रवींद्रनाथ टागोर मराठी माहिती | Biography of Ravindranath Tagore in marathi

रवींद्रनाथ टागोर मराठी माहिती | Biography of Ravindranath Tagore in marathi

Biography of Ravindranath Tagore in marathi: रवींद्रनाथ टागोर एक जगप्रसिद्ध कवी साहित्यकार आणि तत्त्वज्ञानी होते. ते नोबेल पुरस्कार मिळवणारे आशिया खंडातील पहिले आणि साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले गैर-युरोपियन होते. ते जगातील एकमेव असे कवी होते ज्यांनी दोन देशांच्या राष्ट्रगानाची रचना केली, भारताचे राष्ट्रगान ‘जन गण मन’ आणि बांगलादेशचे राष्ट्रगान ‘आमार सोनार बांगला’.

गुरुदेव म्हणून प्रसिद्ध रवींद्रनाथ टागोर यांनी बांगला साहित्य आणि संगीताला एक नवीन दिशा दिली. त्यांनी बंगाली साहित्यात कविता, गद्य आणि बोलचाल भाषेच्या नवीन प्रकारांचे प्रयोग केले. यामुळे बंगाली साहित्य शास्त्रीय संस्कृतच्या प्रभावापासून मुक्त झाले. रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय सभ्यतेचा चांगुलपणा पश्चिमे कडील देशात आणि तेथील चांगुलपणा भारतात आणण्यामध्ये प्रभावशाली भूमिका पार पाडली. त्यांच्या महान कीर्तीचा अंदाज आपण या विषयावरून लावू शकतो की जेव्हा ते फक्त 8 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी पहिली कविता लिहिली होती. 16 वर्षांचे असताना ‘भानुसिम्हा’ उपनावाने त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या. ते घोर राष्ट्रवादी होते आणि ब्रिटिश राज्याची निंदा करून देशाच्या आजादीची मागणी केली. जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर त्यांनी इंग्रजांद्वारे दिले गेलेल्या नाईट हुडचा त्याग केला.

  • जन्म: 7 मे 1861, कोलकत्ता.
  • मृत्यु: 7 ऑगस्ट , 1941, कोलकत्ता.
  • पुरस्कार: कविता संग्रह गीतांजली साठी साहित्याचा नोबेल पुरस्कार 1913, विश्वभारती ची स्थापना.

आरंभिक जीवन । Information about Ravindranath Tagore in Marathi

Information about Ravindranath Tagore in Marathi
Information about Ravindranath Tagore in Marathi

रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 ला कोलकत्ताच्या जोडा साको ठाकूरवाडी मध्ये झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर आणि आई शारदा देवी होती. ते आपल्या आई वडिलांच्या तेरा मुलांमधून सर्वात लहान होते. जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले आणि वडील सतत प्रवास करत असल्यामुळे त्यांचे पालन पोषण नोकरांद्वारे झाले. टागोर परिवार ‘बंगाल रेनैस्सा’ (नवजागरण) च्या आघाडीवर होते. तेथे पत्रिका प्रकाशन थिएटर बंगाली आणि पश्चिमी संगीताची प्रस्तुती सतत चालू होती. या प्रकारे त्यांच्या घराचे वातावरण शाळेपेक्षा कमी नव्हते.

त्यांचे सर्वात मोठे भाऊ द्विजेन्द्रनाथ टागोर एक तत्त्वज्ञानी आणि कवी होते. त्यांचे दुसरे भाऊ सत्येंद्रनाथ टागोर हे भारतीय नागरिक सेवेमध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय होते. त्यांचे अजून एक भाऊ जोतींद्रनाथ टागोर संगीतकार आणि नाटककार होते. त्यांची बहीण स्वर्णकुमारी देवी एक कवित्री आणि कादंबरीकार होती. पारंपारिक शिक्षा पद्धत त्यांना चांगली वाटत नव्हती म्हणून वर्गात बसून शिकायला त्यांना आवडत नव्हते.

ते अनेकदा आपल्या कुटुंबीयांसह फॅमिली इस्टेटला भेट देत असे. त्यांचे भाऊ हेमिंद्रनाथ त्यांचा अभ्यास घ्यायचे. या अभ्यासात त्यांना जलतरण, व्यायाम, ज्युडो आणि कुस्ती सारखे विषय होते. याव्यतिरिक्त ते चित्रकला, शरीरशास्त्र, इतिहास, भूगोल, साहित्य, गणित, संस्कृत आणि इंग्रजी पण शिकले. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांना औपचारिक शिक्षा इतकी नापसंत होती की ते कोलकत्ता च्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये फक्त एकच दिवस गेले होते.

आपल्या उपनयन सोहळ्यानंतर रवींद्रनाथ त्यांच्या वडिलांसोबत अनेक महिन्यांच्या भारत दौर्‍यावर गेले. हिमालयामध्ये असलेले पर्यटन स्थळ डलहौजी ला पोहोचण्याच्या अगोदर ते कौटुंबिक इस्टेट शांतिनिकेतन आणि अमृतसरला गेले. डलहौजी मध्ये त्यांनी इतिहास,खगोलशास्त्र,आधुनिक विज्ञान, संस्कृत या विषयांचा अभ्यास केला आणि कालिदास यांच्या कवितांचे विचारविनिमय केले.

यानंतर रवींद्रनाथ जोडासाको मध्ये परत आले आणि 1877 मध्ये त्यांनी काही महत्त्वपूर्ण कामांची रचना केली.

त्यांचे वडील देवेंद्रनाथ यांची इच्छा होती की रवींद्रनाथ हे बॅरिस्टर बनावे म्हणून 1878 मध्ये त्यांना इंग्लंडला पाठवले. त्यांनी लंडन यूनिवर्सिटी मधून लॉ च्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला परंतु काही दिवसांनी त्यांनी अभ्यास सोडून दिला व शेकस्पीयर आणि दुसऱ्या साहित्यकारांच्या रचनेंचे स्व अध्ययन केले. 1880 मध्ये लॉ ची डिग्री न घेता ते बंगालला परतले. 1883 मध्ये त्यांचा विवाह मृणालीदेवी यांच्यासोबत संपन्न झाला.

करियर

इंग्लंड मधून परत आल्यापासून ते लग्न झाल्यानंतर 1901 पर्यंत त्यांनी जास्तीत जास्त वेळ सिअलदा (आता बांगलादेशमध्ये स्थित) आपल्या कौटुंबिक इस्टेट मध्ये घालवले. 1898 मध्ये त्यांची पत्नी व त्यांचे मुलं सुद्धा त्यांच्यासोबत इथेच राहू लागले. लांब पर्यंत पसरलेल्या आपल्या इस्टेटीत त्यांनी खूप दौरे केले व ग्रामीण आणि गरीब लोकांचे जीवन खूप जवळून पाहिले. 1891 ते 1895 पर्यंत त्यांनी ग्रामीण बंगालच्या पृष्ठभूमीवर आधारितअसलेल्या खूप लघु कविता लिहिल्या.

वर्ष 1901 मध्ये रवींद्रनाथ शांतिनिकेतन ला गेले. तेथे त्यांना एक आश्रम स्थापित करण्याची इच्छा होती. तेथे त्यांनी एक शाळा पुस्तकालय आणि पूजा स्थळाचे उद्घाटन केले. तेथे त्यांनी खूप सारी झाडे लावली व एक सुंदर उद्यान बनवले. इथेच त्यांची पत्नी व त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. त्यांच्या वडिलांचे सुद्धा 1905 मध्ये निधन झाले. तोपर्यंत त्यांना वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेतून मासिक उत्पन्न मिळू लागले होते आणि त्यांच्या साहित्याच्या रॉयल्टीतूनही काही उत्पन्न मिळत होते.

14 नोव्हेंबर 1913 ला रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. नोबेल पुरस्कार देणारी संस्था स्वीडिश अकॅडमी ने त्यांच्या काही कामांचे अनुवाद आणि ‘गीतांजली’ च्या आधारावर हे पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता. 1915 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना नाईट हूड प्रदान केले होते. 1919 मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडामुळे त्यांनी नाईटहुडचा त्याग केला.

1921 मध्ये त्यांनी कृषी अर्थशास्त्रज्ञ लियोनार्ड एमहर्स्ट यांच्यासोबत मिळून आपल्या आश्रमाजवळ ‘ग्रामीण पुनर्निमान संस्थे’ ची स्थापना केली. नंतर याचे नाव बदलून श्रीनिकेतन करण्यात आले.

आपल्या जीवनाच्या अंतिम काळात टागोर सामाजिक रूपात खूप सक्रिय राहिले. यादरम्यान त्यांनी जवळपास 15 गद्य आणि पद्य कोश लिहिले. त्यांनी या दरम्यान लिहिलेल्या साहित्यांच्या माध्यमातून मानवी जीवनाच्या अनेक पैलूंना स्पर्श केला. या दरम्यान त्यांनी विज्ञानाच्या संबंधात लेख सुद्धा लिहले.

शेवटचा काळ

त्यांनी आपल्या जीवनाचे शेवटचे चार वर्ष वेदना आणि आजारात घालवले. 1937 या वर्षाच्या शेवटला ते बेशुद्ध झाले आणि खूप वेळापर्यंत अशाच अवस्थेत राहिले. जवळपास तीन वर्षानंतर सुद्धा असेच घडून आले. यादरम्यान ते जेव्हा चांगले व्हायचे तेव्हा ते कविता लिहायचे. या दरम्यान लिहिल्या गेलेल्या कविता त्यांच्या उत्कृष्ट कवितांपैकी एक असायच्या. दीर्घ आजारामुळे 7 ऑगस्ट 1941 ला त्यांचे निधन झाले.

प्रवास

1878 ते 1932 पर्यंत ते 30 देशांमध्ये फिरले होते. त्यांच्या प्रवासाचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे साहित्यिक रचनेला त्या लोकांपर्यंत पोहोचवायचे ज्यांना बंगाली भाषा समजत नाही. प्रसिद्ध इंग्रजी कवि विलियम बटलर यीट्स यांनी गीतांजली च्या इंग्रजी अनुवादाचे प्रत्सावन लिहीले. त्यांचा शेवटचा परदेशात प्रवास 1932 मध्ये सिलोन (आता श्रीलंका) येथे झाला.

साहित्य

बहुतेक लोक त्यांना फक्त एक कवी म्हणून ओळखतात पण वात्सवात ते फक्त कवी नाही तर कवितांबरोबरच त्यांनी कादंबरी, लेख, लघुकथा, प्रवासवर्णने, नाटके आणि हजारो गाणीही लिहिली.

संगीत आणि कला 

एक महान कवी आणि साहित्यकार असल्या सोबतच गुरु रवींद्रनाथ टागोर एक उत्कृष्ट संगीतकार आणि चित्रकार होते. त्यांनी जवळपास 2230 गाणी लिहिली . या गाण्यांना रवींद्रनाथ संगीत म्हणून ओळखले जाते. हा बंगाली संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. भारत आणि बांगलादेश चे राष्ट्रगीत जे रवींद्रनाथ टागोर द्वारे लिहिले गेले होते ते सुद्धा या रवींद्र संगीताचा भाग आहेत.

जवळपास 60 वर्षांचे असताना रवींद्रनाथ टागोर यांनी रेखाचित्र आणि चित्रकलेत स्वारस्य दाखवायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या कलेमध्ये विविध देशांची शैली समाविष्ट केली.

राजकीय विचार 

त्यांचे राजकीय विचार अत्यंत गुंतागुंतीचे होते. त्यांनी युरोपियन वसाहतवादावर टीका केली आणि भारतीय राष्ट्रवादाचे समर्थन केले. यासोबतच त्यांनी स्वदेशी आंदोलनाची टीका केली आणि बोलले की आपल्याला सामान्य नागरिकाच्या बौद्धिक विकासावर लक्ष दिले पाहिजे या प्रकारे आपण स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करू शकतो. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या समर्थनार्थ त्यांनी अनेक गाणी लिहिली. 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर त्यांनी इंग्रजांनी दिलेल्या नाईटहूडचा त्याग केला.’अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ’ या मुद्द्यावरून महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील मतभेद दूर करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

तर मित्रांनो रवींद्रनाथ टागोरांवर आमचा लेख तुम्हाला कसा वाटला कंमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील किव्हा तुम्हाला काही या लेखात update करायचे असेल तर ते देखील खाली नमूद करा.

हे देखील वाचा

Atal Bihari Vajpayee Biography in Marathi

Biography of Sardar Vallabh Bhai Patel in Marathi

Leave a Comment