Police Bharti Science Questions in Marathi 2024

Police Bharti Science Questions in Marathi 2024

विज्ञान हा विषय आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेले आहे. या जगातील प्रत्येक मनुष्य हा पूर्णपणे विज्ञानावर अवलंबून असतो. विज्ञान हा विषय शाळेतहीमहत्त्वाचा विषय मानला जातो. तसेच महाराष्ट्रात होणाऱ्या पोलीस भरती परीक्षेमध्ये देखील विज्ञान या विषयावर भरपूर प्रश्न विचारले जातात, म्हणूनच आजच्या या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे Police Bharti Science Questions in Marathi.

Q. खालीलपैकी कोणते प्राणी ‘उभयचर’ वर्गातील आहेत ?

(१) सरडा
(२) पाल
(३) कासव
(४) सॅलॅमंडर
(५) टोड
(६) राना टायग्रीना

A. फक्त २, ३ व ५
B. फक्त १, ५ व ६
C. फक्त ४, ५ व ६
D. फक्त ३, ४, ५ व ६

उत्तर: C. फक्त ४, ५ व ६

Q. खालीलपैकी काय कॅल्शिअमने समृद्ध आहे?

A. तूप
B. दूध
C. अंडी
D. सफरचंद

उत्तर: B. दूध

Q. कॉस्टिक सोड्यामध्ये खालीलपैकी काय असते?

A. कार्बन, ऑक्सिजन, सोडिअम
B. सोडिअम, कार्बन, हायड्रोजन
C. ऑक्सिजन, सोडिअम, सल्फेट
D. सोडिअम, हायड्रोजन, ऑक्सिजन

उत्तर: D. सोडिअम, हायड्रोजन, ऑक्सिजन

Q. सुयोग्य जोड्या जुळवा.

रोग: रोगकारक सजीव
(१) मलेरिया: (य) जिवाणू
(२) कुष्ठरोग: (र) प्रोटोझोआ
(३) पोलिओ: (ल) आरएनए विषाणू
(४) एड्स: (व) डीएनए विषाणू

A. १-व, २-ल, ३-र, ४-य
B. १-ल, २-व, ३-र, ४-य
C. १-य, २-र, ३-ल, ४-व
D. १-र, २-य, ३-व, ४-ल

उत्तर: D. १-र, २-य, ३-व, ४-ल

Q. खालीलपैकी कोणत्या स्वरूपात वनस्पती नायट्रोजन मिळवितात ?

A. नायट्रेट्स
B. नायट्रोसल्फेट
C. नायट्रॉक्साइड
D. नायट्रो-अमोनिअम

उत्तर: A. नायट्रेट्स

Q. खालीलपैकी कोणता/ते पर्याय अयोग्य आहे/त?

(१) आंबविलेल्या सफरचंदाचा रस हा एक वाइनचा प्रकार नाही.
(२) चॉर्डनने हे व्हिटीस विनिफेराचा एक प्रकार आहे.
(३) स्थिर वाइन बनविण्यासाठी काही द्राक्षांच्या जातींमध्ये साखर घातली जाऊ शकते.
(४) कमी मद्यार्क असलेली वाइन स्थिर असते.

A. फक्त २
B. फक्त १ व २
C. फक्त १ व ४
D. फक्त ३.

उत्तर: C. फक्त १ व ४

Q. पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/त?

(१) चंद्रावर गेलेल्या माणसांना आकाश काळे दिसते.
(२) बांबू म्हणजे एक प्रकारचे गवतच होय.
(३) हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण सर्वाधिक असते.

A. १, २ व ३
B. फक्त ३
C. फक्त १
D. कोणतेही नाही

उत्तर: D. कोणतेही नाही

Q. “वनस्पतींनाही भावना, संवेदना असतात” या शोधामुळे प्रसिद्धी पावलेले भारतीय शास्त्रज्ञ

A. डॉ. हरगोविंद खोराणा
B. जगदीशचंद्र बोस
C. डॉ. जयंत नारळीकर
D. बिरबल सहानी

उत्तर: B. जगदीशचंद्र बोस

Q. खालीलपैकी कोणते जळण वायुरूप नाही?

A. स्पिरिट
B. मिथेन
C. प्रोपेन
D. ब्युटेन

उत्तर: A. स्पिरिट

Q. ………हे खत रंगहीन असते.

A. सोडिअम नायट्रेट
B. अमोनिअम नायट्रेट
C. सुपर फॉस्फेट
D. युरिया

उत्तर: B. अमोनिअम नायट्रेट

Q. अचूक जोड्या ओळखा.

(१) विद्युत्प्रवाह : अॅम्पिअर
(२) विद्युत विभवांतर : कूलोम
(३) विद्युत्प्रभार : व्होल्ट
(४) विद्युत्रोध: ओहम

A. फक्त १ व ४
B. फक्त १ व ३
C. फक्त २ व ३
D. फक्त १, २ व ४

उत्तर: A. फक्त १ व ४

Q. ……….ला ‘रसायनांचा राजा’ असे संबोधतात.

A. सल्फ्युरिक एसिड
B. नायट्रिक एसिड
C. पोटॅशिअम सायनाइड
D. सोडिअम-बाय-कार्बोनेट

उत्तर: A. सल्फ्युरिक एसिड

Police bharti science general knowledge questions in marathi

Q. हवेत तापविल्यानंतरही ……. या धातूंचे ऑक्सिडेशन होत नाही?

A. सोने व प्लॅटिनम
B. तांबे व शिसे
C. लोह व क्रोमिअम
D. लोह व जस्त

उत्तर: A. सोने व प्लॅटिनम

Q. बेकिंग सोडा म्हणजे ….

A. सोडिअम कार्बोनेट
B. सोडिअम क्लोराइड
C. सोडिअम बाय-कार्बोनेट
D. सोडिअम हायड्रॉक्साइड

उत्तर: C. सोडिअम बाय-कार्बोनेट

Q. ‘विषाणू’ हे इतके सूक्ष्म असतात की ते फक्त …. च्या साहाय्यानेच दिसू शकतात.

A. दुर्बीण
B. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप
C. मायक्रोस्कोप
D. इलेक्ट्रॉन टेलिस्कोप

उत्तर: B. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप

Q. खांद्याचा सांधा हे…. या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण होय.

A. उखळीचा सांधा
B. बिजागरीचा सांधा
C. खिळीचा सांधा
D. सरकता सांधा

उत्तर: A. उखळीचा सांधा

Q. गुडघ्याचा व कोपराचा सांधा हे सांध्याच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण होय ?

A. बिजागरीचा सांधा
B. उखळीचा सांधा
C. खिळीचा सांधा
D. सरकता साधा

उत्तर: A. बिजागरीचा सांधा

Q. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

(१) लाळेतील टायलीनची प्रक्रिया स्टार्चवर होऊन माल्टोज तयार होते.
(२) गव्हामध्ये साधारणतः 12 टक्के प्रथिने असतात.
(३) केसीन या घटकद्रव्यामुळे दूध गोड लागते.

A. फक्त १ व २
B. फक्त २ व ३
C. फक्त १ व ३
D. कोणतेही नाही.

उत्तर: A. फक्त १ व २

Q. खालील प्राणी विचारात घ्या.

(१) फुरसे
(२) मुंगूस
(३) मगर
(४) सरडा
(५) जेको

कोणते प्राणी सरीसृप वर्गात मोडतात ?

A. ३ सोडून सर्व
B. २ सोडून सर्व
C. ५ सोडून सर्व
D. १ सोडून सर्व

उत्तर: B. २ सोडून सर्व

Q. ‘नायक्रोम’ या मिश्रधातूमध्ये…. हे धातू असतात.

A. लोखंड, तांबे, जस्त व निकेल
B. क्रोमिअम, तांबे व मँगनीज
C. लोखंड, निकेल, क्रोमिअम व मँगनीज
D. तांबे, लोखंड व क्रोमिअम

उत्तर: C. लोखंड, निकेल, क्रोमिअम व मँगनीज

Q. इंद्रधनुष्यातील सातही रंग एकत्र आल्यास खालीलपैकी कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल ?

A. पांढरा
B. तांबडा
C. निळा
D. काळा

उत्तर: A. पांढरा

Q. ‘निकटदृष्टिता’ हा दोष असलेल्या व्यक्तीस ….

(१) जवळचे स्पष्ट दिसते.
(२) दूरचे स्पष्ट दिसत नाही.
(३) बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरावा लागतो.
(४) अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरावा लागतो.
(५) दूरचे स्पष्ट दिसते.
(६) जवळचे स्पष्ट दिसत नाही.

A. ४, ५, ६
B. ३, ५, ६
C. १, २, ३
D. १, २, ४

उत्तर: D. १, २, ४

Q. दात आणि हाडांमध्ये …………. असते

A. कॅल्शिअम व फॉस्फरस
B. फॉस्फरस व सेल्यूलोज
C. सिलिकॉन व कॅल्शिअम
D. कॅल्शिअम व नायट्रोजन

उत्तर: A. कॅल्शिअम व फॉस्फरस

Q. पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर…. मध्ये होते.

A. पित्तरस
B. माल्टोज
C. ग्लुकोज
D. अमिनो आम्ले

उत्तर: D. अमिनो आम्ले

Q. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब………… असतो.

A. १२०/८०
B. १४०/१२०
C. १५०/७०
D. १००/६०

उत्तर: A. १२०/८०

Q. खालीलपैकी कोणते ‘कवक’ हे उपयुक्त कवक आहे?

A. तांबेरा
B. म्यूकर
C. पेनिसिलीन
D. काजळी

उत्तर: C. पेनिसिलीन

Q. (१) थायरॉइड ग्रंथी ही मानवी शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी आहे.
(२) पित्तरस स्रवणे हे यकृताचे प्रमुख कार्य होय. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने अचूक आहे/त?

A. फक्त १
B. फक्त २
C. १ व २ दोन्ही
D. ना १ ना २

उत्तर: B. फक्त २

Q. मोत्यांमधील रासायनिक घटक…………

A. मॅग्रेशिअम क्लोराइड
B. मॅग्नेशिअम कार्बोनेट
C. कॅल्शिअम कार्बोनेट
D. कॅल्शिअम सल्फेट

उत्तर: C. कॅल्शिअम कार्बोनेट

Q. खालीलपैकी………च्या रासायनिक प्रक्रियेतून ‘युरिया’ तयार केले जाते.

A. अमोनिया च कार्बन-डाय-ऑक्साइड
B. मिथेन व कार्बन-डाय-ऑक्साइड
C. अमोनिया व सल्फेट
D. अमोनिया व कॅल्शिअम क्लोराइड

उत्तर: A. अमोनिया च कार्बन-डाय-ऑक्साइड

Q. खालीलपैकी कोणकोणते ‘डी’ जीवनसत्त्वाचे प्रमुख स्रोत आहेत ?

(१) कोवळे सूर्यकिरण
(२) शार्कलिव्हर ऑईल
(३) अंड्याचा केवळ बलक
(४) यकृत
(५) पालेभाज्या
(६) दूध

A. वरील सर्व
B. ५ सोडून सर्व
C. ३ व ५ सोडून सर्व
D. फक्त १ व २

उत्तर: B. ५ सोडून सर्व

Q. खालीलपैकी सुयोग्य जोड्या ओळखा.

(१) कंद : हळद
(२) प्रकंद : आले
(३) घनकंद : सुरण
(४) आकंद : शतावरी

A. फक्त २ व ३
B. फक्त १ व २
C. फक्त २, ३ व ४
D. १, २, ३ व ४

उत्तर: A. फक्त २ व ३

Q. खालील विधाने काळजीपूर्वक अभ्यासून अचूक उत्तराचा पर्याय निवडा.

(१) खनिज खताच्या उत्पादनात नायट्रिक आम्ल हे अतिशय उपयुक्त ठरते.
(२) ‘गॅमेक्सेन’ हे एक प्रकारचे कीडनाशक आहे.
(३) ‘सुपर फॉस्फेट’ खताचा रंग जांभळा असतो.
(४) पोटॅशिअम नायट्रेट हे खत विटकरी रंगाचे असते.

A. चारही विधाने बरोबर आहेत.
B. फक्त १ व २ बरोबर आहेत.
C. फक्त १, ३ व ४ बरोबर आहेत.
D. चारही विधाने चुकीची आहेत.

उत्तर: B. फक्त १ व २ बरोबर आहेत.

Q. लाकडामध्ये हा महत्त्वाचा घटक असतो.

A. सेल्यूलोज
B. ट्रायग्लिसरॉइड
C. लिग्निन
D. माल्टोज

उत्तर: A. सेल्यूलोज

Science gk questions in Marathi

Q. मानवी शरीरात किती शारिरीक कार्यप्रणाली किंवा इंद्रिय- संस्था आहेत ?

A. ८
B. ९
C. १०
D. ११

उत्तर: C. १०

Q. भूकंपलहरींची नोंद घेण्यासाठी वापरण्यात येणारे साधन………….

A. बॅरोमीटर
B. लॅक्टोमीटर
C. बेरीग्राफ
D. सेस्मोग्राफ

उत्तर: D. सेस्मोग्राफ

Q. वनस्पती तुपाच्या निर्मितीप्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या वायूचा वापर केला जातो?

A. नायट्रोजन
B. कार्बन-डाय-ऑक्साइड
C. हायड्रोजन
D. अमोनिया

उत्तर: C. हायड्रोजन

Q. ‘कर्करोग’ या रोगासंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

A. हा रोग आनुवंशिक आहे.
B. हा रोग संसर्गजन्य नाही.
C. हा रोग शरीराच्या काही ठरावीक अवयवांनाच होतो.
D. हा रोग कोणत्याही प्राण्यास होऊ शकतो.

उत्तर: C. हा रोग शरीराच्या काही ठरावीक अवयवांनाच होतो.

Q. नवजात अर्भकाला क्षयप्रतिबंधक लस (B.C.G.) केव्हा टोचतात ?

A. जन्मल्यानंतर लगेचच
B. जन्मानंतर दहा दिवसांनी
C. जन्मानंतर पंधरवड्याने
D. जन्मानंतर तीन आठवड्यांनी

उत्तर: A. जन्मल्यानंतर लगेचच

Q. ….. रक्तगटाचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते; म्हणून या रक्तगटाच्या व्यक्तीस ‘वैश्विक दाता’ (Universal Donor) असे म्हणतात.

A. ‘ओ’ (-ve)
B. ‘एबी’
C. ‘बी’
D. ‘ओ’ (-ve)

उत्तर: A. ‘ओ’ (-ve)

Q. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

A. झिंक फॉस्फाइड: मूषकनाशक
B. पॅरिसग्रीन: जंतुनाशक
C. कॅल्शिअम सायनाइड: तणनाशक
D. सोडिअम क्लोराइड: कीटकनाशक

उत्तर: D. सोडिअम क्लोराइड: कीटकनाशक

Q. पुढीलपैकी कोणती/त्या जोडीच्या अचूक आहे/त?

(१) अतिसूक्ष्म जलीय वनस्पती : बुल्फिया
(२) वडाच्या पारंब्या: आधारमूळ
(३) फिलीसिनी : टेरिस
(४) रायझोफोरा : शैवाल

A. फक्त ३ व ४
B. फक्त १, २ व ३
C. फक्त २, ३ व ४
D. फक्त १ व २०

उत्तर: B. फक्त १, २ व ३

Q. खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व बिया एकदल आहेत?

A. गहू, मका, तांदूळ
B. हरभरा, घेवडा, वाटाणा
C. गहू, हरभरा, घेवडा
D. मका, घेवडा, वाटाणा

उत्तर: A. गहू, मका, तांदूळ

Q. ‘खरजेचा किडा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या …. या परजीवीमुळे खरूज होते.

A. मायकोबॅक्टेरिअम लेप्री
B. सारकॉप्टिस स्केबी
C. प्लाझ्मोडिअम
D. व्हिब्रिओ कॉलरी

उत्तर: B. सारकॉप्टिस स्केबी

Q. पेशींच्या अनियंत्रित आणि अपसामान्य वाढीमुळे हा रोग होतो.

A. कर्करोग
B. मलेरिया
C. एड्स्
D. विषमज्वर

उत्तर: A. कर्करोग

Q. खालीलपैकी कोणते ‘सस्तन’ प्राणी आहेत ?

(१) कांगारू
(२) सुसर
(३) व्हेल
(४) ओरांगुटान
(५) पेंग्विन
(६) अल्बॅस्ट्रॉस

A. फक्त १, ३ व ४
B. फक्त २, ३, ५ व ६
C. फक्त २ व ४
D. फक्त १, २ व ३

उत्तर: A. फक्त १, ३ व ४

Q. दक्षिण ध्रुवाजवळ सापडणाऱ्या …. या पक्ष्यास उडता येत नाही.

A. किवी
B. पेंग्विन
C. अल्बॅस्ट्रॉस
D. स्टॉर्म-पेट्रेल्स

उत्तर: B. पेंग्विन 

Q. कीटक हे संधिपाद वर्गातील प्राणी असून त्यांना पाय असतात.

A. चार
B. सहा
C. आठ
D. दहा

उत्तर: B. सहा

Q. मातीत हवेचा भरपूर पुरवठा करून हवा खेळती ठेवण्याचे कार्य करणाऱ्या …. या कृमीस ‘शेतकऱ्यांचा मित्र’ असे म्हणावे लागेल.

A. उंदीर
B. फुरसे
C. गांडूळ
D. गोगलगाय

उत्तर: C. गांडूळ

Q. खालीलपैकी कोणता प्राणी अथवा पक्षी ‘सस्तनी’ या प्रकारात मोडतो ?
A. घार
B. गिधाड
C. वटवाघूळ
D. कावळा

उत्तर: C. वटवाघूळ

Q. तृणधान्यांमध्ये खालीलपैकी कशाच्या मदतीने परागवहन होते ?

A. पाणी
B. वारा
C. कीटक
D. पक्षी

उत्तर: B. वारा

Samanya vidnyan questions in Marathi

Samanya vidnyan questions in Marathi
Samanya vidnyan questions in Marathi

Q. गायीसारख्या शाकाहारी प्राण्याचे आतडे …. असते.

A. आखूड
B. छोटे
C. लांब
D. नाजूक

उत्तर: C. लांब 

Q. भोवतालच्या परिस्थितीनुसार रंग बदलणारा ‘कॅमेलिऑन’ हा …. वर्गातील प्राणी आहे.

A. उभयचर
B. सरीसृप
C. जलचर
D. अपृष्ठवंशीय

उत्तर: B. सरीसृप

Q. …. च्या संयोगाने पाणी तयार होते.

A. हायड्रोजन व ऑक्सिजन
B. ऑक्सिजन व नायट्रोजन
C. नायट्रोजन व हायड्रोजन
D. ऑक्सिजन व हेलिअम

उत्तर: A. हायड्रोजन व ऑक्सिजन

Q. जस्त व सल्फ्युरिक अॅसिड यांच्या क्रियेने…. हा वायू तयार होतो.

A. नायट्रोजन
B. हायड्रोजन
C. ऑक्सिजन
D. हेलिअम

उत्तर: B. हायड्रोजन

Q. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

A. साधा सूक्ष्मदर्शक : घड्याळे, कॅल्क्युलेटर्स दुरुस्ती
B. संयुक्त सूक्ष्मदर्शक जंतू, पेशी यांचा अभ्यास
C. दूरदर्शक: ग्रह, तारे यांचे निरीक्षण
D. वरील सर्व जोड्या बरोबर आहेत.

उत्तर: D. वरील सर्व जोड्या बरोबर आहेत.

Q. “एखादा पदार्थ कोणत्याही द्रवात बुडविला असता त्याचे वजन कमी होते. त्याच्या वजनात येणारी ही तूट त्याच्या द्रवव्याप्त भागाने उत्सारलेल्या द्रवाच्या वजनाइतकी असते,” हे तत्त्व खालीलपैकी कोणाचे आहे?

A. न्यूटन
B. पास्कल
C. ज्यूल
D. आर्किमिडीज

उत्तर: D. आर्किमिडीज

Q. एखादी वस्तू पृथ्वीवर कोठेही नेली तरी ….

A. तिचे वजन बदलत नाही.
B. तिचे वजन व वस्तुमान बदलत नाही.
C. तिचे वजन व वस्तुमान बदलते.
D. तिचे वस्तुमान बदलत नाही.

उत्तर: D. तिचे वस्तुमान बदलत नाही.

Q. जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक

A. सर्व दिशांनी गतिमान होते.
B. विरुद्ध दिशेने गतिमान होते.
C. गतिमान होत नाही.
D. त्याच दिशेने गतिमान होते.

उत्तर: B. विरुद्ध दिशेने गतिमान होते.

Q. शक्तीचे मूल्य …. इतके असते..

A. बल + वेग
B. बल × वेग
C. वेग बल
D. बल वेग

उत्तर: B. बल × वेग

Q. एका धातूच्या गोळ्याचे रॉकेल, पाणी, हवा व ग्लिसरीन यांमध्ये क्रमाक्रमाने वजन केले असता त्याचे वजन …. मध्ये सर्वांत कमी भरेल.

A. हवा
B. पाणी
C. ग्लिसरीन
D. रॉकेल

उत्तर: C. ग्लिसरीन

Q. आगबोट-

A. नदीच्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात कमी बुडते.
B. नदीच्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात अधिक बुडते.
C. नदीच्या व समुद्राच्या दोन्ही पाण्यात सारखी बुडते.
D. नदीच्या पाण्यावर तरंगू शकत नाही.

उत्तर: A. नदीच्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात कमी बुडते.

Q. उंच ठिकाणी हवेचा दाब …. असल्यामुळे पाण्याचा उत्कलनांक …. असतो.

A. कमी, कमी
B. कमी, जास्त
C. जास्त, कमी
D. जास्त, जास्त

उत्तर: A. कमी, कमी

Q. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

A. उत्कलनावर दाबाचा परिणाम: प्रेशर कुकर
B. द्रवाची घनता काढणे: हेअरचे उपकरण
C. पाण्याचे असंगत आचरण होपचे उपकरण
D. पास्कलचा नियम: बंदूक

उत्तर: D. पास्कलचा नियम: बंदूक

Q. पुढीलपैकी कोणत्या जोड्या बरोबर जुळविलेल्या आहेत ?

(१) अस्थायी चुंबक तारायंत्र
(२) स्थायी चुंबक : व्होल्टमीटर
(३) चुंबकसूची: तारायंत्र
(४) विद्युत्चुंबक ॲम्पिअर

A. फक्त १ व २
B. फक्त २, ३ व ४
C. फक्त १, २ व ३
D. फक्त १, ३ व ४

उत्तर: C. फक्त १, २ व ३

Q. खालीलपैकी जास्तीत जास्त शुद्ध पाणी कोणते?

A. उकळलेले पाणी
B. पावसाच्या पहिल्या सरी
C. गाळलेले पाणी
D. पहिल्या काही सरींनंतरचे पावसाचे पाणी

उत्तर: D. पहिल्या काही सरींनंतरचे पावसाचे पाणी

Q. (१) हिरा हे कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप आहे.
(२) शुद्ध हिरा हा स्फटिकमय असतो.
(३) ज्ञात पदार्थांमध्ये हिरा हा सर्वाधिक कठीण पदार्थ आहे.
कोणती विधाने सत्य आहेत?

A. १, २ व ३
B. कोणतेही नाही.
C. फक्त १ व २
D. फक्त १ व ३

उत्तर: A. १, २ व ३

Q. ………या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो.

A. ग्लुकोज
B. लॅक्टोज
C. कॅरोटीन
D. रेनिन

उत्तर: C. कॅरोटीन

Q. खालीलपैकी…. हे नायट्रोजनचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे सुमारे ४६.६ टक्के असलेले खत होय.

A. युरिया
B. सुपर फॉस्फेट
C. अमोनिअम सल्फेट
D. कंपोस्ट

उत्तर: A. युरिया

Q. खालीलपैकी कोणते जीवनसत्त्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते?

A. ‘ड’ जीवनसत्त्व
B. ‘ई’ जीवनसत्त्व
C. ‘के’ जीवनसत्त्व
D. ‘ब’ जीवनसत्त्व

उत्तर: C. ‘के’ जीवनसत्त्व

Q. लोखंडाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते; परंतु पाऱ्याच्या घनतेपेक्षा कमी असते, म्हणून लोखंडी खिळा पाण्यात ….; परंतु पाऱ्यात ….

A. बुडतो, तरंगतो.
B. तरंगतो, बुडतो,
C. बुडत नाही, बुडतो.
ड) तरंगतो, तरंगत नाही.

उत्तर: A. बुडतो, तरंगतो.

Q. पाण्याचा दाब पाण्याच्या खोलीशी समानुपाती असल्याने धरणाच्या भिंती …. असतात.

A. तळापासून वरपर्यंत सारख्याच जाडीच्या
B. तळाशी कमी रुंदीच्या
C. तळाशी अधिक जाडीच्या
D. तळाशी कमी जाडीच्या

उत्तर: C. तळाशी अधिक जाडीच्या

सामान्य विज्ञान प्रश्न आणि उत्तरे मराठी

सामान्य विज्ञान प्रश्न आणि उत्तरे मराठी
सामान्य विज्ञान प्रश्न आणि उत्तरे मराठी

Q. खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत?

(१) दालचिनी म्हणजे सिंकोना या झाडाची सालच होय.
(२) कॅलिफोर्नियामध्ये आढळणारे सिकोया हे झाड जगातील सर्वांत उंच वाढणारे झाड होय.
(३) बटाटा व आले ही भूमिगत खोडे आहेत.
(४) सुरण, मुळा, गाजर, रताळी व बीट ही त्या त्या वनस्पतींची सोटमुळे होत.

A. फक्त २ व ३
B. फक्त १, २ व ३
C. फक्त २, ३ व ४
D. फक्त १ व ४

उत्तर: D. फक्त १ व ४

Q. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

A. कॉफी : सोटमूळ
B. पिस्टिया: श्वसन मूळ
C. केळी : तंतुमूळ
D. केवडा आधाराचे मूळ

उत्तर: B. पिस्टिया: श्वसन मूळ

Q. ज्या प्रक्रियेत पदार्थ वायुस्थितीतून द्रवस्थितीत जातो, त्या क्रियेस …. असे म्हणतात.

A. आभिवन
B. सांद्रीभवन
C. ऊर्ध्वपातन
D. उत्सर्जन

उत्तर: B. सांद्रीभवन

Q. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये अधोभूमिक बीजांकुरण घडून येते ?

A. वाटाणा
B. घेवडा
C. एरंडी
D. सूर्यफूल

उत्तर: A. वाटाणा

Q. धोतऱ्याच्या फुलामधील परागकण प्रामुख्याने खालीलपैकी कोणामार्फत होते ?

A. पाणी
B. वारा
C. कीटक
D. पक्षी

उत्तर: C. कीटक

Q. ‘स्पायरोगायरा’ हे हिरव्या रंगाचे शैवाल प्रामुख्याने गोड्या पाण्यात आढळते. हे ‘शैवाल’ असलेल्या पाण्यातून वायूचे बुडबुडे बाहेर पडतात.

A. हायड्रोजन
B. नायट्रोजन
C. ऑक्सिजन
D. कार्बन-डाय-ऑक्साइड

उत्तर: C. ऑक्सिजन

Q. ………….. हवेतील सामान्य तापमानाला (कक्षतापमानाला) पेट घेतो म्हणून पाण्याखाली ठेवतात.

A. तांबडा फॉस्फरस
B. गंधक
C. पिवळा फॉस्फरस
D. हायड्रोजन

उत्तर: C. पिवळा फॉस्फरस

Q. नायट्रिक आम्ल साठविण्याच्या टाक्या ……..या धातूच्या केलेल्या असतात.

A. एल्युमिनियम
B. लोह
C. तांबे
D. शिसे

उत्तर: A. एल्युमिनियम

Q. गॅमा किरणांचा वेग …. वेगाइतकाच असतो.

A. अल्फा किरणांच्या
B. प्रकाशाच्या
C. ध्वनीच्या
D. इलेक्ट्रॉनच्या

उत्तर: B. प्रकाशाच्या

Q. …… या किरणांना वस्तुमान नसते.

(१) अल्फा
(२) ‘क्ष’
(३) गॅमा
(४) बीटा

A. फक्त १
B. फक्त १ व ४
C. फक्त २ व ३
D. फक्त ४

उत्तर: C. फक्त २ व ३

Q. मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे …. सेल्सिअस इतके असते.

A. ३७०
B. ९७०
C. ३००
D. ९५०

उत्तर: A. ३७०

Q. सुरक्षा आगकाडीच्या गुलामध्ये खालीलपैकी काय वापरले जाते ?

A. पिवळा फॉस्फरस
B. फॉस्फरस सल्फाइड
C. पोटॅशिअम क्लोरेट
D. तांबडा फॉस्फरस

उत्तर: C. पोटॅशिअम क्लोरेट 

Q. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

A. कुष्ठरोग : त्वचेस बधिरता
B. एड्स् : रोगप्रतिकारक शक्तीचा नाश
C. कर्करोग: पेशींची अनियमित वाढ
D. कॉलरा : रक्तस्राव

उत्तर: D. कॉलरा : रक्तस्राव

Q. आंब्याच्या झाडाच्या फांद्यांवर वाढणारी…. ही अहरित वनस्पती परजीवी आहे.

A. अमरवेल
B. मारसेलिया
C. घटपर्णी
D. स्पायरोगायरा

उत्तर: A. अमरवेल

Q. खालीलपैकी कोणत्या वायूस ‘निष्क्रिय वायू’ अशी संज्ञा देता येणार नाही?

A. हेलिअम
B. अरगॉन
C. हायड्रोजन
D. निऑन

उत्तर: C. हायड्रोजन

Q. वनस्पती तूप तयार करण्यासाठी…. हे उत्प्रेरक म्हणून वापरले जाते.

A. हायड्रोजन
B. निकेलची भुकटी
C. मँगनीज
D. कार्बन-डाय-ऑक्साइड

उत्तर: B. निकेलची भुकटी

Q. पितळ हे संमिश्र घटकांपासून………… बनते.

A. तांबे + जस्त
B. तांबे जस्त निकेल
C. तांबे + कथिल
D. तांबे कथिल जस्त

उत्तर: A. तांबे + जस्त

Q. खालीलपैकी……. हा सस्तनी प्राणी ‘अंडज’ आहे.

A. डॉल्फीन
B. प्लॅटिपस
C. कांगारू
D. पॉरपॉइज

उत्तर: B. प्लॅटिपस

Q. खालीलपैकी………….. हा शीत रक्ताचा प्राणी आहे.

A. बेडूक
B. कोअला
C. चिचुंद्री
D. ससा

उत्तर: A. बेडूक

Q. ……..च्या साहाय्याने रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढविता येतो.

A. अनुरेखक
B. उत्प्रेरक
C. विघटक
D. उत्सारक

उत्तर: B. उत्प्रेरक

Q. पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/त?

(१) अणुबॉम्बचा स्फोट करण्यासाठी नियंत्रित शृंखला अभिक्रिया वापरतात.
(२) अणुभट्टीची रचना अनियंत्रित शृंखला अभिक्रिया तत्त्वावर आधारित असते.
A. फक्त १
B. फक्त २
C. १ व २ दोन्ही
D. ना १ ना २

उत्तर: D. ना १ ना २

हे देखील वाचा

MPSC Science Questions and Answers in Marathi

How to become Nurse in Marathi

Leave a Comment