155+ General Knowledge Questions with Answers in Marathi 2024

General Knowledge Questions with Answers in Marathi 2024

स्पर्धा परीक्षा असो, बँक एक्झाम असो किंवा शाळेतला एखादा पेपर असो सर्वच परीक्षेमध्ये जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञानाविषयी प्रश्न हे नेहमीच विचारले जातात. तसेच आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या राज्यामध्ये काय घडत आहे हे जाणून घेणे ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणूनच आजच्या या General Knowledge Questions with Answers in Marathi च्या लेखांमधून मी तुमच्यासाठी GK संबंधी महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे त्यामुळे या लेखात दिलेले प्रश्न पूर्ण वाचा आणि तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.

General knowledge questions in Marathi

General knowledge questions in Marathi
General knowledge questions in Marathi

Q1. ‘उडाण’ योजना केंद्र शासनाकडून कशासाठी आहे?

A. पायलट प्रशिक्षण
B. विमाने उत्पादन
C. माफक दरात हवाई सेवा
D. विमानतळ विकास

Q2. ३१ ऑक्टोबर हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा करतात?

(A) राष्ट्रीय नागरी सेवा दिवस
(B) राष्ट्रीय शांतता दिवस
(C) राष्ट्रीय आरोग्य दिवस
(D) राष्ट्रीय एकता दिवस

Q3. ‘बावळी मुद्रा देवळी निद्रा’ या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता?

A. तिरळा मनुष्य
B. दिसणार बावळट परंतु हुशार मनुष्य
C. चमत्कारिक मनुष्य
D. दिसण्यात भोळा परंतु दृष्ट मनुष्य

Q4. SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली?

A. रायगड
B. शिवनेरी
C. पुरंदर
D. लोहगड

Q5. राष्ट्रीय उत्पादकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

A. 09 फेब्रुवारी
B. 10 फेब्रुवारी
C. 11 फेब्रुवारी
D. 12 फेब्रुवारी

Q6. भारतात कोणत्या राष्ट्रीय नेत्याच्या जयंती दिवशी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो?

(A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(B) महात्मा गांधी
(C) सरदार वल्लभभाई पटेल
(D) पंडित जवाहरलाल नेहरू

Q7. राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागात पसरले ला हा ………… वाळवंटाचा प्रदेश आहे .

A) सहारा
B) थार
C) कच्छचे रण
D) कालाहरी

Q8. कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होते?

A. यवतमाळ
B. परभणी
C. अमरावती
D. नाशिक

Q9. वनस्पतींना भावना असतात, असा सिद्धांत कोणी मांडला?

A. डॉ. खुराणा
B. डॉ. सुभाष बोस
C. डॉ. स्वामीनाथन
D. डॉ. जगदीशचंद्र बोस

Q10. सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला?

A. डॉ. भटकर
B. डॉ. गोवारीकर
C. न्यूटन
D. आईन्स्टाईन

Q11. श्री. आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. वर्धा
B. चंद्रपूर
C. गडचिरोली
D. गोंदिया

Q12. महाराष्ट्रात मावळ प्रांत म्हणजे खालीलपैकी कोणता भाग आहे, योग्य पर्याय निवडा?

A. सह्याद्रीच्या पश्चिम भाग
B. अजिंठा भाग
C. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा भाग
D. कोकण किनारपट्टीचा भाग

Q13. MIA म्हणजे काय?

A. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी
B. महाराष्ट्र शिक्षण अकॅडमी
C. महाराष्ट्र गोपनिय अकॅडमी
D. महाराष्ट्र गुप्तवार्ता अकॅडमी

Q14. स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यामधील दुवा संबोधले जाते?

A. सभापती
B. पंतप्रधान
C. परराष्ट्रमंत्री
D. उपराष्ट्रपती

Q15. 1991 ची कर सुधारणा समिती खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली होती?

A) विजय केळकर
B) राजा जे. चेलिहा
C) एल. के. झा
D) एम. गोविंद राव

Q16. भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार का टाकला?

A. त्यामुळे भारताची फाळणी होणार होती
B. त्यामध्ये ले बर पार्टीचा प्रतिनिधी नव्हता
C. त्याचे नेतृत्व सायमनने केले होते
D. त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता

Q17. चळवळ करा, अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते?

A. फिरोज शहा मेहता
B. रंगय्या नायडू
C. नरेंद्रनाथ सेठ
D. दादाभाई नौरोजी

Q18. पेंच धरण प्रकल्पातील महाराष्ट्राचे सहकारी राज्य कोणते?

A. गोवा
B. कर्नाटक
C. आंध्र प्रदेश
D. मध्य प्रदेश

Q19. अनंत भालेराव स्मुर्ती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) सुधीर रसाळ
(B) मधुकर मुळे
(C) मिलिंद बोकील
(D) अरविंद गोरे

Q20. भारतात ज्वारी या पिकाचे क्षेत्र व उत्पादनात……. हे राज्य आघाडीवर आहे?

A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. पंजाब
D. आंध्र प्रदेश

General knowledge questions in Marathi with answer

General knowledge questions in Marathi with answer
General knowledge questions in Marathi with answer

Q21. ज्या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची विधानसभा अस्तित्वात नाही त्या प्रदेशाच्या प्रशासनास कोण जबाबदार आहे ?

A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C.गृहमंत्री
D.जवळच्या राज्यातील सरकार

Q22. गांधार शिल्पशैली ही कोणत्या दोन देशाच्या शिल्पशैलीतून निर्माण झाली आहे ?

A. भारत व ग्रीस
B. भारत व इराण
C. भारत व श्रीलंका
D. भारत व बांग्लादेश

Q23. एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो ?

A. पंतप्रधान
B. गृहमंत्री
C. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
D. लोकसभा सभापती

Q24. स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य देणारा 1870 मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी संमत केला होता ?

A. लॉर्ड हॉबहाऊस
B. लॉर्ड रिपन
C. लॉर्ड डफरीन
D. लॉर्ड मेयो

Q25. रेगूर मृदा हि खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते?

A. दख्खनचा पठारी प्रदेश
B. कोकणातील डोंगराळ प्रदेश
C. कोकण किनारपट्टी चिंचोळी मैदान
D. भामरागड चा डोंगरी प्रदेश

Q26. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात……. येथे जलविद्युत केंद्र आहे?

A. कोयना
B. जायकवाडी
C. खोपोली
D. थळवायशेत

Q27. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?

A. मैना
B. भारद्वाज
C. हरीयाल
D. मोर

Q28. ………. जिल्ह्यातील उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळतात?

A. रायगड
B. सिंधुदुर्ग
C. यवतमाळ
D. नांदेड

Q29. भारतीय राज्यघटना घटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते?

A. डॉ. बी. एन. राव
B. डॉ. बी. आर. आंबेडकर
C. एम. सी. सेटलवार्ड
D. के. एम. मुंशी

Q30. ‘वेदाकडे वळा’ असे कोणी म्हटले आहे?

A. रामकृष्ण परमहंस
B. राजा राम मोहन रॉय
C. स्वामी दयानंद सरस्वती
D. स्वामी विवेकानंद

Q31. अजीम प्रेमजी हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत ?

A. इन्फोसिस
B. कॉग्निझंट
C. विप्रो
D. डेल

Q32. टंगस्टन धातूच्या कोणत्या महत्त्वपूर्ण गुणधर्मामुळे त्याचा विजेच्या दिव्यात वापर करतात ?

A.उच्च वाहकता
B. उच्च द्रवणांक
C.उच्चतन्यता
D. वरील सर्व

Q33. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार…….. आहे?

A. चौरसाकृती
B. त्रिकोणाकृती
C. आयताकृती
D. वर्तुळाकार

Q34. NEERI ही संस्था कुठे आहे?

A. पुणे
B. नाशिक
C. नागपूर
D. दिल्ली

Q35. महाराष्ट्राने भारताचा ……. % प्रदेश व्यापलेला आहे?

A. 6%
B. 5%
C. 9%
D. 10%

Q36. अनुसया उईके यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली?

A) त्रिपुरा
B) मणिपूर
C) तेलंगना
D) आसाम

Q37. खालीलपैकी कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते ?

A.म्हैसूर
B. बेंगलोर
C. चंदिगड
D. नाशिक

Q38. भारतात हरित क्रांतीमुळे खालीलपैकी कोणत्या एका पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाले ली आहे?

A. ज्वारी
B. गहू
C. कापूस
D. ऊस

Q39. मानवी शरीरातील सर्वाधिक लांबीची पेशी कोणती?

A. लोहित रक्तकणिका
B. रक्त बिंबिका
C. चेतापेशी
D. श्वेत रक्तकणिका

Q40. वनस्पती मधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील कोणता घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतो ?

A. तंतूकणिका
B. लयकारिका
C. रायबोसोम्स
D. हरितलवक

GK Questions in Marathi with answers

GK Questions in Marathi with answers
GK Questions in Marathi with answers

Q41. अन्नपचनाला सुरुवात शरीराच्या कोणत्या भागात प्रथम होते?

A. यकृत
B. तोंड
C. पोट
D. आतडे

Q42. ‘स्पायरोगायरा’ काय आहे?

A. कवक
B. शैवाल
C. एकदल वनस्पती
D. द्विदल वनस्पती

Q43. 1948 मधील ‘विद्यापीठ शिक्षण आयोगाला’ कोणत्या नावाने ओळखले जाते?

A. कोठारी आयोग
B. मुदलियार आयोग
C. राधाकृष्णन आयोग
D. कोलकत्ता विद्यापीठ आयोग

Q44. त्वरण म्हणजे कशामधील बदलाचा दर होय?

A. वेग
B. अंतर
C. चाल
D. विस्थापन

Q45. कोणत्या वर्षी लोकायुक्त संस्थेची महाराष्ट्रत स्थापना झाली?

A. 1970
B. 1991
C. 1971
D. 1981

Q46. शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा

A. लक्षवेधी
B. उदयमुख
C. रुबाबदार
D. अष्टावधानी

Q47. भारतात कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत?

A. बिहार
B. कर्नाटक
C. महाराष्ट्र
D. उत्तर प्रदेश

Q48. कोणत्या शहराला ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ असे संबोधले जाते?

A. नागपूर
B. पुणे
C. मुंबई
D. यापैकी काही नाही

Q49. दख्खनचे ताज कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. अमरावती
B. रायगड
C. बुलढाणा
D. औरंगाबाद

Q50. कुल्लू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

A. उत्तर प्रदेश
B. हिमाचल प्रदेश
C. केरळ
D. उत्तराखंड

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी मराठी

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी मराठी
सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी मराठी

Q51. जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे?

A. लाहोर
B. कराची
C. मुंबई
D. अलाहाबाद

Q52. सी. एच. विजयशंकर यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली?

A) मणिपूर
B) मेघालय
C) आसाम
D) झारखंड

Q53. 2023 या वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे?

(A) १५०
(B) १४८
(C) १४६
(D) १४५

Q54. खालीलपैकी कोणते जनसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार बरोबर आहे?

A. हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन
B. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन
C. हिंदू, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम
D. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, जैन

Q55. खानदेशात भिल्लांनी……. यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला?

A. कुवरसिंग
B. कजारसिंग
C. मदनसिंग
D. सेवाराम

Q56. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?

A. होमरूल चळवळ- 22 सप्टेंबर 1931
B. पुणे करार- 24 सप्टेंबर 1932
C. चले जाव चळवळ- 25 सप्टेंबर 1934
D. आझाद हिंद सेनेची स्थापना- 28 सप्टेंबर 1935

Q57. बराकपूर तुकडीतील कोणत्या हिंदी सैनिक आणि ब्रिटिश मेजर वर गोळी झाडली?

A. अजी मुल्ला
B. मंगल पांडे
C. तात्या टोपे
D. नानासाहेब

Q58. असहकार चळवळीत दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्या शहरात झेंडा सत्याग्रह लक्षवेधी ठरला होता?

A. पुणे
B. नाशिक
C. नागपूर
D. सोलापूर

Q59. 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कोणी केले ?

A. तात्या टोपे
B. नानासाहेब पेशवे
C. बहादुर शहा जफर
D. अजी मुब्लाह

Q60. कोणत्या देशाच्या न्यायालयाने भारताच्या ८ माजी नौसैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे?

(A) पाकिस्तान
(B) अफगाणिस्तान
(C) इराक
(D) कतार

Easy general knowledge questions and answers in Marathi

Easy general knowledge questions and answers in Marathi
Easy general knowledge questions and answers in Marathi

Q61. कोणत्या देशाचा सुलतान हा जगभरातील मुस्लिम धर्मीयांचा खलिफा तथा धर्म प्रमुख मानला जातो?

A. अफगाणिस्तान
B. पाकिस्तान
C. तुर्कस्तान
D. व्हॅटिकन सिटी

Q62. भारतात लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी कोणत्या पंचवार्षिक योजनेत कुटुं ब नियोजन कार्यक्रमावर भर देण्यात आला?

A. चौथ्या
B. पाचव्या
C. सहाव्या
D. यापैकी नाही

Q63. भारतातील बहुतांशी पाऊस……. प्रकारचा आहे?

A. ईशान्य मान्सून
B. वायव्य मान्सून
C. नैऋत्य मान्सून
D. अग्नेय मान्सून

Q64. भारतात सर्वाधिक नागरी सहकारी बँका कुठे आहेत?

A. कर्नाटक व महाराष्ट्र
B. गुजरात व महाराष्ट्र
C. महाराष्ट्र व आंध्र प्रदेश
D. गुजरात व तामिळनाडू

Q65. भारतीय राज्य घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते?

A. डॉ. राजेंद्र प्रसाद
B. सच्चिदानंद सिन्हा
C. पंडित नेहरू
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Q66. द हिंदू पेट्रियाट हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

A. अरविंद घोष
B. लाला लाजपत राय
C. बिपिन चंद्र पाल
D. हरिश्चंद्र मुखर्जी

Q67. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ साली कुठे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली?

A. दिल्ली
B. अहमदाबाद
C. नागपूर
D. कोलकाता

Q68. सप्टेंबर 1929 मध्ये लाहोर गटातील कोणत्या क्रांतीकाराने 64 दिवसांच्या उपोषणानंतर तुरुंगातच आत्मबलिदान केले ?

A. बटुकेश्वर दत्त
B. बाबू गेणू
C. शिरीष कुमार
D. जतीन दास

Q69. As the wheel turns या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

A. अश्विन प्रताप
B. रणजित प्रताप
C. शशी थरूर
D. अमर्त्य सेन

Q70. “विनिग द इनर बैटल” पुस्तक कोणी लिहिले आहे?

(A) एस. कृष्णामौली
(B) शेन वाटसन
(C) आर. सावंतन
(D) यापैकीनाही

Q71. मुख्यमंत्री किसान जीवन ज्योती योजना कोणत्या राज्यात सुरु आहे?

A. बिहार
B. महाराष्ट्र
C. उत्तर प्रदेश
D. पंजाब

Q72. खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात?

A. संत्री
B. तूप
C. बटाटे
D. भुईमूग

Q73. महाराष्ट्राचे राज्यफुल जारूलची (ताम्हण) फुले कोणत्या रंगाची आहेत?

A. पिवळी
B. पांढरी
C. जांभळी
D. वेळी

Q74. राज्यघटनेतील आणीबाणी विषयक अधिकार……… या देशाकडून स्वीकारण्यात आला आहे?

A. रशिया
B. आयर्लंड
C. कॅनडा
D. जर्मनी

Q75. शेती हा विषय कोणत्या सूचित देण्यात आले ला आहे?

A. संघ सूची
B. राज्य सूची
C. समवर्ती सूची
D. यापैकी कोणताही नाही

Q76. पेशीमधील…….. ना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात?

A. तंतूकणिका
B. लयकायिका
C. तारककाय
D. रिक्तका

Q77. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या Brand Ambassador पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) वीरेंद्र सेहवाग
(D) महेंद्र सिंग धोनी

Q78. एल. पी. जे. मध्ये कोणते घटक असतात?

A. मिथेन व ब्युटेन
B. मिथेन व इथेन
C. ब्युटेन व आयसोब्युटेन
D. मिथेन आणि इथेनॉल

Q79. नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे कोणता दृष्टीदोष उद्भवतो?

A. केवळ दूरदृष्टीता
B. केवळ निकट दृष्टिता
C. वृद्ध दृष्टीता
D. रंग आंधळे पणा

Q80. नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

A. जलतरण
B. क्रिकेट
C. भालाफेक
D. गोळा फेक

General knowledge questions and answers in Marathi

General knowledge questions and answers in Marathi
General knowledge questions and answers in Marathi

Q81. स्वर्गीय वसंतराव नाईक हे कोणत्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते?

A. 1965-77
B. 1963-75
C. 1969-79
D. 1961-71

Q82. उस्ताद झाकीर हुसेन कोणत्या वाद्याची संबंधित आहेत?

A. सारंगी
B. सितार
C. तबला
D. यापैकी नाही

Q83. 43,200 सेकंद म्हणजे किती तास?

A. 1 तास
B. 6 तास
C. 12 तास
D. 24 तास

Q84. अन्नसुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

A. महाराष्ट्र
B. छत्तीसगड
C. तामिळनाडू
D. गुजरात

Q85. दिल्ली शहरास नॅशनल कॅपिटल टे रिटरीचा दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे प्राप्त झाला?

A. 61
B. 69
C. 65
D. 71

Q86. काजींद-२०२३ हा युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशा दरम्यान सुरु झाला आहे?

(A) चीन व अमेरिका
(B) ऑस्ट्रेलिया व इंग्लंड
(C) भारत व कझाकीस्तान
(D) श्रीलंका व मालदीव

Q87. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून CO2 ची निर्मिती होत नाही?

A. ज्वलन
B. श्वसन
C. सेंद्रिय विघटन
D. प्रकाश संश्लेषण

Q88. आशियातील सर्वात मोठ्या ऐरो इंडिया २०२३ प्रदर्शनाचे उदघाट् न कोणी केले ?

A) नरेंद्र मोदी
B) राजनाथ सिंह
C) नितीन गडकरी
D) अमित शहा

Q89. सार्क : ८ :: युरोपियन युनियन : ?

A. 10
B. 27
C. 15
D. 18

Q90. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्यलढ्यातील ‘तुफान सेना’ स्थापन झाली होती?

A. सोलापूर
B. पुणे
C. सातारा
D. कोल्हापूर

Q91. महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते?

A. कोल्हापूर- गोंदिया
B. पुणे- मुंबई
C. मुंबई- कोल्हापूर
D. मुंबई- नागपूर

Q92. नॅशनल डिफेन्स कॉलेज कुठे आहे?

A. पुणे
B. देहरादून
C. हैदराबाद
D. नवी दिल्ली

Q93. केंद्रीय ऊस संशोधन संस्था कुठे आहे?

A. पाडेगाव
B. कोईमतुर
C. लखनऊ
D. भोपाळ

Q94. ‘मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?

A. वीरेंद्र सेवाग
B. एम एस धोनी
C. विराट कोहली
D. सचिन तेंडुलकर

Q95. ‘ओसामा बिन लादेनला’ नेस्तनाबूत केलेल्या ऑपरेशन चे नाव काय आहे?

A. नेपच्यून स्पिअर
B. डेड.एंड
C. ऑप . X
D. स्माईलिंग बुद्धा

Q96. ‘आगाखान पॅलेस’ येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला. आगाखान पॅलेस महाराष्ट्रात……. येथे आहे?

A. अहमदनगर
B. औरंगाबाद
C. पुणे
D. मुंबई

Q97. खालीलपैकी कोणते शहर ऑस्ट्रेलियात आहे?

A. लिस्बन
B. रोम
C. पर्थ
D. व्हिएन्ना

Q98. विधान परिषदे च्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?

A. तीन वर्षाचा
B. चार वर्षाचा
C. पाच वर्षाचा
D. सहा वर्षाचा

Q99. खालीलपैकी कोणते जीवनसत्व ‘बी कॉम्प्ले क्स’ समूहाशी संबंधित नाही?

A. थाममीन
B. रेटिनॉल
C. फॉलिक ऍसिड
D. रायबोफ्ले बीन

Q100. जीवनसत्व आणि आजार यांच्याशी संबंधित खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे?

A. जीवनसत्व अ – रातांधळे पणा
B. जीवनसत्व ब – बेरीबेरी
C. जीवनसत्व क – स्कर्व्ही
D जीवनसत्व इ – मनोविकृती

Latest general knowledge in Marathi

Latest general knowledge in Marathi
Latest general knowledge in Marathi

Q101. सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ?

A) रत्नागिरी
B) ठाणे
C) सोलापूर
D) नाशिक

Q102. तलाठी अस्थापना खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याकडे असते?

A. तहसीलदार
B. उपविभागीय अधिकारी
C. महसूल मंत्री
D. मंडळ अधिकारी

Q103. वराती मागून घोडे या म्हणीचा अर्थ काय?

A. वरातीमध्ये घोडे मागे ठेवणे
B. वरातीमध्ये घोडे न ठेवणे
C. वेळ निघून गेल्यावर कृती करणे
D वेळेवर कृती करणे

Q104. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

A. महाराष्ट्राचा राज्य पक्षी- हरियाल
B. महाराष्ट्राचा राज्य पुष्प- ताम्हण
C. महाराष्ट्राचे राज्य झाड- निम
D. महाराष्ट्राचा राज्य प्राणी- शेकरू

Q105. आएआएटी मुंबई च्या मुख्य इमारतीस कोणाचे नाव दिले आहे?

(A) राजीव गांधी
(B) ए पी जे अब्दुल कलाम
(C) रतन टाटा
(D) नंदन निलेकणी

Q106. काजींद-२०२३ हा युद्ध सराव भारत व कझाकिस्तान यांच्यात कोणत्या कालावधीत पार पडणार आहे?

(A) ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर
(B) ३० ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर
(C) १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर
(D) ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर

Q107. प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे?

(A) बिहार
(B) गुजरात
(C) महाराष्ट्र
(D) मध्यप्रदेश

Q108. गंगाधर पानतावणे यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

A. पद्मश्री
B. पद्मविभूषण
C. अर्जुन पुरस्कार
D. भारतरत्न

Q109. वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) याठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र आहे?

A. आंबा संशोधन केंद्र
B. भात संशोधन केंद्र
C. फेणी संशोधन केंद्र
D. काजू संशोधन केंद्र

Q110. राष्ट्रीय मध्यान आहार योजनेची सुरुवात केव्हा झाली?

A. 15 ऑगस्ट 1990
B. 15 ऑगस्ट 1992
C. 15 ऑगस्ट 1995
D. 15 ऑगस्ट 1999

Q111. मधुमेह करिता खालीलपैकी कोणती चाचणी करतात?

A. SGPT TEST
B. Widal TEST
C. ELISA
D. HbA1C

Q112. ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मार्च 2021 मध्ये कोणती योजना सुरू केली ?

A) नंदादे वी कन्या योजना
B) महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना
C) मिशन शक्ती योजना
D) मुख्यमंत्री लाडली योजना

Q113. जगात सर्वाधिक रोबोट कामावर ठेवणारा देश कोणता आहे?

(A) भारत
(B) चीन
(C) दक्षिण कोरिया
(D) अमेरिका

Q114. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे?

A. पुणे
B. नागपूर
C. मुंबई
D. गडचिरोली

Q115. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केले ‘मिशन संपर्क’ अभियान कोणत्या रोगाशी निगडित आहे?

A. कुष्ठरोग
B. क्षयरोग
C. एड्स
D. कॅन्सर

Q116. रॅपिड ऍक्शन फोर्स (RAF) हे विशेष पोलीस पथक कोणत्या केंद्रीय पोलीस दलाचे अंग आहे?

A. सी. आर. पी. एफ
B. सी. आय. एस. एफ
C. पी. एस. एफ
D. आय. टी. बी. पी.

Q117. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब…….. यांच्या कारकिर्दीत करण्यात आला?

A. लॉर्ड विल्यम बेटिंग
B. लॉर्ड डलहौसी
C. सर जॉन शोअर
D. सर चार्ल्स मेटुकाफ

Q118. ‘At the feet of Mahatma Gandhi’ या पुस्तकाचे लेखक कोण?

A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. सरदार वल्लभाई पटेल
C. डॉ. राजेंद्र प्रसाद
D. पंडित मोतीलाल नेहरू

Q119. पुण्याच्या……. या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या हंगामी गव्हर्नर वर गोळ्या झाडल्या?

A. विष्णू गणेश पिंगळे
B. वासुदेव बळवंत गोगटे
C. अनंत कान्हेरे
D. श्रीपाद अमृत डांगे

Q120. जि-२० वर आधारित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किती रुपायाची दोन विशेष स्मारक नाणी जारी केली आहेत?

(A) १०० आणि ७५
(B) ५० आणि २५
(C) १०० आणि ५०
(D) ७५ आणि ५०

Common general knowledge questions and answers in Marathi

Common general knowledge questions and answers in Marathi
Common general knowledge questions and answers in Marathi

Q121. ‘रक्ताचे पाणी करणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

A. रक्तामध्ये पाणी मिळवणे
B. रक्त पाण्यात टाकणे
C. खूप कष्ट करणे
D. रक्त आणि पाणी एकमेकांत मिसळणे

Q122. ‘चले जाव’ चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले ?

A. आचार्य नरेंद्र देव
B. जयप्रकाश नारायण
C. डॉ. राम मनोहर लोहिया
D. उषा मेहता

Q123. कुष्ठरोग निवारण व पुनर्वसनाच्या कार्यासाठी आळंदी जवळ डुडुळगाव येथे चालवल्या जाणाऱ्या…….. संस्थेशी डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे नाव निगडीत आहे?

A. तपोवन
B. आनंदवन
C. आनंदग्राम
D. हेमलकसा

Q124. ‘अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडित नाही?

A. सन्मती बाल निकेतन, हडपसर
B. ममता बाल सदन, कुंभारवळण
C. मुक्ती सदन, केडगाव
D. माईचा आश्रम, चिखलदरा

Q125. संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात……. यांनी सुरू केली?

A. रघुनाथ धोंडो कर्वे
B. दुर्गा भागवत
C. शकुंतलाबाई परांजपे
D. जनाक्का शिंदे

Q126. बोकारो येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लागले आहे?

A. रशिया
B. जपान
C. ब्रिटन
D. जर्मनी

Q127. ‘ग्रे हाऊंडस’ दहशतवाद विरोधी कमांडो पथक कोणत्या राज्यात आहे?

A. झारखंड
B. महाराष्ट्र
C. छत्तीसगड
D. तेलंगणा

Q128. 1924 साली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे खालीलपैकी कोण अध्यक्ष होते?

A. रासबिहारी बोस
B. महात्मा गांधी
C. सरोजिनी नायडू
D. जवाहरलाल नेहरू

Q129. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे निधन केव्हा झाले?

A. 10 मार्च 1897
B. 11 मार्च 1897
C. 12 मार्च 1897
D. 13 मार्च 1897

Q130. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे?
A. कस्तुरबा
B. कमलाबाई
C. पुतलीबाई
D. किरनबेन

Q131. इतिहासात ‘लाल बाल पाल’ मध्ये ‘पाल’ म्हणजे……. हे होते?

A. बिपिन चंद्र पाल
B. स्वामी पाल
C. शरद चंद्र पाल
D. राजेंद्र पाल

Q132. ‘चासकमान’ प्रकल्प कोणत्या तालु क्यात आहे?

A. सासवड
B. पुरंदर
C. बारामती
D. खेड

Q133. नॉर्थ-इस्ट इंडिया फेस्टिवल कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता?

(A) इस्राईल
(B) व्हिएतनाम
(C) सिंगापूर
(D) मलेशिया

Q134. खालीलपैकी कोणती सज्ञा सायबर गुन्ह्याशी संबंधित नाही?

A. फिशिंग
B. हॅकिंग
C. कार्ड क्लोनिंग
D. स्मगलिंग

Q135. अजिंठा व वेरूळ लेण्यामध्ये खालील पैकी कोणत्या कथा चितारले ्या आहेत?

A. रामायण
B. जातक
C. महाभारत
D. यापैकी काही नाही

Q136. देशातील सर्वात मोठया अंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि सभागृह संकुलाचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले आहे?

(A) दौपद्री मुर्मू
(B) राहुल गांधी
(C) नरेंद्र मोदी
(D) ओम बिर्ला

Q137. भारतात हरित क्रांतीची सुरुवात …… पासून झाली?

A. 1947
B. 1951
C. 1965
D. 1974

Q138. खालीलपैकी प्रसिद्ध वीणा वादक कोण आहेत?

A. पंडित विश्वमोहन भट
B. व्ही. नायडू
C. लालगुडी विजयालक्ष्मी
D. डी. बालकृष्ण

Q139. DRDO ची स्थापना केव्हा झाली?

A. 1950
B. 1958
C. 1960
D. 1956

Q140. मी निबंध लिहीत जाईन. काळ ओळखा

A. अपूर्ण भविष्यकाळ
B. पूर्ण भविष्यकाळ
C. साधा भविष्यकाळ
D. रीती भविष्यकाळ

General knowledge questions and answers for competitive exams in Marathi

General knowledge questions and answers for competitive exams in Marathi
General knowledge questions and answers for competitive exams in Marathi

Q141. गुलाब, बारदान, गालिचा, अब्रू हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत?

A. कन्नड
B. अरबी
C. पारसी
D. पोर्तुगीज

Q142. ओढाळ म्हणजे जनावरांच्या दोन पायांना बांधले ल्या दोरीला काय म्हणतात?

A. दुपकी
B. दुपांडी
C. दुपटे
D. दुबंधी

Q143. जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म कोठे झाला?

A. मुरबाड
B. गागोदे
C. कोतळूक
D. मुरुड

Q144. खालीलपैकी कोणती तारीख बरोबर आहे?

A. 31/09/2008
B. 31/07/2008
C. 29/02/2009
D. 31/11/2008

Q145. देशातील कोणत्या राज्याच्या सरकारने उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) गुजरात
(D) केरळ

Q146. सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक(1883) कोणी लिहिले ?

A. विनोबा भावे
B. विष्णुदास भावे
C. श्रीहरी भावे
D. अरुण साधू

Q147. खालीलपैकी प्रसिद्ध सरोदवादक कोण आहेत?

A. अमजद अली खान
B. मिलिंद तुलणकर
C. पाशीराम निर्मल
D. कृष्णदास

Q148. खालीलपैकी भारतीय अणूयुगाचे जनक कोण आहेत?

A. होमी भाभा
B. विक्रम साराभाई
C. रुदरफोर्ड
D. जेम्स चॅडविक

Q149. ‘शतदा प्रेम करावे’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

A. दादाजी खोब्रागडे
B. जिव्या सोमामसे
C. अरुण साधू
D. अरुण दाते

Q150. लोकायुक्तांची नेमणूक कोण करतो?

A. राज्यपाल
B. राष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. यापैकी नाही

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी

Q151. ‘लोटा’ हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतो ?

A. मध्यप्रदेश
B. उत्तरप्रदेश
C. हरियाणा
D. गुजरात

Q152. ‘ताकापुरती आजी’ या म्हणीचा अर्थ काय?

A. आजीकडू न ताक मिळवणे
B. ताक मिळवण्यासाठी आजी कडे जाणे
C. आजीकडू न ताक आणणे
D. आपले काम होईपर्यंत एखाद्याचे गुणगान करणे

Q153. इंद्रधनुष्य दिसणे हे कशाचे उत्तम उदाहरण आहे?

A. प्रकाशाचे परावर्तन
B. प्रकाशाचे अपस्करण
C. प्रकाशाचे प्रकिर्णन
D. यापैकी नाही

Q154. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा?

A. 23 एप्रिल – जागतिक पुस्तक दिन
B. 10 ऑक्टोबर – टपाल दिन
C. 16 सप्टें बर – सेवा दिन
D. 29 जुलै – आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

Q155. भारतीय रेल्वेची मधमाशी योजना कोणत्या राज्याने सुरु केली?

A. महाराष्ट्र
B. आसाम
C. मध्य प्रदेश
D. हरियाणा

Q156. अटलांटिक महासागर पार करणारी महाराष्ट्राची पहिली महिला कोण आहे?

A. आरोही पंडित
B. जी. एस. लक्ष्मी
C. उषा मेहता
D. दीपिका पाटील

Q157. देशात कोणते राज्य सर्वाधिक वस्तू आणि सेवा कर GST चोरीत आघाडीवर आहे?

(A) तामिळनाडू
(B) तेलंगना
(C) बिहार
(D) महाराष्ट्र

Q158. म्हण पूर्ण करा ‘ श्री च्या मागोमाग…… येतो.’

A. ज्ञ
B. ग
C. क
D. छ

Q159. इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

A. बॅडमिंटन
B. गोल्फ
C. क्रिकेट
D. फुटबॉल

Q160. ‘हळद लागणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता?

A. कावीळ होणे
B. विवाह होणे
C. फसवणूक होणे
D. सात देवळे

मला आशा आहे General Knowledge Questions with Answers in Marathi या लेखात दिलेले प्रश्न तुम्हाला समजले असतील. या वरील दिलेल्या प्रश्नांमध्ये तुम्हाला काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा.

Also Read

GK Questions in Marathi with Answers

1 thought on “155+ General Knowledge Questions with Answers in Marathi 2024”

Leave a Comment