प्रा. ग. बा. सरदार यांची संपूर्ण माहिती | G. B. Sardar Information in Marathi

प्रा. ग. बा. सरदार यांची संपूर्ण माहिती | G.B. Sardar Information in Marathi

G. B. Sardar Information in Marathi: ग. बा. सरदार यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1908 रोजी पालघर जिल्ह्यात जव्हार येथे झाला. हे महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीचे अग्रणी नामवंत साहित्यिक आणि थोर पुरोगामी विचारवंत होते. इ.स. 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात यांनी सहभाग घेतला. गांधीजींच्या विधायक चळवळी द्वारा स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय होते. तथापि राजकारणात न राहता स्वतःस महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळी व चळवळीच्या माध्यमातून सामाजिक प्रकरणात वाहून घेतले.

गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचे कार्य

1. सामाजिक चळवळीत वैचारिक बैठक पुरवताना सरदार यांनी कुठेही टोकाची भूमिका घेतली नाही. संयमी संघर्ष व विधायक कार्य यावर त्यांचा भर होता.

2. सरदारांचे एकूण 20 ग्रंथ प्रकाशित झाले असून त्यांच्या वैचारिक समाज प्रबोधनात्मक व संत वांग्मयविषयक  ग्रंथांनी महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात एक योग्य दिशा दाखवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

3. संत वाड्मयाची सामाजिक फलश्रुती, संत साहित्याची सामाजिक आणि राष्ट्रीय कामगिरी, अर्वाचीन मराठी ग्रंथाची पूर्वपीठिका, रामदास दर्शन, महाराष्ट्र जीवन, महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी, गांधी आणि आंबेडकर हे सरदारांनी दिलेल्या ग्रंथांपैकी काही प्रसिद्ध ग्रंथ होते.

4. 1980 च्या बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 54 व्या अधिवेशनाचे हे अध्यक्ष होते. 1981 मध्ये प्रवरानगर येथे झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे हे अध्यक्ष होते. 1982 मध्ये भटक्या व विमुक्त जाती संघटनेच्या पिंपरी येथील अधिवेशनाचे देखील हे अध्यक्ष होते.

5. यांचा मृत्यू 1 डिसेंबर 1988 रोजी पुण्यामध्ये झाला.

हे देखील वाचा

Srinivas Ramanujan Biography in Marathi

Biography of Sardar Vallabh Bhai Patel in Marathi

Leave a Comment