भारतीय अर्थव्यवस्था प्रश्न | Bhartiya Arthvyavastha Questions in Marathi 2025
विद्यार्थी मित्रांनो भारत ही जगातील चौथी पा ओके हो ठीक आहे चालेल सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे जगातील सर्वात जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था. जर तुम्ही स्पर्धा परीक्षा जसे की MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती यांसारख्या परीक्षेची तयारी करत असाल तर अर्थशास्त्र हा विषय खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण अर्थशास्त्र संबंधित भरपूर प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमी विचारले जात असतात. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे Bhartiya Arthvyavastha Questions in Marathi.
Indian economy questions in Marathi
Q. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे ……………….
A. लोकशाही परंतु साम्राज्यवादी अर्थव्यवस्था
B. शेती व उद्योग दोहोंना समान न्याय
C. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव.
D. संपत्तीतील असमान वाटप
उत्तर: C. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव
स्पष्टीकरण:
- साम्राज्यावादी/भांडवलशाही अर्थव्यवस्था – यात भांडवलदारांना वस्तू व सेवा बनवण्यासाठी मोकळीक दिली जाते. सरकार स्वतः हस्तक्षेप करत नाही. उदा. अमेरिका, जपान, जर्मनी.
- समाजवादी अर्थव्यवस्था – यात सरकार स्वतः वस्तू व सेवा बनवते, तसेच खासगी उद्योगांवर नियंत्रण ठेवते. उदा. रशिया
- मिश्र अर्थव्यवस्था – यात सरकार स्वतः वस्तू बनवते तसेच खासगी उद्योगांवर बंधन आणत नाही. उदा. भारत, चीन, पाकिस्तान.
Q. वित्तीय धोरण कोण तयार करते?
A. वित्तीय आयोग
B. वित्तीय मंत्रालय
C. नीती आयोग
D. आरबीआय (RBI)
उत्तर: B. वित्तीय मंत्रालय
स्पष्टीकरण:
- कर ठरवणे, सबसिडी, खर्च, उत्पन्न हे वित्त मंत्रालय ठरवते. त्यालाच ‘वित्तीय धोरण’ म्हणतात.
- वित्तीय धोरण हे अर्थसंकल्पाच्या स्वरूपात मांडले जाते.
- वित्त आयोग केंद्रीय करातील केंद्र व राज्य यांचा वाटा ठरवतो.
- निति आयोग सरकाराला धोरण ठरवण्याबाबत मार्गदर्शन करतो.
- RBI देशांचे मौद्रिक धोरण ठरवते, म्हणजे रेपो रेट, बँक रेट, रिव्हर्स रेपो रेट इ.
Q. …………… यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते.
A. अॅडम स्मिथ
B. आल्फ्रेड मार्शल
C. रॉबिन्स
D. यापैकी एकही नाही.
उत्तर: A. अॅडम स्मिथ
स्पष्टीकरण:
- या ग्रंथामुळे अर्थशास्त्राला राज्यशास्त्रापासून वेगळे केले गेले, म्हणून त्यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते.
- त्यांनी आपल्या ‘Wealth of Nation’ या ग्रंथात कल्याणकारी अर्थशास्त्राची तत्त्वे सांगितली.
Q. दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सिमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजे?
A. NNP (NET NATIONAL PRODUCT)
B. NDP (NET DOMESTIC PRODUCT)
C. GDP (GROSS DOMESTIC PRODUCT)
D. GNP (GROSS NATIONAL PRODUCT)
उत्तर: C. GDP (GROSS DOMESTIC PRODUCT
स्पष्टीकरण:
- GDP आर्थिक वर्षात भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य
- GNP – यामध्ये एका आर्थिक वर्षात भौगोलिक सिमेच्याऐवजी भारतीय व्यक्तीने कमवलेले उत्पन्न ग्राह्य धरले जाते.
- NDP – GDP मधून घसारा वजा केल्यानंतर मिळालेल्या उत्पन्नाला Net Domestic Product म्हणतात.
- NNP – GNP मधून घसारा वजा केल्यानंतर मिळालेल्या उत्पन्नाला Net National Product म्हणतात.
Q. देशातील लोकांचे राहणीमान ……………………. वरून ठरते.
A. दरडोई उत्पन्न
B. राष्ट्रीय उत्पन्न
C. गरिबांचे प्रमाण
D. बेकारीचे प्रमाण
उत्तर: : (A. दरडोई उत्पन्न
स्पष्टीकरण:
- दरडोई उत्पन्नावरून लोकांचे राहणीमान कसे असेल याचा अंदाज लावता येतो.
- राष्ट्रीय उत्पन्नावरून देशाची अर्थव्यवस्था किती मोठी आहे याचा अंदाज येतो. ते GDP वरून मोजतात.
- गरिबांचे प्रमाण मोजण्यासाठी दारिद्ररेषेची संकल्पना आहे.
- जे लोक ठरवलेल्या पातळीपेक्षा कमी कमावतात त्यांना दारिद्र्य रेषेखालचे (BPL) म्हटले जाते.
- रोजगाराच्या शोधात असलेले परंतु रोजगार न मिळणारे म्हणजे बेरोजगार होय व सध्या बेरोजगारीचे प्रमाण ४ टक्क्यांच्या आसपास आहे.
Q. अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
A. अर्थशास्त्र
B. वैद्यकीय शास्र
C. क्रीडा
D. राजकारण
उत्तर: A. अर्थशास्त्र
स्पष्टीकरण:
- अमर्त्य सेन यांनी कल्याणकारी अर्थशास्त्रात मोलाचे योगदान दिले आहे.
- त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. (1998)
- 1999 साली भारतरत्न पुरस्कार मिळाला.
- मानवी विकास निर्देशांक (HDI) मोजण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती.
- अर्थशास्त्राशी संबंधित व्यक्ती – अमर्त्य सेन, रघुराम राजन, शक्तीकांत दास, अरविंद सुब्रमण्यम, विवेक देवरॉय, जगदीश भगवती, सी. रंगराजन
MPSC Economics questions in Marathi
Q. स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन …….. असे केले जाते.
A. उदार अर्थव्यवस्था
B. समाजवादी अर्थव्यवस्था
C. मिश्र अर्थव्यवस्था
D. नियंत्रित अर्थव्यवस्था
उत्तर: B. समाजवादी अर्थव्यवस्था
स्पष्टीकरण:
- ब्रिटिश काळात भारताची अर्थव्यवस्था मुक्त (बाजार) अर्थव्यवस्था होती.
- स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत असल्यामुळे काँग्रेसच्या विचारधारांचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर पडत असे.
- 1955 च्या आवडी अधिवेशनात ‘समाजवादी समाजरचनेचे’ तत्त्व स्वीकारले गेले, त्याच्या प्रभावाने समाजवादी अर्थव्यवस्था लागू झाली.
- 1991 या वर्षीपासून भारताची अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्थेकडे झुकली आहे
Q. मानवी विकास निर्देशांक ठरविताना प्रामुख्याने कुठले निकष विचारात घेतले जातात.
1. आर्थिक निकष (सरासरी राहणीमान)
2. आरोग्य (अपेक्षित आर्युमान)
3. शिक्षण (शैक्षणिक कालावधी)
4. आनंदाचे प्रमाण
5. अन्न उपलब्धता
A. 2,3 फक्त
B. 2,3 आणि 5
C. 1,2 आणि 3
D. यापैकी नाही
उत्तर: C. 1, 2 आणि 3
स्पष्टीकरण:
- मानवी विकास निर्देशांक (HDI) चे जनक मेहबूब उल हक है आहेत.
- सुरुवात – 1990
- जाहीर – UNDP मार्फत
- मूल्य- 0 ते 1 दरम्यान असते
- 2023 च्या HDI नुसार भारताचे HDI मूल्य 0.633 (132 वा क्रमांक)
- HDI वरुन मानवी विकासाचा दर्जा समजतो.
- HDI मध्ये आरोग्य, शिक्षण व राहणीमान हे घटक सामाविष्ट आहेत.
Q. व्ही. कुरीयन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
A. आर्थिक धोरण
B. हरित क्रांती
C. शैक्षणिक धोरण
D. धवल क्रांती
उत्तर: (D. धवल कांती
स्पष्टीकरण:
- वर्गिस कुरीयन यांना धवल (दुग्ध क्रांती) क्रांतीचे जनक म्हणतात.
- ‘अमूल’ या देशातील मोठ्या दुग्ध उद्योगाच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा आहे.
- त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे तिन्ही पद्म पुरस्कार मिळाले आहेत.
- त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देखील मिळाला.
- एम. एस. स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात.
- स्वामीनाथन यांनी गहू, तांदूळ, पिकात आमूलाग्र बदल घडवून आणला व उत्पादन वाढविले
Q. ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम कशा संबंधी आहे?
A. पूरनियंत्रण
B. पूरव्यवस्थापन
B. वाढीव दुध उत्पादन व संकलन
D. वाढीव अन्न उत्पादन
उत्तर: C. वाढीव दूध उत्पादन व संकलन
स्पष्टीकरण:
- 1970 साली दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी operation flood programme योजना सुरू केली.
- या अभियानामुळे भारत आज दूध उत्पादनात क्रमांक एकचा देश बनला आहे.
- ‘अमूल’ या दूध कंपनीमुळे अभियान यशस्वी झाले.
- अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘हरित क्रांती’ अभियान राबवण्यात आले.
- अन्नधान्य, तेलबिया यांचे उत्पादन वाढवण्यासाठी इंद्रधनुष्य अभियान राबवण्यात येत आहे.
Indian Economy MCQ in Marathi
Q. रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
A. जीवशास्त्र
B. भौतिकशास्त्र
C. रसायनशास्त्र
D. अर्थशास्त्र
उत्तर: D. अर्थशास्त्र
स्पष्टीकरण:
- रघुराम राजन यांनी भूषवलेली पदे
- IMF चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ
- RBI चे 23 वे गव्हर्नर
- त्यांनी लिहिलेले पुस्तक – द थर्ड पिलर.
Q. भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरुप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक ठरेल?
A. विकसित
B. विकसनशील
C. अविकसित
D. गरीब
उत्तर: B. विकसनशील
स्पष्टीकरण:
- जगातील सर्वच देशांचा तुलनात्मक अभ्यास करुन अर्थव्यवस्थेचे प्रकार केले आहेत.
- विकसित – इंग्लंड, अमेरिका, जपान, जर्मनी.
- विकसनशील – देश भारत, पाकिस्तान.
- अविकसित देश – अफिणिस्तान, नेपाळ, भूटान
- विकसनशील म्हणजे विकासाच्या मार्गावर असलेले देश.
- भारत विकसनशील देश आहे.
Q. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही?
A. उत्पादन पध्दती
B. आयात निर्यात पध्दती
C. उत्पन्न पध्दती
D. खर्च पध्दती
उत्तर: B. आयात निर्यात पद्धत
स्पष्टीकरण:
- उत्पादन पद्धती – वस्तू व सेवा यांचे मोजमाप.
- उत्पन्न पद्धती – वस्तू व सेवा यांच्या किंमतीचे मोजमाप.
- खर्च पद्धती – नागरिकांनी केलेल्या खर्चाचे मोजमाप.
- भारतात उत्पादन पद्धतीचा उपयोग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केला जातो.
- बहुतेक देश उत्पादन पद्धतीचा उपयोग करतात.
- या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक मोजमाप करता येते
Q. अर्थशास्त्र हे ……….. शास्त्र आहे.
A. भौतिक
B. सामाजिक
C. नैसर्गिक
D. यापैकी नाही
उत्तर: B. सामाजिक
स्पष्टीकरण:
- अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. अॅडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचा जनक मानले जाते.
- त्यांनी अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र अशी व्याख्या मांडली.
Q. पैशाच्या ठिकाणी जी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची ……… असे म्हणतात.
A. किंमत
B. उत्पादन मूल्य
C. मागणी
D. क्रय शक्ती
उत्तर: क्रय शक्ती
स्पष्टीकरण: मौद्रिक विनिमय दर दोन चलनाच्या खरेदी विक्रीचा दर दर्शवतो तर वास्तविक विनिमय दर दोन चलनाच्या तुलनात्मक खरेदी शक्तीचा दर दर्शवतो त्यामुळे याला खरेदी शक्ती समानते किंवा क्रयशक्ती समानतेचा दर असे संबोधले जाते.
Q. कोणतेही अर्थ विधेयक……….. सही शिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही?
A. पंतप्रधानांच्या
B. अर्थमंत्र्यांच्या
C. राष्ट्रपतीच्या
D. अर्थसचिवाच्या
उत्तर: C. राष्ट्रपतीच्या
स्पष्टीकरण:
- राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते.
- धनविधेयक राष्ट्रपतीच्या पूर्व संमतीने मांडलेले असल्याने त्यास राष्ट्रपती मंजुरी नाकारू शकत नाहीत मात्र इतर विधेयकांना ते मंजुरी नाकारू शकतात.
- धनविधेयक कलम- 110
Q. आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय?
A. खाजगीकरण
C. उदारीकरण
B. जागतिकीकरण
D. निर्गुतवणुकीकरण
उत्तर: C. उदारीकरण
स्पष्टीकरण:
- 1991 मध्ये पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना भारतामध्ये आर्थिक सुधारणा घोषित केल्या गेल्या.
- त्यावेळी अर्थमंत्री – मनमोहन सिंग
- या सुधारणेने भारताची वाटचाल समाजवादी अर्थव्यवस्थेकडून भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे सुरू झाली.
- या आर्थिक सुधारणा अंतर्गत तीन धोरणे घोषित केले उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण
Q. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
A. राजा राममोहन रॉय
C. अमर्त्य सेन
B. दादाभाई नौरोजी
D. गोपाल कृष्ण गोखले
उत्तर B. दादाभाई नौरोजी
स्पष्टीकरण:
- दादाभाई नौरोजी है ‘भारताचे पितामह’ म्हणून ओळखले जातात.
- भारतीय आर्थिक समस्यांवरील त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी आणि ‘Drain Of Wealth’ सिद्धांत या त्यांच्या संकल्पनेसाठी ओळखले जातात.
Q. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनांचे स्वामित्व नियंत्रण आणि व्यवस्थापन……….द्वारे केले जाते?
A. सरकार द्वारे
C. खाजगी व्यक्तींद्वारे
B. समाजाद्वारे
D. जागतिक बँक
उत्तर: B. खाजगी व्यक्तींद्वारे
स्पष्टीकरण
- भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी हस्तक्षेपास मुभा नसते याउलट समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगांवर सरकारी नियंत्रण असते.
- भारताची अर्थव्यवस्था – मिश्र
Q. भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली?
A. बॉम्बे योजना
B. जनता योजना
C. गांधी योजना
D. विश्वेश्वरय्या योजना
उत्तर: (A. बॉम्बे योजना)
स्पष्टीकरण:
- 1943-44 मध्ये मुंबईतील अर्थ, उद्योग क्षेत्रातील आठ नामवंत कंपन्यांनी बॉम्बे योजना घोषित केली. या योजनेला टाटा बिर्ला योजना असे म्हणतात.
मित्रांनो मला अशा आहे Indian Economy म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था या संबंधी जे प्रश्न आजच्या Bhartiya Arthvyavastha Questions in Marathi या लेखात दिले होते ते तुम्हाला समजले असतील, तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
Also Read
Police Bharti Science Questions in Marathi
Indian Geography Questions in Marathi