मदर टेरेसा मराठी माहिती | Mother Teresa Biography in marathi

मदर टेरेसा | Mother Teresa Biography in Marathi

Mother Teresa Biography in marathi: असे मानले जाते की जगामध्ये सर्व लोक फक्त स्वतःसाठी जगतात पण मानव इतिहासात असे काही मनुष्यांचे उदाहरणे आहेत ज्यांनी आपले पूर्ण जीवन दानधर्म आणि दुसऱ्यांची सेवा करण्यामध्ये समर्पित केले. मदर टेरेसा पण अशाच व्यक्तींपैकी एक आहेत,जे फक्त दुसऱ्यांसाठी जगायच्या. मदर टेरेसा हे एक असे नाव आहे ज्यांचे स्मरण होताच हृदय श्रद्धेने भरून जाते. मदर टेरेसा या एक अशा महात्मा होत्या ज्यांचे हृदय जगातील सर्व निराधार, आजारी, असहाय्य आणि गरिबांसाठी धडधडत होते आणि म्हणूनच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यांच्या सेवेसाठी आणि कल्याणासाठी समर्पित केले. त्यांचे खरे नाव ‘अग्नेस गोन्झा बोजाक्शिउ’ होते. अलबेनियन भाषेमध्ये गोंझा चा अर्थ फुलाची कळी होते. याच्यात काहीच असत्य नाही की मदर टेरेसा एक फुलाची कळी होती ज्यांनी छोट्याशा वयात गरीब, निराधार आणि असहायांचे जीवन प्रेमाच्या सुगंधाने भरून टाकले होते.

  • जन्म: 26 ऑगस्ट, 1910, स्कॉप्जे, (आता मसेदोनिया मध्ये)
  • मृत्यु: 5 सप्टेंबर, 1997, कलकत्ता, भारत.
  • कार्य: मानवतेची सेवा, ‘मिशनरीज ऑफ चैरिटी’ ची स्थापना.

आरंभिक जीवन । Mother Teresa Information in marathi

मदर टेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 ला स्कॉप्जे (आता मसेदोनिया)मध्ये झाला. त्यांचे वडील निकोला बोयाजु एक साधारण व्यापारी होते. मदर टेरेसा यांच वास्तविक नाव अग्नेस गोंझा बोयाजीजू होते. अलबेनियन भाषेमध्ये गोंझा चा अर्थ फुलाची कळी असा आहे . जेव्हा त्या फक्त आठ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यानंतर त्यांच्या पालन पोषनाची पूर्ण जबाबदारी त्यांची आई द्रोणा बोयाजु यांच्यावर आली. ते त्यांच्या पाच भाऊ बहिणींमध्ये सर्वात लहान होत्या. त्यांच्या जन्माच्या वेळेस त्यांच्या मोठ्या बहिणीचे वय सात वर्ष व भावाचे वय दोन वर्षे होते, बाकी दोन मुलांचे लहानपणीच निधन झाले. या एक लहानपणापासूनच एक सुंदर, अभ्यासू आणि मेहनती होत्या. शिक्षणाच्या सोबतच त्यांना संगीताची खूप आवड होती. मदर टेरेसा आणि तिची बहीण जवळच्या चर्चमध्ये प्रमुख गायिका होत्या. असे मानले जाते की जेव्हा त्या फक्त बारा वर्षाच्या होत्या तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की ते आपलं पूर्ण जीवन मानवसेवेसाठीच लावणार आणि अठरा वर्षांच्या असताना त्यांनी ‘सिस्टर्स ऑफ लोरेटो‘ मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर ते आयर्लंड ला गेल्या आणि इंग्रजी भाषा शिकल्या. इंग्रजी शिकणे अनिवार्य होते कारण ‘लोरेटो सिस्टर्स’ याच भाषेमध्ये भारतात मुलांना शिकवायचे.

भारतात आगमन

सिस्टर टेरेसा आयर्लंड मधून 6 जानेवारी 1929 ला कोलकत्ता मध्ये ‘लोरेटो कॉन्व्हेंट’ ला पोहोचले. त्या एक शिस्तप्रिय शिक्षिका होत्या आणि विद्यार्थ्यांचे त्यांच्यावर खूप प्रेम होते. वर्ष 1944 मध्ये ते हेडमिस्ट्रेस बनल्या .त्यांचे मन शिक्षणामध्ये पूर्णपणे रमले होते पण आजूबाजूला पसरलेली दारिद्र्ता, निराधारता आणि असहायता याने त्यांच्या मनाला खूप त्रास होयचा. 1943 च्या दुष्काळामुळे शहरात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आणि लोक गरिबीत गेले. 1946 च्या हिंदू मुसलमान दंगलीमुळे कोलकत्ता ची स्थिती खूप भयानक झाली होती.

मिशनरीज ऑफ चारिटी

Mother Teresa Biography in marathi
Mother Teresa Biography in marathi

1946 साली त्यांनी आयुष्यभर गरीब, असहाय, आजारी, असहाय्य लोकांना मदत करण्याचा संकल्प केला. यानंतर, मदर तेरेसा यांनी पटना येथील होली फॅमिली हॉस्पिटलमधून आवश्यक नर्सिंग प्रशिक्षण पूर्ण केले आणि 1948 मध्ये कोलकाता येथे परतल्या आणि तेथून प्रथमच तलतला येथे गेल्या, जिथे त्या गरीब वृद्धांची काळजी घेणाऱ्या संस्थेसोबत राहिल्या. त्यांनी रुग्णांच्या जखमा धुतल्या, त्यांची मलमपट्टी केली आणि त्यांना औषधे दिली.

हळूहळू त्यांनी आपल्या कामाने लोकांचे लक्ष स्वतःकडे ओढले. या लोकांमध्ये देशाचे उच्च अधिकारी आणि भारताचे प्रधानमंत्री पण सहभागी होते, ज्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.

मदर टेरेसा यांच्यानुसार या कामामध्ये सुरुवातीचा काळ खूपच कठीण होता. त्यांनी लोरेटो सोडून दिले होते त्यामुळे त्यांच्याजवळ कोणतेच उत्पन्न नव्हते, त्यांना स्वतःचे पोट भरण्यासाठी दुसऱ्यांची मदत घ्यावी लागली. आयुष्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर, त्यांच्या मनात खूप गडबड जाणवली, एकटेपणा जाणवला आणि लोरेटोच्या सुखसोयींवर परत जाण्याचा विचारही केला, पण त्यांनी हार मानली नाही.

7 ऑक्टोबर 1950 ला त्यांना व्हॅटिकन मधून ‘मिशनरीज ऑफ चारिटी’ ची स्थापना करण्याची परवानगी मिळाली. या संस्थेचा मुख्य उद्देश भुकेले, नग्न, बेघर, लंगडे, आंधळे, त्वचाविकाराने ग्रस्त आणि ज्यांना समाजात स्थान नाही अशा लोकांना मदत करण्याचा होता.

मिशनरीज ऑफ चारिटीचा आरंभ फक्त तेरा लोकांसोबत झाला पण मदर टेरेसा यांच्या मृत्यूच्या वेळी 1997 ला चार हजार पेक्षा जास्त सिस्टर्स जगभरमध्ये असहाय्य, निराधार, निर्वासित, अंध, वृद्ध, गरीब, बेघर, मद्यपी, एड्स रुग्ण आणि नैसर्गिक आपत्तींनी प्रभावित लोकांची सेवा करत होते.

मदर टेरेसा ने ‘निर्मल हृदय’ आणि ‘निर्मल शिशु भवन’ च्या नावाने आश्रम चालू केले. ‘निर्मल हृदय’ चे ध्येय असाध्य रोगांनी ग्रस्त रुग्ण आणि समाजाने बहिष्कृत केलेल्या गरिबांची सेवा करण्याचा होता. अनाथ आणि बेघर मुलांच्या मदतीसाठी ‘निर्मला शिशु भवन’ स्थापन करण्यात आले.

परिश्रमपूर्वक आणि खऱ्या मेहनतीने केलेलं काम कधीच अयशस्वी ठरत नाही,ही म्हण मदर टेरेसा यांच्यासोबत सत्य सिद्ध झाली.

जेव्हा त्या भारतात आल्या तेव्हा त्यांनी रस्त्याच्या कडेला पडलेल्या निराधार आणि अपंग मुलांची आणि असहाय रुग्णांची दयनीय अवस्था स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली.या सर्व गोष्टींनी त्यांचे हृदय इतके प्रभावित झाले की त्यांना त्यांच्यापासून दूर जाण्याचे धैर्य जमले नाही. यानंतर त्यांनी जनसेवेचे व्रत घेतले, जे त्यांनी पाळले.

सन्मान आणि पुरस्कार

मदर टेरेसा यांना मानवतेच्या सेवेसाठी अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले होते. भारत सरकारने त्यांना पहिले पद्मश्री (1962) आणि नंतर देशाचे सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न (1980)ला या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. संयुक्त राज्य अमेरिकेने त्यांना वर्ष 1985 मध्ये मेडल ऑफ फ्रीडम 1985 ने सन्मानित केले. मानव कल्याणासाठी केलेल्या कामांमुळे मदर टेरेसा यांना 1979 मध्ये नोबेल शांती पुरस्कार मिळाला . त्यांना हे पुरस्कार गरीब आणि असह्यांची मदत केल्यामुळे दिले गेले होते. मदर टेरेसा यांनी नोबेल पुरस्काराची 192000 डॉलर च्या धनराशीला गरिबांसाठी एका फंडच्या रूपात वापरण्याचा निर्णय घेतला.

मदर टेरेसा यांचे अनमोल विचार

  • तुम्ही तुमच्या शेजाऱ्याची काळजी घ्यावी अशी माझी इच्छा आहे. तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला ओळखता का?
  • जर आपल्यात शांततेचा अभाव असेल तर त्याचे कारण म्हणजे आपण एकमेकांचे आहोत हे आपण विसरलो आहोत.
  • जर का आपण शंभर लोकांना जेवण देऊ शकत नसाल तर आपण कमीत कमी एका व्यक्तीला तरी जेऊ घालावेत.
  • तुम्हाला प्रेमाचे संदेश ऐकायचे असतील तर ते आधी स्वतः पाठवा. उदाहरणार्थ, दिवा चालू ठेवण्यासाठी दिव्यात तेल घालत राहावे लागते.
  • एकटेपणा सर्वात भयानक गरिबी आहे.
  • आपल्या जवळच्या लोकांची काळजी करून तुम्हाला प्रेमाच्या भावना समजू शकतात.
  • सर्वात भयंकर गरिबी म्हणजे एकटेपणाची भावना आणि अवांछित असणे.
  • प्रेम हे प्रत्येक ऋतूतील फळ आहे, आणि प्रत्येक व्यक्तीच्या आवाक्यात आहे.
  • आजच्या समाजातील सर्वात मोठा आजार म्हणजे कुष्ठरोग किंवा क्षयरोग नाही तर नकोसे वाटणे.
  • भाकरीची भूक भागवण्यापेक्षा प्रेमाची भूक भागवणे कठीण आहे.
  • शिस्त हे ध्येय आणि साध्य यांच्यातील पूल आहे.
  • सरळ जगा म्हणजे इतरांनाही जगता येईल.
  • आपण सर्वजण देवाच्या हातातल्या पेनासारखे आहोत.
  • हे महत्त्वपूर्ण नाही की तुम्ही किती दिले, हे महत्त्वपूर्ण आहे की तुम्ही देताना किती प्रेमाने दिले.
  • सुंदर लोक नेहमीच छान नसतात. पण चांगले लोक नेहमीच सुंदर असतात.
  • दया आणि प्रेमाने भरलेले शब्द छोटे असू शकतात पण वास्तव मध्ये त्यांची प्रतिध्वनी शाश्वत आहे.
  • काही लोक तुमच्या आयुष्यात एका आशीर्वादासारखे असतात तर काही लोक तुमच्या आयुष्यात एका धड्यासारखे असतात.

Final Words

वाढत्या वयाच्या सोबतच त्यांचे स्वास्थ्य पण बिघडले होते. वर्ष 1983 मध्ये 73 वर्षांच्या असताना त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळेस मदर टेरेसा रोममध्ये पॉप जॉन पॉल द्वितीय यांना भेटायला गेल्या होत्या. यानंतर 1989 मध्ये त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना कृत्रिम पेसमेकर लावण्यात आले. वर्ष 1991 ला मेक्सिको मध्ये न्यूमोनिया नंतर त्यांचे हृदयाचे त्रास खूपच वाढले. यानंतर त्यांची प्रकृती सतत खालावत गेली. 13 मार्च 1997 ला त्यांनी मिशनरीज ऑफ चारिटी च्या प्रमुख पदाचा त्याग केला आणि 5 सप्टेंबर 1997 ला त्यांचे निधन झाले. त्यांच्या मरणाच्या वेळेपर्यंत मशिनरीज ऑफ चारिटी मध्ये 4000 सिस्टर आणि 300 पेक्षा अधिक सहयोगी संस्था काम करत होते जे विश्वाच्या 123 देशांमध्ये समाज सेवेचे काम करत होते. मानवतावादी सेवा आणि गरिबांच्या काळजीचे प्रतीक म्हणजेच मदर टेरेसा यांना 19 ऑक्टोबर 2003 रोजी रोम येथे पोप जॉन पॉल द्वितीय यांनी “धन्य” घोषित केले.

तर मित्रांनो Mother Teresa यांच्या वर आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा

अटल बिहारी वाजपेयी मराठी माहिती

Leave a Comment