सरदार वल्लभ भाई पटेल मराठी माहिती । Biography of Sardar Vallabh Bhai Patel in Marathi

सरदार वल्लभ भाई पटेल मराठी माहिती । Biography of Sardar Vallabh Bhai Patel in Marathi

Biography of Sardar Vallabh Bhai Patel in Marathi: भारताचे प्रथम उप प्रधानमंत्री आणि गृहमंत्री सरदार पटेल लोकप्रिय लोहपुरुष(Iron man of India) या नावाने सुद्धा ओळखले जायचे. त्यांचे पूर्ण नाव वल्लभ भाई पटेल होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि भारताचे प्रथम उप प्रधानमंत्री आणि गृहमंत्री बनले. त्यांना भारताचे राजकीय एकत्रीकरणाचे श्रेय दिले जाते. म्हणून त्यांना Bismark Of India म्हणून देखील ओळखले जाते.

सरदार वल्लभ भाई पटेल यांनी ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध खेडा सत्याग्रह आणि बारडोली विद्रोहाचे यशस्वीरित्या नेतृत्व केले. 1922 ,1924 आणि 1927 मध्ये अहमदाबाद नगर निगमचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, 1931 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, स्वतंत्र भारताचे पहिले उपप्रधान मंत्री आणि गृहमंत्री बनले, भारताच्या राजकीय एकत्रीकरणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, 1991 मध्ये भारतरत्न पुरस्कारासाठी यांचे नाव निश्चित झाले.

  • राजकारणी व स्वातंत्र्य सैनिक:- सरदार वल्लभ भाई पटेल
  • जन्म: 31 ऑक्टोबर, 1875
  • मृत्यू: 15 डिसेंबर, 1950

आरंभिक जीवन | Early Life of Sardar Vallabh Bhai Patel in Marathi

Early Life of Sardar Vallabh Bhai Patel in Marathi
Early Life of Sardar Vallabh Bhai Patel in Marathi

 

वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 ला गुजरातच्या एका छोट्या गावात नाडियाड मध्ये झाला होता. त्यांचे वडील झावेरभाई एक शेतकरी होते आणि आई लाडबाई एक साधारण महिला होती. सरदार वल्लभभाई यांची प्राथमिक शिक्षा करमसद मध्ये झाली. नंतर त्यांनी पेटलादच्या एका विद्यालयात प्रवेश घेतला. दोन वर्षानंतर त्यांनी नाडियाड शहराच्या एका कनिष्ठ विद्यालयामध्ये प्रवेश घेतला. ते कनिष्ठ विद्यालयाची परीक्षा 1896 मध्ये उत्तीर्ण झाले. सरदार वल्लभ भाई पटेल आपल्या पूर्ण शिक्षणाच्या दरम्यान एक हुशार विद्यार्थी होते.

वल्लभ भाई यांना वकील बनायचे होते आणि आपल्या या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी त्यांना इंग्लंडला जायचे होते परंतु त्यांच्याकडे आर्थिक साधन नसल्यामुळे त्यांनी एका भारतीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. त्या काळात उमेदवार स्वतंत्रपणे अभ्यास करून law च्या परीक्षेला बसू शकत होता. शेवटी सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या एका परिचित वकिलाकडून पुस्तके उधार घेतली आणि घरीच अभ्यास चालू केला. वेळोवेळी त्यांनी कोर्टाच्या कार्यवाही मध्ये पण भाग घेतला आणि वकिलांचे युक्तिवाद काळजीपूर्वक ऐकले. नंतर वल्लभभाई पटेल हे लॉ च्या परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले.

करियर | Career Information about Sardar Vallabh Bhai Patel in Marathi

Information about Sardar Vallabh Bhai Patel in Marathi
Information about Sardar Vallabh Bhai Patel in Marathi

यानंतर सरदार पटेल यांनी गोध्रा येथे कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली आणि लवकरच त्यांची वकिली लोकप्रिय झाली. त्यांचा विवाह झावेरबा यांच्यासोबत झाला. 1904 मध्ये पूत्री मणिबेन आणि 1905 मध्ये पुत्र दह्याभाईचा जन्म झाला. वल्लभ भाई ने आपले मोठे भाऊ विठ्ठल भाई जे स्वतः एक वकील होते त्यांना कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले. पटेल फक्त 33 वर्षांचे होते जेव्हा त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांची पुन्हा विवाह करण्याची इच्छा नव्हती. आपला मोठा भाऊ परतल्यानंतर वल्लभभाई इंग्लंडला गेले आणि त्यांनी एकचित्त आणि परिश्रमपूर्वक अभ्यास केला आणि कायद्याच्या परीक्षेत पहिले आले.

सरदार वल्लभभाई पटेल 1913 मध्ये भारतात परतले आणि अहमदाबाद मध्ये वकिली सुरू केली. लवकरच ते लोकप्रिय झाले. आपल्या मित्रांच्या आग्रहामुळे पटेल यांनी 1917 मध्ये अहमदाबादच्या सैनिटेशन कमिश्नर ची निवडणूक लढली आणि विजयी झाले. सरदार वल्लभभाई पटेल गांधीजींच्या चंपारण सत्याग्रहाच्या यशामुळे खूप प्रभावीत होते. 1918 मध्ये गुजरातच्या खेडा खंड मध्ये दुष्काळ पडला. शेतकऱ्यांनी कर कमी करण्याची मागणी केली परंतु ब्रिटिश सरकारने नकार दिला.गांधीजींनी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला पण त्यांना आपला संपूर्ण वेळ खेड्यात घालवता आला नाही, म्हणून ते त्यांच्या अनुपस्थितीत या संघर्षाचे नेतृत्व करू शकतील अशा व्यक्तीच्या शोधात होते. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल स्वइच्छेने पुढे आले आणि या संघर्षाचे नेतृत्व केले.अशा प्रकारे त्यांनी यशस्वी वकिलीचा व्यवसाय सोडून सामाजिक जीवनात प्रवेश केला.

राजकीय जीवन | Political Life of Sardar Vallabh Bhai Patel in Marathi

सरदार वल्लभभाई पटेल यांनी खेडामध्ये शेतकऱ्यांच्या संघर्षाचे यशस्वीरित्या नेतृत्व केले याच्या परिणाम स्वरूपात ब्रिटिश सरकारने महसूलाच्या वसुली वरती रोख लावली व लावलेले कर परत घेतले आणि वर्ष 1919 मध्ये हा संघर्ष संपला.खेडा सत्याग्रहातून वल्लभभाई पटेल राष्ट्रीय नायक म्हणून उदयास आले. वल्लभभाई यांनी गांधीजींच्या असहयोग आंदोलनाचे समर्थन केले आणि गुजरात काँग्रेसचे अध्यक्षच्या रूपात अहमदाबाद मध्ये ब्रिटिश वस्तूंच्या बहिष्काराच्या आयोजनामध्ये मदत केली. त्यांनी आपल्या विदेशी वस्त्रांचा त्याग करून खादी वस्त्र घालण्यास सुरुवात केली. सरदार वल्लभभाई पटेल 1922, 1924 आणि 1927 मध्ये अमहदाबाद नगर चे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांच्या कार्यकाळात अहमदाबादमधील शिक्षणात सुधारणा झाली व वीजपुरवठा वाढल . संपूर्ण शहरात ड्रेनेज आणि स्वच्छता व्यवस्था विस्तारित करण्यात आली.

वर्ष 1928 मध्ये गुजरातचा बार्डोली तालुका पूरग्रस्ता ने बाधित होता. संकटाच्या या परिस्थितीमध्ये ब्रिटिश सरकारने महसूल करांना 30 गुणांनी वाढवले.सरदार पटेल शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बाहेर आले आणि त्यांनी गव्हर्नर ला कर कमी करण्याची विनंती केली. गव्हर्नर ने त्यांना नकार दिला आणि सरकारने या करांना वसूल करण्याच्या तारखेची घोषणा केली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून करांची एक सुद्धा किंमत न देण्याची सूचना दिली. सरकारने या संघर्षाला दाबण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर त्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढे झुकावे लागले. बार्डोलीच्या या संघर्षादरम्यान आणि नंतर मिळवलेल्या विजयामुळे सरदार पटेलांची राजकीय उंची संपूर्ण भारतात उंचावली.पटेलांना आता त्यांचे सहकारी आणि अनुयायी सरदार म्हणून संबोधू लागले.

1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहाच्या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली ज्याने पूर्ण गुजरात मध्ये आंदोलन झाले व ब्रिटिश सरकार ला गांधी आणि पटेल यांना सोडण्यास भाग पाडले. यानंतर त्यांना मुंबईमध्ये परत एकदा अटक केले गेले.1931 मध्ये गांधी-आयर्विन करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, सरदार पटेल यांची तुरुंगातून सुटका झाली आणि 1931 च्या कराचीतील अधिवेशनासाठी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.लंडनमधील गोलमेज परिषदेच्या अपयशानंतर, गांधीजी आणि सरदार पटेल यांना जानेवारी 1932 मध्ये अटक करण्यात आली आणि येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले. तुरुंगवासाच्या या काळात सरदार पटेल आणि महात्मा गांधी एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्यात स्नेहाचे, विश्वासाचे आणि स्पष्टतेचे खोल बंध निर्माण झाले. सरदार पटेल यांची अखेर जुलै 1934 मध्ये सुटका झाली.

ऑगस्ट 1942 मध्ये काँग्रेसने भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली. सरकारने वल्लभभाई पटेल सोबत काँग्रेसच्या सर्व मोठ्या नेत्यांना कारावास मध्ये टाकले. सर्व नेत्यांना तीन वर्षानंतर सोडण्यात आले. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आणि प्रथम उपप्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल झाले. याव्यतिरिक्त, त्यांच्याकडे गृह मंत्रालय, माहिती आणि प्रसारण आणि राज्य मंत्रालयाचाही कार्यभार होता.

संस्थानांचे विलीनीकरण

स्वातंत्र्याच्या वेळेस भारतामध्ये एकूण 565 संस्थान होते. काही महाराज आणि नवाब यांचे या संस्थानांवरती शासन होते, यांच्यातील काही जागरूक आणि देशभक्त होते पण काही पैसे आणि सत्तेच्या नशेमध्ये होते. जेव्हा इंग्रजांनी भारत सोडले तेव्हा ते स्वतंत्र शासक बनण्याचे स्वप्न बघत होते. स्वतंत्र भारताच्या सरकारने त्यांना समान दर्जा द्यावा, असे ब्रिटिशांनी मत मांडले होते. त्यांच्यापैकी काहींनी तर युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये आपले प्रतिनिधी पाठवण्याची योजना आखण्यापर्यंत मजल मारली. पटेलांनी भारतातील राजांकडून देशभक्तीची मागणी केली आणि त्यांना देशाच्या स्वातंत्र्याची काळजी घेण्यास आणि जबाबदार राज्यकर्त्यांसारखे वागण्यास सांगितले ज्यांना केवळ आपल्या प्रजेच्या भविष्याची काळजी आहे.

त्यांनी 565 संस्थानांच्या राजांना स्पष्ट केले की त्यांचे स्वतंत्र राज्याचे स्वप्न अशक्य आहे आणि भारतीय प्रजासत्ताकाचा भाग बनणे त्यांच्यासाठी चांगले आहे. त्यानंतर त्यांनी मोठ्या हुशारीने आणि राजकीय दूरदृष्टीने छोट्या संस्थानांचे संघटन केले. या उपक्रमात संस्थानिकांनीही त्यांना साथ दिली त्यांनी हैदराबादचा निजाम आणि जुनागढचा नवाब ज्यांना सुरुवातीला भारतात सामील व्हायचे नव्हते त्यांच्यावर नियंत्रण ठेवले. एका विखुरलेल्या देशाला त्यांनी कोणताही रक्तपात न करता एकत्र केले. या प्रचंड कामगिरीसाठी सरदार पटेल यांना लोहपुरुष ही पदवी मिळाली.

सरदार वल्लभभाई पटेल यांचे 15 डिसेंबर 1950 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

सरदार पटेल यांना 1991 मध्ये त्यांच्या देशासाठी केलेल्या सेवेसाठी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Final Words

तर मित्रांनो मला अशा आहे Biography of Sardar Vallabh Bhai Patel in Marathi या लेखातून तुम्हाला सरदार पटेल यांचे जीवन आणि कार्य समजून घ्यायला मदत झाली असेल. काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा

Cabin crew म्हणजे काय असते?

Atal Bihari Vajpayee Biography in Marathi

Leave a Comment