धीरूभाई अंबानी यांच्या बदल मराठी माहिती । Dhirubhai Ambani Biography in marathi
Dhirubhai Ambani Biography in Marathi: धीरजलाल हिराचंद अंबानी (धीरूभाई अंबानी) हे एक प्रसिद्ध भारतीय उद्योगपती होते ज्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीची स्थापना केली. धीरूभाईंची गोष्ट एका छोट्या व्यापारी पासून ते व्यावसायिक icon बनण्यापर्यंत आहे. अनेकजण अंबानींच्या अभूतपूर्व विकासाचे श्रेय सत्ताधारी राजकारण्यांना देतात. त्यांचं शिक्षण फक्त हायस्कूल पर्यंत झाले होते पण त्यांच्या दृढ निश्चयाद्वारे त्यांनी स्वतःचे व्यापारीक आणि औद्योगिक साम्राज्याची स्थापना केली होती. फक्त तीन दशकांमध्ये त्यांनी आपल्या छोट्याशा व्यवसायाला एका मोठ्या औद्योगिक कंपनीच्या स्वरूपात घडवले.
- जन्म: 28 डिसेंबर 1932, चोरवड, जुनागड इस्टेट, ब्रिटिश इंडिया
- मृत्यू: 6 जुलै 2002
- काम/व्यवसाय: उद्योगपती, रिलायंस इंडस्ट्रीचे संस्थापक.
त्यांनी फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा रिलायन्स एक मोठी कंपनी म्हणून अस्तित्वात आली. त्यांची अफाट जोखीम घेण्याची क्षमता आणि अचूक वृत्तीने त्यांना फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान दिले. आपल्या आर्थिक कौशल्यांनी धीरूभाई अंबानी यांनी वात्सव मध्ये एक शेअर बाजार बनवले. वर्ष २०२२ च्या एका डेटा मध्ये रिलायन्स कंपनी टॉप ‘१०० फॉर्च्यून’ या कंपन्यांमधून एक होती. धीरूभाई यांनी रिलायन्सचे 1977 मध्ये सार्वजनिक क्षेत्रात समावेश केले आणि 2007 मध्ये त्यांची दोन्ही मुले अनिल आणि मुकेश यांची संयुक्त संपत्ती जवळपास 100 million डॉलर होती. या अफाट संपत्तीने अंबानी परिवाराला संपूर्ण विश्वामध्ये श्रीमंत परिवार बनवले.
आरंभिक जीवन । Information about Dhirubhai Ambani in Marathi
धीरजलाल हिरालाल अंबानी अथवा धीरूभाई अंबानी यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 ला गुजरातच्या जुनागड जिल्ह्यामध्ये चोरवाड गावाच्या एका सामान्य मोध बनिया परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हिराचंद गोर्धनभाई अंबानी आणि आईचे नाव जमनाबेन होते. त्यांचे वडील शिक्षक होते. आपल्या आई वडिलांच्या पाच मुलांमधून धीरूभाई हे तिसरे होते. त्यांचे दुसरे भाऊ बहीण होते रमणिकलाल, नटवर लाल, त्रिलोचना आणि जसुमती. आर्थिक टंचाईमुळे त्यांना हायस्कूल मध्येच शिक्षण सोडावे लागले. असं सांगितले जाते की परिवाराची आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी गिरनार जवळ भजी पाव चे दुकान टाकले जे फक्त इथे येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून होते.
करियर
1948 मध्ये सोळा वर्षांचे असताना ते आपले मोठे भाऊ रमनिकलाल यांच्या मदतीने यमन च्या एडेन शहरात पोहोचले. तेथे त्यांनी ‘ए. बेस्सी आणि कंपनी’ सोबत तीनशे रुपये प्रतिमहाच्या वेतनावर काम केले. जवळपास दोन वर्षांनंतर ‘ए. बेस्सी आणि कंपनी’ जेव्हा ‘शेल’ नामक कंपनीच्या उत्पादनांचे वितरक बनले तेव्हा धीरूभाईंना एडन बंदरावर कंपनीच्या फिलिंग स्टेशनच्या व्यवस्थापकाची नोकरी मिळाली.
रिलायन्स कमर्शियल कोऑपरेशनची स्थापना
1950 च्या दशकात धीरूभाई अंबानी यमन मधून भारतात परतले आणि आपले चुलत भाऊ चंपकलाल दमानी (ज्यांच्या सोबत ते यमन मध्ये राहत होते) त्यांच्यासोबत मिळून पॉलीस्टर धागे आणि मसाल्यांचे आयात निर्यातीचा व्यापार सुरू केला. रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन ची सुरुवात मस्जिद बंदर च्या नरसिमा स्ट्रीट वर एका छोट्याशा कार्यालया पासून झाली. यादरम्यान अंबानी आणि त्यांचा परिवार मुंबईच्या भुलेश्वर स्थित ‘जय हिंद इस्टेट’ मध्ये एका छोट्या आपारमेंट मध्ये राहत होता.
वर्ष 1965 मध्ये धीरूभाई अंबानी आणि चंपकलाल दमानी यांची व्यावसायिक भागीदारी समाप्त झाली. दोघांचे स्वभाव आणि व्यापार करण्याची पद्धत वेगळी होती त्यामुळे ते भागीदारी जास्त वेळ टिकवू शकले नाही. दमाणी हे सावध व्यावसायिक होते, तर धीरूभाई हे जोखीम घेणारे व्यावसायिक मानले जात होते.
रिलायन्स टेक्स्टाईल्स
आत्तापर्यंत धीरूभाई अंबानीला वस्त्र व्यवसायाची चांगली समज आली होती. या व्यवसायामध्ये चांगली समज असल्यामुळे त्यांनी वर्ष 1966 मध्ये अहमदाबादच्या नरोडा मध्ये एका कपडा मिलची स्थापना केली. तेथे वस्त्र निर्माण मध्ये पॉलिस्टरच्या धाग्यांचा वापर झाला आणि धीरूभाईंनी ‘विमल’ ब्रँड ची सुरुवात केली जे की त्यांचे मोठे भाऊ रमणीकलाल अंबानी यांचे सुपुत्र विमल अंबानी यांच्या नावावर ठेवले गेले होते. त्यांनी ‘विमल’ ब्रँडची एवढ्या मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली की, भारताच्या अंतर्गत भागातही हा ब्रँड घरोघरी प्रसिद्ध झाला.1975 मध्ये, जागतिक बँकेच्या तांत्रिक पथकाने रिलायन्स टेक्सटाइल्सच्या उत्पादन युनिटला भेट दिली आणि ते “विकसित देशांच्या मानकांनुसार देखील उत्कृष्ट” असल्याचे आढळले.
रिलायन्स आणि स्टॉक मार्केट
धीरूभाई यांना इक्विटी कल्ट ला भारतात सुरू करण्याचा श्रेय पण जाते. जेव्हा 1977 मध्ये रिलायन्स ने आयपीओ (IPO)चालू केले तेव्हा 58,000 पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. धीरूभाई गुजरात आणि इतर राज्यांतील ग्रामीण जनतेला आश्वासन देण्यात यशस्वी झाले की ज्यांनी त्यांच्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर फक्त लाभच मिळेल.
व्यावसायिक विस्तार
आपल्या जीवन काळामध्ये धीरूभाई यांनी रीलाईन्सच्या व्यवसायाचे वित्सार विविध क्षेत्रांमध्ये केले होते. यामध्ये प्रामुख्याने पेट्रोकेमिकल्स, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, वीज, किरकोळ(retail), कपडे/वस्त्र, पायाभूत सेवा, भांडवली बाजार(capital market)आणि लॉजिस्टिक यांचा समावेश होता.
टीका
व्यवसायामध्ये तर धीरूभाई अंबानी यांनी आकाशाच्या उंचीला स्पर्श केले होते परंतु त्यांच्यावर लवचिक मूल्ये आणि अनैतिक प्रवृत्ती अंगीकारल्याचा आरोपही करण्यात आला. त्यांच्यावर असे आरोप करण्यात आले की त्यांनी सरकारी धोरणे आपल्या आवश्यकतेनुसार चतुराईने गरजेनुसार त्यात बदल केले आणि सरकारी धोरणांच्या मदतीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांचाही पराभव केला.
बॉम्बे डाईंगच्या नुस्ली वाडियाशी टक्कर
धीरूभाई आणि बॉम्बे डाईंगच्या नुस्ली वाडिया मध्ये झालेला संघर्ष जग जाहीर आहे. पॉलिस्टर कपड्यांच्या बाजारावर विजय प्राप्त करण्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये संघर्ष चालू होता. हा परवाना राजाचा काळ होता आणि सर्व काही सरकारच्या धोरणांवर अवलंबून होते. धीरूभाईंना त्यांच्या राजकीय पोहोचसाठी ओळखले जात होते. त्यांच्याकडे ती योग्यता होती की अवघड परवाने पण त्यांच्याकडे असायचे. या प्रकरणात, त्यांच्या प्रतिस्पर्ध्यासाठी अडथळे निर्माण करण्यासाठी सरकारशी संगनमत केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
सन्मान
- एशियन बिझनेस लीडरशिप फोरम अवॉर्ड्स 2011 मध्ये मरणोत्तर ‘ए बी एल एफ ग्लोबल एशियन अवॉर्ड’ ने सन्मानित केले गेले.
- भारतामध्ये केमिकल उद्योगाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे ‘केमटेक फाउंडेशन अँड केमिकल इंजीनियरिंग वर्ल्ड’ द्वारे ‘मॅन ऑफ द सेंचुरी’ सन्मान मिळाला.
- एशियावीक पत्रिकेद्वारे वर्ष 1996, 1998 आणि 2000 मध्ये ‘पावर 50 -मोस्ट पावरफुल इन एशिया’ च्या यादीत समाविष्ट झाले.
- वर्ष 1998 मध्ये पेनसिल्वेनिया विद्यापीठाच्याद्वारे तीक्ष्णतेमुळे ‘डीन मेडल’ दिले गेले.
- वर्ष 2001 मध्ये ‘इकॉनोमिक टाइम्स अवॉर्ड फोर कॉर्पोरेट एक्सीलन्स’ च्या अंतर्गत ‘लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड’ मिळाला.
- फेडरेशन ऑफ इंडियन चैम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) द्वारा ‘मैन ऑफ 20th सेंचुरी’ घोषित.
मृत्यू
हृदयविकाराचा झटका आल्याने धीरूभाई अंबानी यांना मुंबईच्या ब्रिज कँडी दवाखान्यात 24 जून 2002 ला भरती केले गेले. या पहिले त्यांना हृदयविकाराचा झटका 1986 मध्ये आला होता, ज्याने त्यांचा डावा हात अर्धांगवायू झाला होता. 6 जुलै 2002 ला धीरूभाई अंबानी यांचे निधन झाले. त्यांच्यामागे त्यांची पत्नी कोकीलाबेन आणि दोन मुले मुकेश आणि अनिल आणि दोन मुली नीना कोठारी आणि दीप्ती साळगावकर होते.
धीरूभाई अंबानिंचे विचार
“माझ्या यशस्वी होण्याचे गुपित माझी महत्वकांक्षा आणि अन्य लोकांचे मन ओळखणे आहे.”
“खरी उद्योजकता जोखीम पत्करण्यातून येते.”
“कठीण काळाचे संधी मध्ये रूपांतर करा.”
“अयशस्वी झाला तरी आपलं मनोबल उंच ठेवा.” शेवटी तुम्हाला यश अवश्य मिळणार.
“आपण आपले राज्यकर्ते बदलू शकत नाही, परंतु ज्या प्रकारे ते आपल्यावर राज्य करतात त्याचा मार्ग आपण बदलू शकतो.”
“नफा मिळविण्यासाठी कोणत्याही आमंत्रणाची गरज नसते.”
“तरुणांना एक चांगले वातावरण द्या. त्यांना चांगली प्रेरणा द्या. त्यांना जे पाहिजे ते सहयोग प्रदान करा. त्यातील प्रत्येकात अफाट उर्जेचा स्त्रोत आहे. ते नक्कीच ध्येय गाठतील.”
“काम वेळेवर संपवणे पुरेसे नाही, मी वेळ घेतलेले काम वेळेच्या आधी संपवण्याची आशा करतो.”
“जे स्वप्न बघायची हिंमत ठेवतात, ते पूर्ण जगावरती विजय प्राप्त करतात.”
“भारतीयांना स्पर्धे पासून भीती वाटत नाही.”
“भारत हा उपलब्धी प्राप्त करणारा राष्ट्र आहे.”
Final Words
तर अशा या प्रसिद्ध भारतीय उद्योगपती बद्दल जेवढे बोलू तेवढे कमी आहे. मी अशा करतो तुम्हाला या लेखातून धीरूभाई अंबानी आणि reliance industries बद्दल जाणून घ्यायला मदत झाली असेल. तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट मध्ये नक्की विचारा.
हे देखील वाचा