श्रीनिवास रामानुजन् | Srinivas Ramanujan Biography in Marathi
Srinivas Ramanujan Biography in Marathi: कधी कधी आपल्या या जगात अशा विलक्षण प्रतिभांचा जन्म होतो की ज्यांच्याबद्दल जाणून सर्वांना आश्चर्यचकित होते. महान गणित तज्ञ श्रीनिवास अयंगर रामानुजन हे एक असे भारतीय आहेत ज्यांच्या नावाचा फक्त भारतालाच नाही तर पूर्ण विश्वाला गर्व आहे. कोणत्याही वैज्ञानिकाने किंवा गणित तज्ञाने इतके मोठे काम केले नसेल जेवढे त्यांनी फक्त 33 वर्षांचे असताना केले होते. ही गोष्ट आश्चर्यचकित करणारी आहे की कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण न घेता त्यांनी उच्च गणिताच्या क्षेत्रामध्ये विलक्षण काम केल्याने त्यांचे नाव कायमचे अमर झाले. हे फक्त भारतासाठीच नाही तर संपूर्ण विश्वासाठी एक दुर्भाग्य होते की गणिताचे हे साधक फक्त 33 वर्षांचे असताना त्यांचे क्षयरोगामुळे निधन झाले.
- जन्म: 22 डिसेंबर 1887
- मृत्यू: 26 एप्रिल 1920
- कार्यक्षेत्र: गणित
- शोध : लांडौ-रामानुजन स्थिरांक, रामानुजन-सोल्डनर स्थिरांक, रामानुजन थीटा फंक्शन, रॉजर्स-रामानुजन ओळख, रामानुजन प्राइम, कृत्रिम थीटा फंक्शन, रामानुजन बेरीज.
रामानुजन बालपणापासूनच विलक्षण प्रतिभेचे धनी होते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ते स्वतः गणित शिकले आणि आपल्या हयातीत गणिताची 3884 प्रमेये संकलित केली. त्यांनी दिलेली बहुतेक प्रमेये गणितज्ञांनी बरोबर सिद्ध केली होती. आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्यांनी गणिताच्या क्षेत्रात अनेक मूळ आणि अपारंपरिक निकाल मिळवले, ज्यावर आजही संशोधन केले जात आहे. अलीकडेच रामानुजन यांच्या गणितांच्या सूत्रांना क्रिस्टल-विज्ञान मध्ये प्रयुक्त केले गेले. रामानुजन जर्नलचीही स्थापना त्यांच्या कार्याचा प्रभाव असलेल्या गणिताच्या क्षेत्रात होत असलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि या महान गणितज्ञाचा सन्मान करण्यासाठी करण्यात आली आहे.
आरंभिक जीवन । Srinivas Ramanujan Information in Marathi
श्रीनिवास अयंगर रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 ला तमिळनाडूच्या कोयंबटूर मध्ये ईरोड नामक गावामध्ये एका पारंपारिक ब्राह्मण परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास आयंगर आणि आईचे नाव कोमलतामल होते. जेव्हा त्यांचा मुलगा रामानुजन एक वर्षाचा होता तेव्हा त्यांचे परिवार कुंभकोणम मध्ये स्थित झाले. त्यांचे वडील एका स्थानिक व्यावसायिकाकडे लेखापाल म्हणून काम करत होते. सुरुवातीला रामानुजन यांचा बौद्धिक विकास दुसऱ्या मुलांसारखा नव्हता आणि तीन वर्षांचे झाल्यानंतर सुद्धा त्यांना बोलता येत नव्हते जेणेकरून त्यांच्या आईवडिलांना त्यांची काळजी वाटू लागली. जेव्हा रामानुजन पाच वर्षाचे होते तेव्हा त्यांचा प्रवेश कुंभकोणम च्या प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आला.
पारंपारिक शिक्षणामध्ये रामानुजन चे कधीच मन लागले नाही आणि ते जास्तीत जास्त वेळ गणिताच्या अभ्यासात घालवायचे. पुढे चालून त्यांनी फक्त दहा वर्षांचे असताना प्रायमरी परीक्षेमध्ये पूर्ण जिल्ह्यात सर्वोच्च अंक प्राप्त केले आणि पुढच्या शिक्षणासाठी टाऊन हायस्कूलला गेले.
रामानुजन खूप सौम्य आणि गोड वर्तनाचे व्यक्ती होते. ते इतके सौम्य होते की कोणीच त्यांच्यावर नाराज होऊ शकत नव्हते. हळूहळू यांच्या प्रतिभेने विद्यार्थी आणि शिक्षकांवर आपले छाप सोडण्यास सुरुवात केली. ते गणितामध्ये इतके गुणवान होते की ते शाळेमध्ये असतानाच त्यांनी कॉलेजच्या गणिताचा अभ्यास केला होता.
त्यांच्या खूप जास्त गणित प्रेमामुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे आले. खरंतर त्यांचं गणित प्रेम इतके वाढले होते की त्यांचा दुसर्या विषयांचा अभ्यास त्यांनी सोडून दिला होता. दुसऱ्या विषयांच्या तासांमध्ये सुद्धा ते गणिताचाच अभ्यास करायचे आणि प्रश्न सोडवायचे. याचा परिणाम असा झाला की इयत्ता अकरावीच्या परीक्षेमध्ये गणित विषयाला सोडून ते सर्व विषयांमध्ये नापास झाले जेणेकरून त्यांना मिळणारी शिष्यवृत्ती बंद झाली. त्यांच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती पहिल्यापासूनच योग्य नव्हती आणि शिष्यवृत्ती बंद झाल्यामुळे त्यांच्या अडचणी अजून वाढल्या. हा काळ त्यांच्यासाठी अडचणींनी भरलेला होता.
घराची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी रामानुजन ने गणिताची ट्युशन आणि काही अकाउंटचे काम केले. वर्ष 1907 मध्ये त्यांनी इयत्ता बारावीची खाजगी परीक्षा दिली पण या वेळेस सुद्धा ते नापास झाले. अयशस्वी झाल्यामुळे त्यांचे पारंपारिक शिक्षण समाप्त झाले.
संघर्षाचा वेळ
इयत्ता बारावीच्या खाजगी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे पुढील काही वर्ष त्यांच्यासाठी खूप गरिबीचे होते. यादरम्यान रामानुजन कडे कुठलीच नोकरी नव्हती आणि कुठल्याच संस्थे अथवा प्रोफेसर सोबत काम करण्याची संधी नव्हती. अशा विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा रामानुजन यांनी गणितामध्ये आपला शोध चालू ठेवला. गणिताच्या ट्युशन मधून महिन्याचे एकूण पाच रुपये भेटायचे आणि यामध्येच त्यांना सगळे भागवायला लागायचे. हा काळ त्यांच्यासाठी खूप सारे कष्ट आणि दुःखाने भरलेला होता. उदरनिर्वाहासाठी आणि गणिताचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी त्यांना इकडे-तिकडे भटकावे लागले आणि लोकांकडे मदतीची याचना करावी लागली.
येथे रामानुजन बेरोजगारी आणि गरिबीशी झुंजत होते तेव्हा त्यांच्या आईने त्यांचे लग्न जानकी नावाच्या मुलीशी केले. आर्थिक मंदी आणि पत्नीच्या मोठ्या जबाबदारीला पूर्ण करण्यासाठी ते नोकरीच्या शोधात ते मद्रासला गेले. त्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली नव्हती म्हणून त्यांना नोकरी भेटू शकली नाही आणि यामध्येच त्यांचे स्वास्थ्य पण खूप खराब झाले होते. यामुळे त्यांना परत कुंभकोणम मध्ये परतावे लागले. त्यांचे स्वास्थ्य चांगले झाल्यानंतर ते पुन्हा मद्रासला गेले आणि काही संघर्षानंतर ते तेथील एका Deputy Collector ला भेटले त्यांचे नाव श्री व्ही.रामस्वामी अय्यर होते व ते गणितामध्ये विद्वान होते. अय्यर यांनी त्यांची दुर्मिळ प्रतिभा ओळखली व आपले जिल्हाधिकारी रामचंद्र राव यांना सांगून त्यांच्यासाठी 25 रुपये मासिक शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्यात आली. 25 रुपयांच्या या मासिक शिष्यवृत्ती वरती रामानुजन ने एक वर्ष राहून आपले प्रथम शोध पत्र ‘जनरल ऑफ इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी’ मध्ये प्रकाशित केले. त्यांचे शीर्षक होते “बर्नौली क्रमांकांचे काही गुणधर्म”. रामचंद्र राव यांच्या सहाय्यतेने त्यांनी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये क्लर्कची नोकरी केली. या नोकरीमध्ये त्यांना गणिताच्या अभ्यासासाठी पर्याप्त वेळ भेटत होता.
प्रोफेसर हार्डी सोबत पत्रव्यवहार आणि परदेशात प्रवास
रामानुजनचे शोध हळूहळू पुढे चालले होते पण आता परिस्थिती अशी होती की बिना कुठल्या इंग्रजी गणित तज्ञाच्या मदतीशिवाय शोध कार्याला पुढे घेऊन जाता येत नव्हते. रामानुजन यांनी काही हितचिंतक आणि मित्रांच्या मदतीने त्यांचे कार्य लंडनमधील प्रसिद्ध गणितज्ञांकडे पाठवले, परंतु त्यांची फारशी मदत झाली नाही. यानंतर रामानुजन ने आपल्या संख्या सिद्धांत चे काही सूत्र प्रोफेसर शेशू अय्यर यांना दाखविले तेव्हा त्यांनी रामानुजन ला त्या काळातील प्रसिद्ध गणितज्ञ प्रोफेसर हार्डी यांच्याकडे पाठवण्याची सूचना दिली.
1913 मध्ये रामानुजन यांनी प्रोफेसर हार्डी यांना एक पत्र लिहिले आणि त्यांनी शोधलेल्या प्रमेयांची एक लांब लचक यादीही तयार करून पाठवली. पहिले प्रोफेसर हार्डी यांना पूर्ण समजले नाही म्हणून त्यांनी त्यांचे काही शिष्य आणि काही गणित तज्ञांकडून विचार घेतले व रामानुजन हे गणित क्षेत्रातील दुर्मिळ व्यक्तिमत्व असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
यानंतर प्रोफेसर हार्डी यांना असे वाटले की रामानुजन द्वारे केले गेलेले कार्य समजण्यासाठी व पुढे शोध घेण्यासाठी त्यांनी इंग्लंडला आलं पाहिजे. यानंतर प्रोफेसर हार्डी आणि रामानुजन यांच्यामध्ये पत्रव्यवहार सुरू झाला आणि प्रोफेसर हार्डी यांनी रामानुजन यांना केंब्रिजमध्ये येऊन शोधकार्य करण्यास सुचवले. सुरुवातीला रामानुजन ने सरळ नकार दिला होता पण हार्डीने आपले प्रयत्न चालू ठेवले आणि शेवटी रामानुजनला पटवण्यात त्यांना यश आले. हार्डी यांनी रामानुजन साठी केंब्रजच्या त्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्था केली.
येथून रामानुजन यांच्या जीवनामध्ये एका नवीन युगाचा आरंभ झाला आणि यामध्ये प्रोफेसर हार्डी यांची खूप मोठी महत्त्वपूर्ण भूमिका होती. रामानुजन आणि प्रोफेसर हार्डी यांच्यामधील मित्रता दोघांसाठीच लाभदायक सिद्ध झाली आणि दोघांनी एक दुसऱ्यासाठी पूर्ण वेळ काम केले. रामानुजन ने प्रोफेसर हार्डी सोबत मिळून खूप सारे शोध पत्र प्रकाशित केले आणि यांच्या एका विशेष शोधामुळे केंब्रिज विद्यापीठाने त्यांना बी.ए ची पदवी पण दिली.
सर्व काही ठीक चालले होते पण इंग्लंडचे वातावरण आणि जीवनशैली रामानुजन यांच्यासाठी योग्य नव्हती त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली. डॉक्टरांच्या तपासानंतर कळले की त्यांना क्षयरोग होता. त्यावेळेस क्षयरोगावर मात करण्यासाठी कोणतेच औषध अस्तित्वात नव्हते यामुळे रोगीला स्वास्थ्य लाभासाठी सेनेटोरियम मध्ये राहाव लागायचे. रामानुजन पण काही दिवसांसाठी सेनेटोरियममध्येच राहिले.
रॉयल सोसायटीचे सदस्य
यानंतर रामानुजन यांना रॉयल सोसायटीचे सहकारी म्हणून घोषित करण्यात आले. रॉयल सोसायटीच्या पूर्ण इतिहासामध्ये यांच्यापेक्षा कमी वयाचा कोणताच सदस्य आत्तापर्यंत नव्हता. रॉयल सोसायटीचे सदस्य झाल्यानंतर ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप प्राप्त करणारे ते पहिले भारतीय होते.
एका प्रकारे त्यांचे करिअर खूप चांगल्या दिशेने चालले होते परंतु त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. यानंतर डॉक्टरांनी त्यांना भारतात परत जायची सूचना दिली. भारतात परत आल्यानंतर त्यांना मद्रास विद्यापीठामध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि ते अध्यापन आणि शोध कार्यामध्ये पुन्हा रमले गेले.
मृत्यू
भारतात परतल्यानंतर पण त्यांच्या आरोग्य मध्ये सुधार झाला नाही आणि त्यांची परिस्थिती खूपच गंभीर होत चालली होती. हळूहळू डॉक्टरने सुद्धा उत्तर दिले, त्यांचा अंतिम वेळ जवळ आला होता. आपल्या आजाराशी लढत-लढत शेवटी 26 एप्रिल 1920 ला त्यांचे निधन झाले.
Final Worlds
श्रीनिवास रामानुजन् यांचे वयाच्या ३३ वर्षी निधन झाले होते. अशा महान गणित तज्ञाचे निधन गणित क्षेत्रासाठी खूप मोठे नुकसान होते. त्यांनी गणित क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी आमचा सलाम. मला अशा आहे तुम्हाला हा Srinivas Ramanujan Biography in Marathi वर आमचा लेख वाचून श्रीनिवास रामानुजन् यांच्याबद्दल जाणून घ्यायला मदत झाली असेल.
हे देखील वाचा