भारताचा भूगोल प्रश्न उत्तरे | Indian Geography Questions in Marathi
Q. भारतातील तापमानाच्या वितरणासंदर्भात खालील विधाने अभ्यासून अचूक उत्तराचा पर्याय निवडा.
(१) हिवाळ्यातील रात्री लडाखमधील द्रास-कारगिल भागातील तापमान -४०° से. इतके खाली जाते.
(२) भारतात शिलाँगचे पठारावर सर्वांत कमी दैनिक तापमानकक्षा आढळून येते.
A. फक्त १
B. फक्त २
C. १ व २ दोन्ही
D. ना १ ना २
Q. १३५ किलोमीटर लांबीचे व ४० किलोमीटर रुंदीचे जगप्रसिद्ध काश्मीर खोरे हिमालयाच्या…. या रांगांमध्ये वसले आहे.
A. शिवालिक
B. हिमाचल
C. हिमाद्री
D. ट्रान्स हिमालय
Q. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
A. पूर्वाश्रमीच्या राजस्थान कालव्याचे आता ‘इंदिरा गांधी कालवा’ असे नामकरण केले गेले आहे.
B. या कालव्याची सुरुवात हरिके बंधाऱ्यापासून झाली आहे.
C. या कालव्यामुळे संपूर्ण राजस्थान राज्य ओलिता-खाली आणण्यात यश मिळाले आहे.
D. हा कालवा देशातील सर्वांत लांब कालवा असून त्याची लांबी ६४९ कि. मी. इतकी आहे.
Q. कोसी प्रकल्पाबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
A. कोसी प्रकल्पाचा फायदा बिहारबरोबर नेपाळलाही होत आहे.
B. या प्रकल्पांतर्गत कोसी नदीवर नेपाळमध्ये हनुमान-नगर येथेही धरण बांधण्यात आले आहे.
C. हा बिहार व नेपाळ सरकारचा संयुक्त व बहुउद्देशीय प्रकल्प आहे.
D. या प्रकल्पांतर्गत बिहारमधील दतिया घळईत २३० मीटर उंचीचे धरण बांधण्यात आले आहे.
Q. आदिवासी जमात व संबंधित राज्य यांच्या जोड्या खाली दिल्या आहेत. त्यांपैकी चुकीची जोडी/जोड्या ओळखा.
(१) लिंबू : सिक्कीम
(२) गड्डी अरुणाचल प्रदेश
(३) कुकी: नागालँड
(४) मीना: राजस्थान
A. १ व ३
B. फक्त २
C. फक्त ३
D. फक्त ३ व ४
Q. भारतात आढळणाऱ्या लोहखनिज साठ्यांसंदर्भात खालील-पैकी कोणती विधाने सत्य आहेत?
(१) जगातील लोहखनिजाच्या साठ्यापैकी चौथा हिस्सा साठे भारतात आहेत.
(२) ओडिशातील सुवर्णरेखा व महानदी यांच्या खोऱ्या-तील मयूरभंज परिसर लोहखनिजाच्या साठ्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे.
(३) पश्चिम बंगालमध्ये वर्धमान व वीरभूम येथे लोह-खनिजाचे साठे आहेत.
(४) झारखंडमधील मानभूम व सिंगभूम परिसर लोह-निजाच्या खाणींसाठी विशेष प्रसिद्ध आहे.
A. १, २, ३ व ४
B. फक्त १, २ व ३
C. फक्त १, २ व ४
D. फक्त १, ३ व ४
Q. मैंगनीजच्या साठ्यांसंदर्भात खालील विधानांवर विचार करा.
(१) भारतात मँगनीजचे ४९.६ कोटी टन साठे असून मँगनीजचे भारतातील सर्वाधिक साठे ओडिशा राज्यात आहेत.
(२) देशातील मँगनीजच्या एकूण साठ्यांपैकी सुमारे २० टक्के साठे महाराष्ट्र राज्यात आढळतात.
(३) मैंगनीजच्या एकूण साठ्यांच्या निमपट साठे कर्नाटक राज्यात सापडतात.
उपरोक्त विधानांपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहेत ?
A. १, २, व ३
B. फक्त २ व ३
C. फक्त १ व २
D. फक्त १
Q. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अचूक आहेत?
(१) बृहद्-हिमालयातील ‘थांग-ला’, ‘निती-ला’ आणि ‘लिपुलेख-ला’ या खिंडी उत्तराखंड राज्यात आहेत.
(२) बृहद्-हिमालयातील ‘जेलेप-ला’ ही खिंड सिक्कीम राज्यात आहे.
(३) बृहद्-हिमालयातील बारा-लाचा-ला आणि शिप्की- ला या खिंडी हिमाचल प्रदेश राज्यात मोडतात.
(४) हिमालयाच्या ‘मध्य हिमालय’ या रांगांनाच सर्व- साधारणपणे हिमालय म्हणून ओळखले जाते.
A. फक्त १
B. फक्त २ व ३
C. फक्त १, २ व ३
D. यांपैकी एकही नाही
Nirmal Academy: Class 1 to 12 Study Material For All Boards
Q. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A. ‘पचमढी’ जवळ वसलेले धूपगढ हे सातपुडा पर्वतावरील सर्वोच्च शिखर आहे.
B. सिक्कीम हिमालयात वसलेले ‘कांचनगंगा’ हे भारतातील दुसऱ्या तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे.
C. अरवली पर्वतरांगेतील ‘गुरुशिखर’ हे सर्वाधिक उंचीचे स्थान आहे.
D. सह्याद्री पर्वत व पूर्व घाट हे बाबाबुदान टेकड्यांत एकत्र येतात.
Q. भारतातील नद्यांसंदर्भात खालील विधानांवर विचार करा.
(१) लांबीचा विचार करता गंगा ही देशातील पहिल्या क्रमांकाची नदी ठरते.
(२) गोदावरी या नदीस देशातील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी म्हणावे लागेल.
(३) गंगा नदीचे खोरे देशातील सर्वांत मोठे खोरे आहे.
(४) यमुना नदीची लांबी ही नर्मदा आणि गोदावरी या नद्यांपेक्षा अधिक आहे.
उपरोक्त विधानांपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
A. फक्त १, २ व ४
B. फक्त ३ व ४
C. फक्त १, २ व ३
D. फक्त २, ३, व ४
Q. खालीलपैकी कोण/कोणत्या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झाली आहे?
(१) कृष्णा
(२) गंगा
(३) महानदी
(४) नर्मदा
A. फक्त १ व ४
B. फक्त २, ३ व ४
C. फक्त २ व ३
D. फक्त १, २ व ३
Q. खालीलपैकी कोणते / ती विधान/ने सत्य आहे/त?
(१) लाखेच्या उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो.
(२) झारखंड राज्यात लाखेचे सर्वांत अधिक उत्पन्न मिळते.
A. फक्त १
B. फक्त २
C. १ व २ दोन्ही
D. ना १ ना २
Q. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
A. गीरचे अभयारण्य : गुजरात
B. घटप्रभा पक्षी अभयारण्य : राजस्थान
C. वाल्मिकी अभयारण्य : बिहार
D. कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश
Q. खालीलपैकी कोणते / ती विधान/ने योग्य आहे/त?
(१) वनप्रदेशाची गणना, निर्धारण व विकास या दृष्टिकोनातून भारतीय वन सर्वेक्षण या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
(२) या संस्थेचे मुख्यालय डेहराडून येथे आहे.
(३) सन १९५२ मध्ये देशातील वनांचे संरक्षण व विकास या दृष्टिकोनातून देशात ‘राष्ट्रीय वननीती’ ची घोषणा केली गेली.
A. फक्त १
B. फक्त २ व ३
C. फक्त १ व २
D. १, २ व ३
Q. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(१) ‘पोंग’ धरण बियास नदीवर बांधण्यात आले आहे.
(२) जम्मू आणि काश्मीरमधील ‘सलाल जलविद्युत प्रकल्प’ बियास नदीवर उभारण्यात आला आहे.
(३) जगातील सर्वांत लांब गणले जाणारे हिराकूड धरण महानदीवर बांधण्यात आले आहे.
(४) पोलावरम प्रकल्प ओडिशा राज्यात आहे.
A. १, २, ३ व ४
B. फक्त २ व ३
C. फक्त २, ३ व ४
D. फक्त १ व ३
Q. खाली देशातील काही महत्त्वाचे जलसिंचन व जलविद्युत प्रकल्प आणि संबंधित नद्या यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यांपैकी कोणती जोड़ी चुकीची आहे?
A. काक्रापारा : तापी
B. मातातिला : बेटवा
C. कृष्णराजसागर: कावेरी
D. नागार्जुनसागर : तुंगभद्रा
Q. दामोदर खोरे परियोजनेसंदर्भात कोणते विधान बरोबर नाही?
A. या परियोजनेचा लाभ मुख्यत्वे पश्चिम बंगाल व झारखंड या दोन राज्यांना मिळतो.
B. या परियोजनेचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ पाहते.
C. महामंडळाची स्थापना सन १९४८ मध्ये केली गेली.
D. कृषिसिंचन आणि पाणीपुरवठा यांसाठी सदरहू परियोजना राबविण्यात येत आहे.
Q. सागर बेटासंदर्भात चुकीचे विधान ओळखा.
A. या बेटालाच ‘गंगासागर’ असेही संबोधले जाते.
B. हे बेट ढाका शहरापासून दक्षिणेला १५० कि. मी. अंतरावर बंगालच्या उपसागरात वसले आहे.
C. या बेटावर धोक्यातील (नष्ट होऊ लागलेल्या) शाही बंगाली वाघांचे वास्तव्य आहे.
D. हे बेट खारफुटी वनस्पतींनी समृद्ध बनले आहे.
Q. खालीलपैकी कोणत्या गटातील राज्यांना मुचकुंदी नदीवरील मुचकुंद प्रकल्पाचा लाभ मिळतो?
A. हरियाना व पंजाब
B. केरळ व आंध्र प्रदेश
C. आंध्र प्रदेश व ओडिशा
D. बिहार व उत्तर प्रदेश
Q. ‘फराक्का बांध’ निर्मितीमागील उद्देश
A. कोलकाता बंदर सुस्थितीत राखणे.
B. भागीरथी व हुगळी या नद्यांचा प्रवाह वाहतुकीसाठी सुयोग्य बनविणे.
C. अ व ब दोन्ही
D. यांपैकी नाही.
Q. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(१) उत्तर प्रदेश राज्यात कूपनलिकांची संख्या इतर राज्यांपेक्षा अधिक आहे.
(२) नानगल कालव्याद्वारे इतर कोणत्याही कालव्यापेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.
(३) जवाहरलाल नेहरूंनी भारतातील बहुउद्देशीय प्रकल्पांना ‘आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे’ म्हणून संबोधिले आहे.
A. फक्त १ व २
B. फक्त २ व ३
C. १, २ व ३
D. फक्त १ व ३
Q. देशातील अन्नधान्य पिकांखालील सर्वाधिक क्षेत्र या पिकाखाली येते.
A. गह
B. बाजरी
C. ज्वारी
D. तांदूळ
Q. पूर्व हिमालयातील टेकड्यांचा पश्चिम-पूर्व या दिशेने अचूकपणे लावलेल्या क्रमाचा पर्याय ओळखा.
A. डाफला, मिरी, मिश्मी, अबोर
B. डाफला, मिरी, अबोर, मिश्मी
C. डाफला, मिश्मी, अबोर, मिरी
D. अबोर, मिश्मी, मिरी, डाफला
Q. खाली दिलेल्या विधानांवर विचार करा व त्यांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, ते सांगा.
(१) भारत हा तांदळाचा किंवा भाताचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उत्पादक व उपभोक्ता आहे.
(२) तांदळाचा भारतातील सर्वांत मोठा उत्पादक म्हणून पश्चिम बंगाल या राज्याचा निर्देश करावा लागेल.
(३) भारतातील चहाच्या एकूण उत्पादनात आसाम या राज्याचा वाटा निम्म्यापेक्षा अधिक असतो.
(४) पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग हा जिल्हा चहाच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
A. १, २, ३ व ४
B. फक्त २ व ३
C. फक्त २ व ४
D. फक्त १ व ३
Q. खालील विधाने अभ्यासा व त्यांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, ते सांगा.
(१) ‘पंबन’ व ‘देअर’ ही बेटे तमिळनाडूच्या किनारी सागरात आहेत.
(२) भारतातील पंचाहत्तर टक्क्यांहून अधिक इतके तागाचे उत्पादन पश्चिम बंगाल राज्यात होते.
(३) खनिज संपत्तीचा विचार करता बिहार हे देशातील सर्वाधिक समृद्ध राज्य आहे.
A. फक्त १ व ३
B. फक्त २ व ३
C. १, २ व ३ तिन्ही
D. फक्त १ व २
Q. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अचूक आहे/त?
(१) भारतात कर्नाटक राज्यात क्रोमाइट हे खनिज र्वाधिक प्रमाणात सापडते.
(२) थोरिअम हे खनिज केरळ या राज्यात सर्वाधिक प्रमाणात सापडते.
A. फक्त १
B. फक्त २
C. १ व २ दोन्ही
D. ना १ ना २
Q. खालीलपैकी कोणती / ते विधान/ने सत्य आहे/त?
(१) सर्वसाधारणपणे लोह-पोलाद प्रकल्प दगडी कोळशांच्या साठ्यांच्या जवळपास उभारले जातात.
(२) भिलाई हा लोह-पोलाद प्रकल्प त्यास अपवाद आहे.
A. फक्त १
B. फक्त २
C. १ व २ दोन्ही
D. ना १, ना २
Q. टिटाघर (पश्चिम बंगाल) व नेपानगर (मध्य प्रदेश) ही स्थाने खालीलपैकी कोणत्या एकाच उद्योगाशी निगडित आहेत ?
A. सिमेंट
B. कागद
C. तेलशुद्धीकरण
D. लोह-पोलाद
Q. खालील विधानांवर विचार करून सत्य विधान/ने ओळखा.
(१) खनिज तेलाच्या उत्पादनात आसाम देशात अग्रेसर आहे.
(२) गुजरात राज्याचा या क्षेत्रात दुसरा क्रमांक लागतो.
A. फक्त १
B. फक्त २
C. १ व २ दोन्ही
D. कोणतेही नाही.
Q. खाली काही सरोवरे व ती जेथे आहेत ती राज्ये यांच्या जोड्या दिल्या आहेत. यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
A. लोणार : महाराष्ट्र
B. चिल्का : ओडिशा
C. कोल्लेरू: आंध्र प्रदेश
D. वैबनाड : तामिळनाडू
Q. खालीलपैकी …. येथील कागद कारखाना हा देशातील सर्वांत मोठा कागद कारखाना म्हणून ओळखला जातो.
A. बल्लारपूर (महाराष्ट्र)
B. नेपानगर (मध्य प्रदेश)
C. टिटाघर (पश्चिम बंगाल)
D. सेहरामपूर (पश्चिम बंगाल)
Q. खालीलपैकी कोणकोणत्या शहरात हिंदुस्थान मशीन टूल्सचा कारखाना आहे?
(१) पिंजोर (हरियाना)
(२) बेंगळुरू (कर्नाटक)
(३) हैदराबाद (तेलंगाणा)
(४) पुणे (महाराष्ट्र)
A. फक्त १ व २
B. फक्त ३ व ४
C. फक्त १, २ व ३
D. फक्त २, ३ व ४
Q. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(१) ‘सांबर सरोवर’ राजस्थान राज्यात आहे.
(२) ‘धुवाँधार’ हा प्रसिद्ध धबधबा मध्य प्रदेश राज्यात आहे.
(३) भारतातील मोसमी पावसाचे वर्णन अलबरूनी या अरब प्रवाशाने सर्वप्रथम केले आहे.
A. १, २, व ३
B. फक्त २ व ३
C. फक्त १ व २
D. फक्त ३
Q. खाली पश्चिम घाटातील गिरिशिखरे आणि त्यांची समुद्र-सपाटीपासूनची उंची यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यांपैकी चुकीची जोडी ओळखा.
A. पुष्पगिरी: २,०५० मी.
B. कुद्रेमुख: १,८९४ मी.
C. मुकुथी: २,५५४ मी.
D. कोडाईकॅनॉल: २,१३३ मी.
Q. मध्य प्रदेश राज्यातील खालीलपैकी कोणत्या पर्यायात दिलेली दोन्ही स्थळे परंपरागत हस्तउद्योग व्यवसाय व हातमाग कापड उत्पादनाशी संबंधित आहेत ?
A. चंदेरी व माहेश्वरी
B. पचमढी व निमूज
C. होशंगाबाद व देवास
D. उज्जैन व विदिशा
Q. खालील विधाने वाचून सत्य विधाने ओळखा.
(१) भोपाळ (मध्य प्रदेश) शहरात विजेवरील रेल्वे इंजिनांचा कारखाना आहे.
(२) चित्तरंजन येथे तयार झालेल्या पहिल्या रेल्वे इंजिनास देशबंधू हे नाव दिले गेले आहे.
(३) केबल उद्योगाशी निगडित असलेले रूपनारायणपूर हे ठिकाण झारखंड राज्यात आहे.
A. फक्त १ व ३
B. फक्त २ व ३
C. फक्त १ व २
D. १, २ व ३
Q. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(१) जगातील एक-षष्ठांश लोकसंख्या भारतात राहते.
(२) भारतातील एक पंचमांश लोकसंख्या उत्तर प्रदेश या राज्यात राहते.
(३) लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या स्थानावर असलेला भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने मात्र सातव्या स्थानावर आहे.
(४) जगाच्या १७.५ टक्के लोकसंख्या असलेल्या भारताच्या वाट्यास भू-क्षेत्रफळ मात्र जगाच्या २.४२ टक्के इतके आले आहे.
A. फक्त १, ३ व ४
B. फक्त २ व ३
C. फक्त २, ३ व ४
D. फक्त १ व ३
Q. खालीलपैकी कोणती / ते विधान/ने बरोबर आहे/त?
(१) भारतात १६ सप्टेंबर, १९५९ रोजी दूरदर्शनसेवा सुरू झाली.
(२) देशात पहिले दूरदर्शनकेंद्र मात्र १९४७ मध्ये दिल्ली येथे स्थापन झाले होते.
A. फक्त १
B. फक्त २
C. १ व २ दोन्ही
D. ना १ ना २
Q. खालील विधानांवर विचार करून अचूक विधान/ने ओळखा.
(१) अभ्रकाच्या उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो.
(२) जगातील एकूण उत्पादनाच्या ६० टक्के अग्नकाचे उत्पादन भारतात होते.
(३) भारतातील अभ्रकाचे सर्वाधिक साठे बिहार राज्यात आहेत.
A. फक्त १
B. फक्त ३
C. फक्त १ व २
D. १, २ व ३
Q. खालीलपैकी कोणत्या राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांतही बऱ्यापैकी पाऊस पडतो ?
A. हिमाचल प्रदेश
B. उत्तर प्रदेश
C. तमिळनाडू
D. केरळ
Q. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
(१) सध्या पश्चिम घाटात सात राष्ट्रीय उद्याने आणि ३९ वन्यजीव अभयारण्ये आहेत.
(२) जैवविविधता संवेदन क्षेत्राचा पश्चिम घाट एक भाग आहे.
(३) युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेने पश्चिम घाटातील ३९ ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये केला आहे.
A. १, २ व ३
B. फक्त १ व २
C. फक्त २ व ३
D. फक्त १ व ३
Q. भारतात सर्वाधिक मीठ कोणत्या राज्यात गोळा केले जाते?
A. महाराष्ट्र
B. केरळ
C. गुजरात
D. राजस्थान
Q. खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीचे लोक जास्त आहेत ?
A. बिहार
B. आसाम
C. नागालैंड
D. छत्तीसगढ
Q. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक सुती कापडाच्या गिरण्या आहेत ?
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. तमिळनाडू
D. उत्तर प्रदेश
Q. पश्चिम घाटाच्या विस्ताराबाबत खालीलपैकी कोणते / ती विधान/ने खरे/री नाही/त?
(१) तापी नदी खोऱ्यापासून निलगिरी पर्वतपुंजापर्यंत पसरलेल्या पश्चिम घाटास उत्तर सहह्याद्री म्हणून ओळखले जाते.
(२) निलगिरी पर्वतपुंजापासून पुढे दक्षिणेपर्यंत पसरलेल्या घाटास दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखले जाते.
A. फक्त १
B. फक्त २
C. १ व २ दोन्ही
D. ना १ ना २
Q. खालीलपैकी कोणत्या नद्या पश्चिमवाहिनी आहेत?
(१) शरावती
(२) नर्मदा
(३) पद्मा
(४) पेरियार
A. फक्त १, २ व ४
B. फक्त १ व २
C. फक्त २, ३ व ४
D. १, २, ३ व ४
Q. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
(१) हिमालयाचा भारतातील जास्तीत जास्त प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्यात येतो.
(२) भारतातील सर्वांत तरुण व सर्वांत उंच हिमालय वली पर्वतप्रणाली आल्प्स पर्वतप्रणालीचाच एक भाग मानली जाते.
(३) हिमालयाच्या हिमाद्री या रांगेस ‘बृहद् हिमालय’ (Greater Himalayas) म्हटले जाते.
(४) ‘काराकोरम’ व ‘कुनलून’ या पर्वतरांगा ट्रान्स हिमालयाजचा एक भाग होत.
A. १, २, ३ व ४
B. फक्त २ व ३
C. फक्त २ व ४
D. फक्त १ व ३
Q. भारतातून वाहणारी ‘ब्रह्मपुत्र’ नदी म्हणजे मूळ…. या नदीचाच पुढे विस्तार पावलेला प्रवाह होय.
A. त्सांगपो
B. दिबांग
C. लोहित
D. अलकनंदा
Q. खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी तेलशुद्धीकरण कारखाने आहेत ?
(१) कोलकाता
(२) मनाली
(३) बिना
(४) दिल्ली
(५) बथिंडा
A. वरील सर्व ठिकाणी
B. फक्त २, ३ व ५
C. फक्त १, २ व ४
D. फक्त २ व ५
Q. ‘पीरपांजाल’, ‘धौलाधार’ या रांगा खालीलपैकी कोठे वसल्या आहेत?
A. हिमाद्री
B. शिवालिक
C. हिमाचल
D. ट्रान्स हिमालयाज
Q. खाली एका स्तंभात गिरीशिखरे व दुसऱ्या स्तंभात संबंधित डोंगररांगा दिल्या आहेत. दिलेल्या संकेताक्षरांच्या साहाय्याने त्यांच्या अचूक जोड्या जुळवा.
गिरीशिखर | डोंगररांग/टेकड्या
(य) मुलानगिरी: (१) बाबाबुदान टेकड्या
(र) नोक्रेक: (२) गारो टेकड्या
(ल) अर्माकोंडा: (३) पूर्व घाट
(व) ब्लू माऊंटन: (४) मिझो टेकड्या
A. य-३, र-२, ल-१, व-४
B. य-१, र-४, ल-३, व-२
C. य-२, र-१, ल-४, व-३
D. य-१, र-२, ल-३, व-४
Q. आंध्र प्रदेशमध्ये बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या द्वीपकल्पीय पठारावरील नद्या खालीलपैकी कोणत्या गटात दिल्या आहेत?
A. तुंगभद्रा, गोदावरी
B. कावेरी, तुंगभद्रा
C. गोदावरी, महानदी
D. कृष्णा, गोदावरी
Q. पुढीलपैकी कोणत्या नदीस ‘तांबडी नदी’ असे संबोधिले जाते ?
A. तापी
B. तुंगभद्रा
C. यमुना
D. ब्रह्मपुत्र
Q. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(१) यमुना व विध्याद्रीच्या दरम्यान पसरलेल्या झीजेच्या मैदानास ‘बुंदेलखंड’ म्हणूनही ओळखले जाते.
(२) बुंदेलखंडचे मैदान मध्य प्रदेश राज्यात आहे.
(३) उत्तरेकडील गंगा व तिच्या उपनद्यांचे खोरे व क्षिणेकडील नर्मदा नदीचे खोरे विंध्य पर्वतरांगांमुळे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.
A. फक्त २
B. फक्त २ व ३
C. फक्त १ व २
D. फक्त १, २ व ३
Q. सुयोग्य जोड्या लावा.
(य) भाबर: (१) जुन्या गाळाची मृदा
(र) बेत: (२) हिमालयाच्या पायथ्याजवळील दगड गोट्यांचा अरुंद भूप्रदेश
(ल) भांगर: (३) नवीन गाळाच्या भरणाने तयार झालेली मृदा
(व) बील: (४) दलदलीचा भूप्रदेश
A. य-२, २-३, ल-१, व-४
B. य-१, र-२, ल-३, व-४
C. य-२, र-१, ल-४, व-३
D. य-४, र-३, ल-२, व-१
Q. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/त.
(१) उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने शिवालिक टेकड्या येथे आढळतात.
(२) निलगिरी पर्वतीय भागात आढळणाऱ्या उष्ण- कटिबंधीय आर्द्र पर्वतीय ‘शोला’ असे म्हटले जाते.
A. फक्त १
B. फक्त २
C. १ व २ दोन्ही
D. कोणतेही नाही.
Q. ‘बेंगॉल आयर्न वर्क्स’ या कंपनीने पश्चिम बंगालमध्ये ‘कुल्टी’ येथे सुरू केलेला लोह-पोलाद प्रकल्प देशातील पहिला यशस्वी लोह-पोलाद उद्योग होय. हा प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू केला गेला?
A. १८५८
B. १८६५
C. १८७०
D. १८८२
Q. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
(१) भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी दावर यांनी इ. स. १८५१ मध्ये मुंबई येथे सुरू केली.
(२) पहिली ताग गिरणी १८५५ मध्ये कोलकाता येथे उभी राहिली.
(३) भारतातील दुसरी कापड गिरणी १० ऑगस्ट, १८५४ रोजी सुरू केली गेली.
(४) ही दुसरी कापड गिरणी सुरू करण्याचे श्रेय माणेकजी पेटिट यांना द्यावे लागेल.
A. फक्त १, २ व ३
B. फक्त २ व ३
C. फक्त २ व ४
D. १, २, ३ व ४
हे देखील वाचा