4 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी | 4 February 2023 Current Affairs in Marathi

4 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी | 4 February 2023 Current Affairs in Marathi

4 February 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.

1. जानेवारी 2023 पर्यंत भारतात एकूण रामसर स्थळे किती आहेत?

उत्तर: 75

2. प्रजासत्ताक दिनी ऑनलाइन मतदानाद्वारे कोणत्या राज्य सरकारने सर्वोत्तम झांकी पुरस्कार जिंकला आहे ?

उत्तर: गुजरात

 • प्रथम – गुजरात (स्वच्छ-हरित ऊर्जा कार्यक्षम गुजरात)
 • दुसरा – उत्तर प्रदेश (अयोध्या दीपोत्सव)
 • तिसरा – महाराष्ट्र (साडे तीन शक्तीपीठ आणि नारी शक्ती)

3. पश्चिम मध्य रेल्वेने होशंगाबाद रेल्वे स्थानकाचे चे नाव बदलून काय ठेवलेले आहे ?

उत्तर: नर्मदापुरम रेल्वे स्टेशन

 •  हबीबगंज रेल्वे स्टेशन, भोपाळ, राणी कमलापती रेल्वे स्टेशन
 •  फैजाबाद जंक्शन रेल्वे स्टेशन, अयोध्या, उत्तर प्रदेश – अयोध्या कॅट
 •  ‘मियां का बाडा’ रेल्वे स्टेशन, राजस्थान – ‘महेश नगर हॉल्ट’
 •  अलाहाबाद जंक्शन, उत्तर प्रदेश- प्रयागराज जंक्शन
 •  मुगलसराय रेल्वे जंक्शन, उत्तर प्रदेश – दीनदयाल उपाध्याय जंक्शन रेल्वे स्टेशन
 •  झाशी रेल्वे स्टेशन, उत्तर प्रदेश – वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन
 •  मंडुआडीह स्टेशन, उत्तर प्रदेश- बनारस स्टेशन
 •  हुबळी रेल्वे स्टेशन, कर्नाटक- श्री सिद्धरुद्ध स्वामी जी रेल्वे स्टेशन
 •  नौगढ़ रेल्वे स्टेशन, उत्तर प्रदेश- सिद्धार्थनगर रेल्वे स्टेशन
 •  होशंगाबाद रेल्वे स्थानक, मध्यप्रदेश – नर्मदापुरम रेल्वे स्टेशन
 •  चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळ – शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
 •  आगरतळा विमानतळ- महाराजा बीर बिक्रम विमानतळ
 •  अयोध्येतील विमानतळ – मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ

4. भारतासाठी मॉर्गन स्टॅनलीचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर: अरुण कोहली

5. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना FIH अध्यक्ष पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेले आहे ?

उत्तर: व्हीके पांडियन

6. “The Poverty of Political Economics” हे पुस्तक कोणी लिहिले?

उत्तर: मेघनाथ देसाई

7. जागतिक कर्करोग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

उत्तर: 4 फेब्रुवारी

8. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने 20,000 शेतकऱ्यांचा समावेश करताना प्रारंभिक 150 कोटी गुंतवणुकीसह राज्य फ्लोरिकल्चर मिशनला मंजुरी

उत्तर: आसाम

 •  स्थापना 1947
 •  मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा
 •  राज्यपाल : जगदीश मुखी
 •  राजधानी : दिसपूर

9. महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची पुरस्कार रक्कम १० लाख रुपयावरून किती करण्यात आलेली आहे ?

उत्तर: 25 लाख

 •  1997 – पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे – साहित्य
 •  1997 – लता मंगेशकर – कला कला आणि संगीत
 •  2001 – सचिन तेंडूलकर – खेळ
 •  2004 – बाबा आमटे – समाजसेवा
 •  2006 – रतन टाटा – सार्वजनिक प्रशासन
 •  2015 – बाबासाहेब पुरंदरे – साहित्य
 •  2021 – आशा भोसले – कला आणि संगीत

10. कोणत्या देशाने त्याच्या नोटांमधून ब्रिटीश राजेशाही काढून टाकलेली आहे ?

उत्तर: ऑस्ट्रेलिया

11. कोणत्या राज्यात ‘वार्षिक गंगासागर मेळा’ आयोजित केला आहे ?

उत्तर: पश्चिम बंगाल

12. आंतरराष्ट्रीय T20I क्रिकेट’ इतिहासमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे?

उत्तर: युझवेंद्र चहल

13. वाहन उत्पादक ‘टोयोटा मोटर कॉर्पोरेशन’ चे नवीन सीईओ कोण बनले आहेत ?

उत्तर: कोजी सातो

नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment