकडे समाजाचे लक्ष वेधले?

A. दादासाहेब रूपवते
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. महर्षी वी. रा. शिंदे 
D. भाई माधवराव बागल

37. कृपा, प्रीती, शांती, शारदा, मुक्ती यांसारखी सदने स्थापन करून अनाथ महिला-बालकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या…… यांना त्यांच्या विद्येने व पंडित त्याने प्रभावित होऊन कोलकत्ता येथील विद्वानांनी सिनेट हॉलमध्ये ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या पदव्या देऊन गौरविले.

A. विजयालक्ष्मी पंडित
B. सरोजिनी नायडू
C. रमाबाई अनंत शास्त्री डोंगरे
D. रमाबाई रानडे

38. खालीलपैकी कोण सार्वजनिक सभेची संबंधित नव्हते?

A. लोकमान्य टिळक
B. गणेश वासुदेव जोशी
C. गोपाळ गणेश आगरकर
D. न्यायमूर्ती रानडे

39. …. यांनी 1897 मधील वेल्बी कमिशनपुढील आपल्या साक्षीत हिंदुस्थानाच्या राज्यकारभारावर बेसुमार खर्च व अतिरिक्त करवाढ या बाबींवर नेमके बोट ठेवले?

A. न्या. म. गो. रानडे
B. दादाभाई नौरोजी
C. महात्मा ज्योतिबा फुले
D. गोपाळ कृष्ण गोखले

40.
(१) संमतीवय विधेयक मांडले जाण्यात बेहरामजी मलबारी या सुधारकाचे योगदान महत्वपूर्ण होते.
(२) लोकमान्य टिळकांनी संमती वय या विधेयकास विरोध केला
(३) प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले संस्थान अमान बडोदा संस्थानात सयाजीराव गायकवाड यांनी मिळवून दिला

वरील विधानापैकी कोणते विधान अयोग्य नाही?

A. फक्त १ व २
B. फक्त २
C. १, २ व ३
D. फक्त २ व ३

41. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी राजकारणाच्या संदर्भात मांडलेला महत्त्वाचा विचार……

A. राजकारणाचे सार्वत्रिकीकरण
B. राजकारणाचे अध्यात्मिकिकरण 
C. राजकारणाचे ध्रुवीकरण
D. राजकारणाचे उच्चाटन

42. महर्षी धोके कर्वे यांच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे.

A. यांना भारत सरकारने 1955 मध्ये विभूषण 1958 मध्ये भारतरत्न हे सन्मान प्रदान करून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.
B. उक्तीप्रमाणे कृती या न्यायाने यांनी 11 मार्च 1893 रोजी गोदुताई नावाच्या विधवा स्त्रीशी पुनर्विवाह केला
C. सन 1916 मध्ये यांनी महाराष्ट्रातील पहिल्या स्वतंत्र अशा महिला विद्यापीठाची स्थापना केली
D. या समाजसेवकाने जननिंदेची तमा न बाळगता आयुष्यभर स्वतःस संततीनियमाच्या कार्यास वाहून घेतले 

43. राष्ट्रीय स्तरावर व राष्ट्रव्यापी स्वरूपात अस्पृश्यता- निवारणाचे कार्य करण्यासाठी 1933 मध्ये हरिजन सेवक संघाची स्थापना केली त्याच वेळी हरिजन नावाचे साप्ताहिक सुरू केले…

A. बाबासाहेब आंबेडकर
B. प्रा. ग. बा. सरदार
C. महात्मा गांधी
D. महर्षी वी.रा. शिंदे

44. …… या पुरोगामी राजास पंडित मदन मोहन मालवीय यांनी हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा या शब्दात गौरविले आहे.

A. छत्रपती शिवाजी महाराज
B. सयाजीराव गायकवाड
C. नानासाहेब पेशवे
D. राजश्री शाहू महाराज

45. महाडच्या चवदार तळ्या वरील सत्याग्रह: 20 मार्च 1927, मनुस्मृतीचे दहन: 25 डिसेंबर 1927 व नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह: या तीनही सामाजिक व धार्मिक कृतिशी खालीलपैकी कोण संबंधित आहेत?

A. डॉ. शिवाजीराव पटवर्धन
B. राजश्री शाहू महाराज
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. डॉ. पंजाबराव देशमुख

46. 31 ऑक्टोबर 1920 रोजी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ची स्थापना केली गेली. ही स्थापना खालीलपैकी कुठे केली गेली?

A. सुरत
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. कोलकाता

47. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस मध्ये 1929 मध्ये पडलेल्या फुटीनंतर स्थापन करण्यात आलेल्या इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन या कामगार संघटनेच्या स्थापनेत…… यांचा सहभाग महत्त्वाचा होता

A. एस. एम. जोशी
B. श्रीपाद अमृत डांगे
C. म. ना. जोशी 
D. बी. टी. रणदिवे

48. खालीलपैकी कोणास आपण रैंगलर परांजपे म्हणून ओळखतो?

A. शिवरामपंत परांजपे
B. काळकर्ते परांजपे
C. रघुनाथराव पुरुषोत्तम परांजपे 
D. केशवराव परांजपे

49. राजश्री शाहू महाराजएक गाव एक पाणवठा, देवदासी प्रथा निर्मूलन, धरणग्रस्त पुनर्वसन यांसारख्या परिवर्तनवादी चळवळीशी निगडित असलेले विद्यमान सामाजिक नेतृत्व…..

A. बाबा आमटे
B. डॉ. बाबा आढाव 
C. भाई माधवराव बागल
D. शिवाजीराव पटवर्धन

50. ‘घरचा पुरोहित’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक….. हे आहेत?

A. भाई बागल
B. बाबा आढाव
C. राजश्री शाहू महाराज
D. भास्करराव जाधव

51. ‘अस्पृश्यांचा सर्वोत्तम मित्र’ असे शाहू महाराजांच्या संदर्भात कोणी म्हटले आहे?

A. महर्षी वी. रा. शिंदे
B. भाई माधवराव बागल
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. सयाजीराव गायकवाड

52. खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना न्या. रानडे यांनी केली, असे म्हणता येणार नाही?

A. नगर वाचन मंदिर, पुणे
B. हिंदू व्हिडिज होम
C. वकृत्वजकी सभा
D. पुना असोसिएशन

53. ‘मराठी सत्तेचा उत्कर्ष’ हा ग्रंथ लिहून मराठ्यांच्या इतिहासाचा पहिला इतिहासकार ग्रँट डफ याने केलेल्या चुका निदर्शनास आणून देण्याचे कार्य करणारे महाराष्ट्रीय विचारवंत…….

A. रा. गो. भंडारकर
B. भारतसेवक गोखले
C. न्या. म. गो. रानडे 
D. सुधारक आगरकर

54. भारतात प्रागतिक सदनशीर राजकारणाचा पाया घालणाऱ्या…… यांचे ‘ कार्य करताना येणारा मृत्यू सर्वोत्तम!’ हे उद्गार प्रसिद्ध आहेत?

A. दादाभाई नौरोजी
B. भास्कर चंदावरकर
C. न्या. म. गो. रानडे 
D. गोपाळ कृष्ण गोखले

55. ‘गुलामांचे राष्ट्र’ ग्रंथातून भारतीयांच्या दोषांवर आणि विशेषतः त्यांच्या आळशी वृत्तीवर कोरडे ओढणाऱ्या……. यांचा ‘स्त्रियांनी जॉकीटे घातलीच पाहिजे’ या विषयावरील निबंध काही काळ महाराष्ट्रात वादळ उठून गेला?

A. गोपाळ हरी देशमुख
B. गोपाळ गणेश आगरकर
C. रा. गो. भांडारकर
D. विष्णुशास्त्री चिपळूणकर

56. खालील ग्रंथ संपदेचे ग्रंथकार कोण आहेत.

१. केसरीतील निवडक निबंध
२. सुधारक आतील वेचक लेख
३. शेठ माधवदास व धनकुवारबाई यांचे पुनर्विवाहचरित्र
४. वाक्य मीमांसा व वाक्यांचे पृथक्करण

A. लोकमान्य टिळक
B. महर्षी धोंडो केशव कर्वे
C. गो. ग. आगरकर
D. र. धो. कर्वे

57. ‘शाहू राजा नुसता मराठा नव्हता, ब्राम्हणोत्तर हि नव्हता. तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष होता. तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता’ या शब्दात……. या दुसऱ्या कर्त्या समाजसुधारकाने शाहू महाराजांचा गौरव केला होता.

A. भाई माधवराव बागल
B. कर्मवीर भाऊराव पाटील
C. ‘प्रबोधन’कार ठाकरे
D. महर्षी वी. रा. शिंदे 

58. ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथील आदिवासींसाठी कार्य करणाऱ्या, स्त्री शिक्षण, स्त्री जागृती, आदिवासी शिक्षण इत्यादी विविध अंगांनी समाजसेवा करून ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

A. सिंधुताई पटवर्धन
B. अनुताई वाघ
C. गोदावरी परुळेकर
D. मेधा पाटकर

59. सन 1920 मध्येही 14 दिवसांची पूर्वसूचना देऊन केलेला आंतरजातीय विवाह……. संस्थानात कायदेशीर गणला जाई.

A. जुनागड
B. सांगली
C. कुरुंदवाड
D. करवीर 

60. 12 डिसेंबर 1920 रोजी पुण्यातील जेधे मॅन्शन येथे….. या पक्षाची व संघटनेची स्थापना करण्यात आली?

A. शेड्युल कास्ट फेडरेशन
B. ब्राम्हणोत्तर लीग 
C. मराठा महासंघ
D. जस्टीस पार्टी

मित्रांनो Samajsudharak Questions in Marathi या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट मध्ये नक्की विचारा आम्ही लवकरात लवकर तुमच्या शंकांचे निवारण करण्याचा प्रयत्न करू.

हे देखील वाचा

G. B. Sardar Information in Marathi

Lokmanya Tilak Questions in Marathi

Leave a Comment