Maharashtra Bhugol Questions in Marathi 2024

Maharashtra Bhugol Questions in Marathi

भूशास्त्रीयदृष्ट्या महाराष्ट्र हा भारतीय द्वीपकल्पीय पठाराचा आज एक भाग आहे. महाराष्ट्राचा 90% भूभाग हा लाव्हारसापासून तयार झालेल्या बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे. दख्खनच्या पठाराच्या निर्मितीची क्रिया सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरू झाली. त्यानंतर दीर्घकाळ ही क्रिया चालूच राहिली त्यामुळे राज्यात लाव्हारसाचे एकावर एक असे अनेक थर दिसून येतात.

भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर पश्चिम भागात वसलेला महाराष्ट्र हा प्राकृतिक दृष्ट्या बहुतांशी पठारी प्रदेश आहे, राज्यातून कोकण किनारपट्टी समांतर दक्षिणोत्तर गेलेल्या सह्य पर्वतरांगा किंवा पश्चिम घाट रांगांमुळे राज्याचे ‘कोकण’ आणि ‘देश’ किंवा पठार असे दोन स्पष्ट भाग पडलेले आहेत. याहून काटेकोरपणे बोलवायचे तर कोकण, सह्य पर्वतरांगा व पठार असे राज्याचे प्राकृतिक दृष्ट्या तीन भाग सांगता येतील.

  1. कोकण किनारपट्टी
  2. सह्य पर्वतरांगा
  3. पठारी प्रदेश

आजच्या या लेखामध्ये मी महाराष्ट्राच्या भूगोलासंबंधी महत्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे.

Q. खाली दिलेली विधाने सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील मुलांच्या लोकसंख्येशी संबंधित आहेत; वाचून योग्य पर्याय निवडा.

(१) मुलांची लोकसंख्या २००१ मध्ये १४.१ टक्के इतकी होती ती घटून सन २०११ मध्ये ११.९ टक्के इतकी झाली.
(२) ही लोकसंख्या घट ग्रामीण आणि शहरी भागांत दोन्हीकडे झालेली आहे.
(३) शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही घट जास्त झाल्याचे दिसते.

A. केवळ विधान १ व ३ बरोबर आहेत.
B. केवळ विधान २ व १ बरोबर आहेत.
C. केवळ विधान ३ व २ बरोबर आहेत.
D. सर्व विधाने बरोबर आहेत.

Q. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(१) महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रात आहेत.
(२) वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यांच्या एक-तृतीयांशही क्षेत्रात नाहीत.

A. फक्त १
B. फक्त २
C. दोन्ही
D. एकही नाही.

Q. खालील विधाने पहा.
(१) वरोरा तालुक्यातील पिंपळगाव टेकडी येथे लोहखनिज सापडते.
(२) रेडी बंदरातून दगडी कोळसा निर्यात केला जातो.
(३) भारताच्या एकूण मैगनीज साठ्यापैकी ६० टक्के साठा महाराष्ट्रात आहे.

A. फक्त विधान १ बरोबर आहे.
B. फक्त विधान २ बरोबर आहे.
C. विधान १ व २ बरोबर आहेत.
D. विधान २ व ३ बरोबर आहेत.

Q. यादवकालीन शिलालेखात महाराष्ट्रातील …. या विभागाचा उल्लेख ‘सेऊनदेश’ असा केला गेला आहे.

A. कोकण
B. विदर्भ
C. मराठवाडा
D. खानदेश

Q. खालील घाट विचारात घ्या.

(१) आंबा घाट
(२) फोंडा घाट
(३) आंबोली घाट
कोल्हापूर जिल्ह्यातून वरीलपैकी कोणत्या घाटांतून कोकणात उतरता येते ?

A. फक्त १ व ३
B. फक्त ३
C. १, २ व ३
D. कोणत्याही नाही.

Q. खालील विधाने विचारात अचूक पर्याय निवडा. घेऊन दिलेल्या पर्यायांतून

(१) ‘पाली’ आणि ‘महड’ ही महाराष्ट्रातील अष्ट-विनायकांपैकी दोन स्थाने रायगड जिल्ह्यात आहेत.
(२) त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले ‘घारापुरी’ रायगड जिल्ह्यात आहे.

A. फक्त पहिले विधान योग्य आहे.
B. दोन्ही विधाने चूक आहेत.
C. दोन्ही विधाने बरोबर आहेत.
D. फक्त दुसरे विधान बरोबर आहे.

Q. महाराष्ट्रातील एकूण नागरी लोकसंख्येच्या…. इतकी नागरी लोकसंख्या बृहन्मुंबई नागरी संकुलात एकवटली आहे.

A. २४.४ टक्के
B. २७.५ टक्के
C. ३६.२ टक्के
D. ४०.५ टक्के

Q. (१) चंद्रपूर जिल्ह्यातील आसरल्ली व अंकिसा ही ठिकाणे उच्च प्रतीच्या व्हर्जिनिया तंबाखूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
(२) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर ही इमारती लाकडाची देशातील एक महत्त्वाची बाजारपेठ गणली जाते. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/त?

A. फक्त १
B. फक्त २
C. कोणतेही नाही.
D. १ व २ दोन्ही

Q. (१) सातारा जिल्ह्यातून चिपळूणला जाण्यासाठी कुंभार्ली घाट उतरावा लागतो.
(२) साताऱ्याहून रायगडला जाण्यासाठी पारघाट पार करावा लागतो.
(३) साताऱ्याहून कोल्हापूरला जाण्यासाठी अणुस्कुराघाट उतरावा लागतो.
(४) साताऱ्याहून वाईला पसरणी घाटातून जावे लागते. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?

A. फक्त १, २ व ३
B. फक्त १ व २
C. फक्त १ व ३
D. १, २, ३ व ४

Q. मुंबई-नाशिक लोहमार्ग घाटातून गेला आहे.

(१) थळ (कसारा)
(२) तडळी
(३) माळशेज
(४) अणुस्कुरा

A. फक्त १
B. १ व ३
C. १ व ४
D. फक्त ४

Q. तौला, सप्तशृंगी, अंकाई-टंकाई, सुरपालनाथ ही उंच ठिकाणे खालीलपैकी कोणत्या डोंगररांगांमध्ये आहेत?

A. मेळघाट डोंगररांगा
B. सातमाळा डोंगररांगा
C. अजिंठा डोंगररांगा
D. बालाघाट डोंगररांगा

Q. अमरावती जिल्ह्यात स्थित आहे/त…….

A. मेळघाट
B. पयनघाट
C. राजूर घाट
D. अ व ब दोन्ही

Q. लोणार सरोवराचा उल्लेख प्राचीन व मध्ययुगीन साहित्यामध्ये आढळतो. खालीलपैकी कोणत्या ?

(१) स्कंद पुराण
(२) पदम् पुराण
(३) रिहला
(४) आईन-ई-अकबरी
(५) शाकुंतल

A. फक्त ४ व ५
B. फक्त १, २ व ४
C. फक्त १, २ व ५
D. फक्त ३ व ५

Q. ‘शिरसाळा’ व ‘बुलढाणा’ ही ठिकाणे खालीलपैकी कोणत्या डोंगररांगांत आहेत?

A. अजिंठ्याच्या डोंगररांगा
B. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा
C. सातमाळा डोंगररांगा
D. महादेवाचे डोंगर

Q. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मुख्य ठिकाण असलेले ‘अकोला’ शहर कोणत्या नदीच्या दोन्ही तीरांवर वसले आहे?

A. काटेपूर्णा
B. मोर्णा
C. शहाणूर
D. अरुणावती

Q. बुलढाणा जिल्ह्याच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा.

(१) बुलढाणा जिल्हा पूर्णा व पैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यात वसला आहे.
(२) पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगर- रांगांमध्ये देऊळघाट येथे उगम पावते.
(३) ‘लोणार’ हे खाऱ्या पाण्याचे सुप्रसिद्ध सरोवर बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात आहे.
(४) प्राचीन काळी लोणार सरोवर लवणतीर्थ या नावाने ओळखले जात होते, असा उल्लेख पुराणात सापडतो.

उपरोक्त विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

A. फक्त १, २ व ३
B. फक्त २ व ३
C. फक्त २ व ४
D. फक्त १ व ३

Q. १,४२४ मीटर उंचीवरील …. हे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर होय.

A. भीमाशंकर
B. हरिश्चंद्रगड
C. नागफणी
D. जीवनधाम

Q. बोरघाट आणि वरंधाघाट उतरून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून कोकणात उतरता येते?

A. सातारा
B. अहमदनगर
C. पुणे
D. कोल्हापूर

Q. खालीलपैकी…… प्रकारचा प्राचीन खडक कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज व राधानगरी परिसरात आढळतो.

A. कडाप्पा
B. ग्रॅनाइट
C. ग्रॅबो
D. पट्टीताश्म

Q. सिंदफणा नदीच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

(१) सिंदफणा ही गोदावरीची महत्त्वाची उपनदी आहे.
(२) तिचा उगम बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यात होतो.
(३) ती परभणी जिल्ह्याच्या सीमेवर मंजरथ येथे गोदावरीस मिळते.
(४) माजलगाव येथे तिच्यावर काँक्रीट धरण बांधण्यात आले आहे.

A. १
B. ४
C. ३
D. २

Maharashtra Geography Questions and Answers in Marathi

Maharashtra Geography in Marathi
Maharashtra Geography in Marathi

Q. इ. स. १७६३ मध्ये थोरले माधवराव पेशवे आणि हैदराबादचा निजाम यांच्यामधील इतिहासप्रसिद्ध लढाई जेथे घडून आली ते ‘राक्षसभुवन’ हे ठिकाण बीड जिल्ह्यातील…… तालुक्यात आहे.

A. माजलगाव
B. बीड
C. पाटोदा
D. गेवराई

Q. खालीलपैकी तीन घराण्यांनी लातूर व परिसरात आपली सत्ता प्रस्थापित केल्याचे इतिहास सांगतो. चौथे विसंगत घराणे कोणते?

A. चालुक्य
B. गुप्त
C. सातवाहन
D. राष्ट्रकूट

Q. पुणे जिल्ह्यात मोडणारे गड खालीलपैकी कोणते?
A. तोरणा व राजगड
B. लोहगड व विसापूर
C. पुरंदर व विचित्रगड
D. अ, ब व क तिन्हीही 

Q. भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेला ‘विल्सन बंधारा’ किंवा ‘भंडारदरा धरण’…. या दोन टेकड्यां- दरम्यान पसरलेले आहे.

A. कळसूबाई व बालेश्वर
B. बालेश्वर व गायखुरी
C. महादेवाचे डोंगर व कळसूबाई
D. सातमाळा व अजिंठा

Q. चालुक्यकाळी बीड शहराचे नाव … होते, असे म्हटले जाते.

A. अंबानगर
B. चंपावतीनगर
C. भीर
D. प्रतिष्ठान

Q. लातूर जिल्ह्यात …. येथे दुधापासून भुकटी तयार करण्याचा कारखाना आहे.

A. निलंगा
B. उदगीर
C. सास्तूर
D. औसा

Q. खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनविण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे?

A. लातूर
B. भंडारा
C. परभणी
D. बीड

Q. लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पूर्वी अंबरपूर किंवा आम्रपूर नावाने प्रसिद्ध होता. हा किल्ला बांधण्याचे श्रेय …. यास दिले जाते.

A. दुसरा सोमेश्वर
B. सहावा विक्रमादित्य
C. मलिक अंबर
(ङ) निजाम-उल्-मुल्क

Q. टॉलेमीने केलेला ‘हेप्टानेशिया’ हा उल्लेख…. या शहराचा असावा, असे मानले जाते.

A. पुणे
B. मुंबई
C. कोल्हापूर
D. वसई

Q. पैठण हे शहर प्राचीन काळी …. या नावांनी ओळखले जात असल्याचे प्राचीन साहित्यावरून दिसून येते.

(१) प्रतिष्ठान
(२) पोतली
(३) पट्टण
(४) पोथणपूर
(५) पइठ्ठाण
दिलेल्या संकेताक्षरांच्या साहाय्याने आपले उत्तर शोधा.

A. फक्त १ व ३
B. फक्त २, ३ व ४
C. १ ते ५ सर्व
D. फक्त १, ३ व ५

Q. ‘कुंथलगिरी’ हे दिगंबरपंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. बीड
B. लातूर
C. उस्मानाबाद
D. हिंगोली

Q. समर्थ रामदासांचे निवासस्थान व समर्थांनी स्थापन केलेले श्रीराम मंदिर यांमुळे प्रसिद्धी पावलेले सातारा जिल्ह्यातील ‘चाफळ’ हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसले आहे?

A. कृष्णा
B. नीरा
C. मांड
D. कोयना

Q. वेरूळ येथील कैलासलेणे खोदविण्याचे श्रेय कृष्ण प्रथम या …. घराण्यातील राजास द्यावे लागते.

A. चालुक्य
B. पल्लव
C. सातवाहन
D. राष्ट्रकूट

Q. खाली काही किल्ले व ते ज्या जिल्ह्यात आहेत, ते जिल्हे यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

A. तोरणा (प्रचंडगड): भोर (पुणे)
B. प्रतापगड: जावळी (सातारा)
C. देवगिरी: दौलताबाद (औरंगाबाद)
D. रांगणा: गगनबावडा (कोल्हापूर)

Q. चांगदेव मंदिरामुळे प्रसिद्धीस आलेले गोदावरी काठचे ……..हे क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आहे.

A. राहुरी
B. नेवासा
C. पुणतांबे
D. घारगाव

Q. प्रतापगडाशी संबंधित खालील विधानांवर विचार करा व त्यांपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत, ते सांगा.

(१) हा गड उरमोडी नदीच्या खोऱ्यात वसला आहे.
(२) हा एक मजबूत डोंगरी किल्ला आहे.
(३) सध्या हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असून पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे.

A. फक्त १ व ३
B. फक्त २ व ३
C. ना १, ना २, ना ३
D. १, २ व ३ तिन्ही

Maharashtra Bhugol Questions in Marathi

Q. समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कोठे आहे?

A. जांब
B. सज्जनगड
C. चाफळ
D. केंजळगड

Q. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

(१) वर्धा जिल्ह्यातील पुलगाव हे शहर कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे.
(२) भारत सरकारच्या दारूगोळ्याच्या कोठारामुळे प्रसिद्धीस आलेले पुलगाव हे शहर वर्धा नदीकाठी बसले आहे.
(३) गरमसूर हे वर्धा जिल्ह्यातील सर्वांत उंच शिखर होय.

A. १, २ व ३ तिन्ही
B. फक्त २ व ३
C. फक्त १ व २
D. फक्त ३

Q. गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले तानसा नदीकाठचे ‘वज्रेश्वरी’ हे स्थळ ……..जिल्ह्यात वसले आहे.

A. रायगड
B. ठाणे
C. रत्नागिरी
D. मुंबई उपनगर

Q. पुणे जिल्ह्यातील …. हा किल्ला बोरघाटाच्या मुखाशी वसला आहे.

A. वज्रगड
B. लोहगड
C. प्रचंडगड
D. राजमाचीगड

Q. खालील विधानांवर विचार करा.

(१) शिवकालीन ‘रांगणा’ हा इतिहासप्रसिद्ध किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात वसला आहे.
(२) ‘आंबोली’ हे सहा पर्वतराजीतील थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात वसले आहे.
(३) औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील लेण्या सह्य पर्वताच्या सातमाळा रांगेतील इंध्याद्री शाखेत वसल्या आहेत.
उपरोक्त विधानांपैकी कोणते / ती विधान/ने योग्य आहे/ त?

A. वरील सर्व
B. फक्त २ व ३
C. फक्त १ व २
D. फक्त ३

Q. हातमाग-यंत्रमाग व्यवसायामुळे प्रसिद्धीस आलेले इचलकरंजी हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील …. तालुक्यात वसले आहे.

A. करवीर
B. हातकणंगले
C. कागल
D. शिरोळ

Q. खाली डोंगरी किल्ले व ते ज्या जिल्ह्यात वसले आहेत त्यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यांपैकी अचूक जोड्या ओळखा.

(१) मनोहरगड : रत्नागिरी
(२) रतनगड : अहमदनगर
(३) अर्नाळा : ठाणे
(४) नर्नाळा : अकोला
A. फक्त १ व ३
B. फक्त २ व ४
C. फक्त २, ३ व ४
D. फक्त १, २ व ४

Q. श्रीक्षेत्र भीमाशंकरशी संबंधित खालीलपैकी कोणते/ती विधाने सत्य नाही/त?

(१) बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे भीमाशंकर हे क्षेत्र पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात सह्य पर्वतराजीत वसले आहे.
(२) भीमाशंकर येथील मंदिराच्या बांधकामाचे श्रेय नाना फडणवीस यांना दिले जाते.

A. फक्त २
B. ना १ ना २
C. फक्त १
D. १ व २ दोन्ही

Q. (१) भंडारदरा धरणाच्या (विल्सन बंधारा) जलाशयास ऑर्थर सरोवर या नावाने ओळखले जाते.

(२) राज्यात अहमदनगर जिल्ह्यातील जोर्वे, नेवासा व खामगाव येथे ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.
(३) महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना इ. स. १९१९ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात हरेगाव येथे (खाजगी क्षेत्रात) उभा राहिला.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

A. १, २ व ३.
B. फक्त २ आणि ३
C. फक्त १ आणि २.
D. फक्त ३

Q. ‘बल्लारशा पेपर अँड स्ट्रॉ बोर्ड मिल’ या नावाने प्रसिद्ध असलेली कागद गिरणी खालीलपैकी कोठे आहे?

A. चंद्रपूर
B. भिगवण (पुणे)
C. बल्लारपूर (चंद्रपूर) 
D. खोपोली (रायगड)

Q. भारतीय स्वातंत्र्यचळवळीशी व ताराबाई मोडक यांनी स्थापन केलेल्या ग्राम बालशिक्षण संस्थेशी निगडित असलेले पालघर जिल्ह्यातील स्थळ ….

A. डहाणू
B. बोर्डी 
C. तलासरी
D. कोसबाड

Q. माथेरान हे सह्य पर्वतावरील थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणत्या तालुक्यात?

A. खालापूर
B. पोलादपूर
C. महाड
D. कर्जत

Q. देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक गणले जाणारे रेणुका देवीचे माहूर हे क्षेत्र नांदेड जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणत्या तालुक्यात?

A. माहूर
B. कंधार
C. हदगाव
D. मुखेड

Q. खालील विधानांचा विचार करा.

(१) सातारा जिल्ह्यातील माहुली येथे येरळा व कृष्णा या दोन नद्यांचा संगम झाला आहे.
(२) तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र सध्याच्या ठाणे जिल्ह्यात स्थित आहे.
(३) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात येते.
अचूक विधान/ने ओळखा.

A. फक्त ३
B. फक्त २
C. फक्त १
D. १, २ व ३

Q. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

(१) पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात वेळवंडी या नीरच्या उपनदीवर भाटघर येथे १९२८ मध्ये धरण बांधण्यात आले आहे.
(२) या धरणास तत्कालीन मुंबई इलाख्याचा गव्हर्नर लॉईड यांचे नाव देण्यात आले होते.

A. पहिले विधान बरोबर आहे.
B. दोन्ही विधाने चुकीची आहेत.
C. दोन्ही विधाने बरोबर आहेत.
D. फक्त दुसरे विधान बरोबर आहे.

Q. खाली राज्यातील काही धरणे व धरणांच्या जलाशयांना देण्यात आलेली नावे यांच्या जोड्या दिल्या आहेत; यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

A. भाटघर : येसाजी कंक जलाशय
B. पानशेत : तानाजीसागर जलाशय
C. वरसगाव : वीर बाजी पासलकर जलाशय
D. खडकवासला : शिवाजीसागर जलाशय

Q. (१) कोयना प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात हेळवाकजवळ धरण बांधण्यात आले आहे.
(२) या धरणाच्या जलाशयास ‘शिवाजीसागर’ हे नाव देण्यात आले आहे.
(३) गोदावरी नदीवर उभारण्यात आलेला जायकवाडी प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वांत मोठा प्रकल्प गणला जातो.
(४) या प्रकल्पांतर्गत पैठण येथे बांधण्यात आलेल्या जलाशयास ‘नाथसागर’ नावाने ओळखले जाते. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

A. वरील सर्व
B. फक्त २ आणि ३
C. फक्त २ आणि ४
D. फक्त १ आणि ३

Q. मांजरा नदीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

(१) ही गोदावरीची उपनदी आहे.
(२) ही नदी बीड जिल्ह्यात बालाघाट डोंगररांगांमध्ये उगम पावते.
(३) ही महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या तीन राज्यांतून वाहते.
कोणती विधान/ने अचूक आहेत.

A. फक्त ३
B. फक्त १ व २
C. फक्त १
D. फक्त २

Q. (१) भीमा ही राज्यातील एक महत्त्वाची नदी असून ती राज्यातील पुणे, अहमदनगर, सोलापूर या तीन जिल्ह्यांतून वाहते.
(२) भीमा प्रकल्पांतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यात उजनी येथे धरण बांधण्यात आले आहे.
(३) महाराष्ट्रातून वाहत जाणारी भीमा राज्याबाहेर कर्नाटक व आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर कृष्णेस जाऊन मिळते.
(४) इंद्रायणी, मुळा, मुठा, येरळा व सीना या भीमा नदीच्या उपनद्या आहेत.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?
A. १, २, ३ व ४
B. फक्त २, ३ व ४
C. फक्त २ व ४
D. फक्त १, २ व ३

तर मित्रांनो मला अशा Maharashtra Bhugol Questions in Marathi या लेखात दिलेल्या प्रश्नांमधून तुम्हाला महाराष्ट्राचे भूगोल समजायला मदत झाली असेल. तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट मध्ये नक्की नोंद करा.

हे देखील वाचा

पोलीस भरती जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर

Leave a Comment