कॉमनवेल्थ गेम्स संबंधी महत्वाचे प्रश्न | Commonwealth Games Questions in Marathi
काहीच महिन्यांपूर्वी राष्ट्रकुल खेळ 2022 समाप्त झाले आहेत. जर तुम्ही कोणत्याही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर Commawelth Games 2022 म्हणजेच राष्ट्रकुल 2022 हा सध्या अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्यामुळे या विषया संबधी असेलेले महत्वाचे प्रश्न मी आज या विडिओ मध्ये घेऊन आलो असून हि व्हिडीओ अगदी शेवट पर्यंत नक्की बघा.
1. राष्ट्रकुल खेळ २०२२ चे आयोजन कुठे करण्यात आले होते?
A. टोकियो (जपान)
B. बीजिंग (चीन)
C. बर्मिंघम (इंग्लंड)
D. न्यूयॉर्क (अमेरिका )
बर्मिंघम शहर हे इंग्लंड देशामधील एक शहर आहे. राष्ट्रकुल खेळाला Commonwealth Games या नावाने देखील ओळखलं जाते. त्याच सोबत तुम्हाला हेही विचारलं जाऊ शकत कि 2022 चे राष्ट्रकुल खेळ हि कितवी आवृत्ती आहे तर, लक्षात ठेवा ही 22 वि आवृत्ती म्हणजे 22nd edition आहे. मित्रानो तुम्हाला त्याच सोबत हे देखील माहित असल पाहिजे कि 22च्या अगोदरचे म्हणजे 21 वि आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती, तर 21st edition खेळले गेले होते गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया देशामध्ये.
त्याचसोबत जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर विचारण्यात आले कि या पुढील आवृत्ती म्हणजे राष्ट्रकुल खेळ २३ वि आवृत्ती कुठे खेळली जाणार आहे तर उत्तर लक्षात ठेवा 23वे Commonwealth Games हे व्हिक्टोरिया शहरामंध्ये खेळले जाणार आहे हे शहर देखील ऑस्ट्रेलिया देशात आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा.
2. राष्ट्रकुल खेळ २०२२ मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकले?
A. ऑस्ट्रेलिया
B. इंग्लंड
C. कॅनडा
D. भारत
- ऑस्ट्रलिया देशाने राष्ट्रकुल खेळ 2022 मध्ये सर्वात अधिक पदके जिंकली आहेत.
मित्रानो हे तुमच्या समोर ऑस्ट्रेलिया देशाच्या झेंड्याचे चित्र आहे. त्याचसोबत आपण ऑस्ट्रेलिया देशाच्या पदकांचा चार्ट देखील पाहणार आहोत. जस मी सांगितले कि ऑस्ट्रेलिया देशाने सर्वात अधिक पदके जिकली आहेत तर ऑस्ट्रेलिया देशाने किती पदके जिंकली आहेत, त्यात किती सुवर्ण, किती रौप्य आणि किती कास्य पदके आहेत हे मी आता तुम्हाला सांगणार आहे.
तर हा सर्वात अधिक पदके जिंकलेल्या टॉप ५ देशांची यादी आहे ज्यात ऑस्ट्रलिया हा प्रथम क्रमांकावर आहे, आणि ऑस्ट्रेलिया देशाने एकूण १७८ पदके जिंकली आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कि ऑस्ट्रेलिया देशाने एकूण किती पदके जिंकली आहेत तर १७८ पदके. त्याच सोबत हे हि लक्षात ठेवा कि ऑस्ट्रेलिया देशांत सर्वात अधिक सुवर्ण पदके देखील जिंकली आहेत. तर ६७ सुवर्ण पदके आहेत, त्याच सोबत ५७ कास्य आहेत तर ५७ हे रौप्य म्हणजे सिल्वर पदके तर ५४ कास्य म्हणजे ब्रॉंझ पदके जिंकली आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर आहे इंग्लड देश, इंग्लंड देशाने एकूण पदके जिंकली आहेत १७३. त्यामध्ये ५६ गोल्ड, ६४ सिल्वर आणि ५३ ब्रॉंझ पदके जिंकली आहेत.
जर आपण तिसऱ्या क्रमांकावर पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावर आहे कॅनडा देश, आणि कॅनडा देशाने एकूण पदके जिंकली आहे ९२. ज्यामध्ये गोल्ड मेडल आहेत २६, सिल्वर मेडल्स आहेत ३२ आणि ब्रॉंझ म्हणजे कांस्य पदके आहेत ३४.
चला मित्रानो आता पाहूया आपल्या भारत देशाबद्दल, आपल्या प्रिय भारत देशाने देखील ह्यावेळी राष्ट्रकुल खेळ २०२२ मध्ये उत्तम असे प्रदर्शन केले आहे. आणि आपल्या भारत देशाने ६१ पदके जिंकून चौथा क्रमांक पटकावला आहे जो कि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या ६१ पदकांमध्ये २२ सुवर्ण पदकआहेत, १६ आहे रौप्य पदके आणि कांस्य पदके २३ आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत.
हा एक अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे. हे त्याचे काही
महत्वाचे मुद्दे.
- राष्ट्रकुल खेळ २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया देशाने सर्वात अधिक पदके जिंकली
- ऑस्ट्रेलिया देशाने एकूण १७८ पदके जिंकली त्यात ६७ गोल्ड, ५७ सिल्वर आणि ५४ ब्रॉंझ पदकांचा समावेश आहे
- भारत देश पदकांच्या यादीत ६१ पादकांसहित ( २२ गोल्ड, १६ सिल्वर आणि २३ ब्रॉंझ ) चौथ्या क्रमांकावर आहे.
3. “राष्ट्रकुल खेळ २०२२” मध्ये भारत देशाने एकूण किती पदके जिंकली आहेत?
A. ६८ पदक
B. ७८ पदक
C. ४५ पदक
D. ६१ पदक
भारत देशाने एकूण ६१ पदके जिंकली आहेत. तुम्ही पुन्हा एकदा वरील चार्ट पाहू शकता. भारत हा चौथ्या क्रमांकावर आहे. भारताने एकूण ६१ पदके जिंकली ज्यात २२ गोल्ड, १६ सिल्वर आणि २३ ब्रॉंझ पदकांचा समावेश आहे. त्यामुळे लक्षात ठेवा येणाऱ्या पुढच्या ४ वर्षात कधीही प्रश्न विचारला तर हे उत्तर लक्षात ठेवाकारण पुढील राष्ट्रकुल खेळ स्पर्धा हि ४ वर्षानंतर होईल. म्हणजे पुढील स्पर्धा कधी होईल तर लक्षात ठेवा २०२६ ला होईल जी कि २३ वि आवृत्ती असेल.
4. राष्ट्रकुल खेळ २०२२ मध्ये सर्वात अधिक सुवर्ण पदके कोणत्या देशाने जिंकली आहेत?
A. ऑस्ट्रेलिया
B. इंग्लंड
C. कॅनडा
D. भारत
- ऑस्ट्रेलिया देशाने सर्वात अधिक म्हणजे ६७ सुवर्ण पदके जिंकली आहेत.
महत्वाचे मुद्दे
- सर्वात जास्त सुवर्ण पदक (६७) – ऑस्ट्रेलिया
- सर्वात जास्त रौप्य पदक (६४) – इंग्लंड
- सर्वात जास्त कास्य पदक (५४) – ऑस्ट्रेलिया
5. राष्ट्रकुल खेळ २०२२ चे आयोजन कधी करण्यात आले होते.
A. २८ जुलै २०२२ ते ८ ऑगस्ट २०२२
B. २५ जुलै २०२२ ते ५ ऑगस्ट २०२२
C. ५ जुलै २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२
D. २८ जुलै २०२२ ते १२ ऑगस्ट २०२२
राष्ट्रकुल खेळ २०२२ ला, बर्मिंघम राष्ट्रकुल २०२२ ह्या नावाने देखील ओळखलं जाते.
6. राष्ट्रकुल खेळ २०२२ (CWG २०२२) चे शुभंकर काय होते?
A. पेरी द बुल
B. मिराईतोवा
C. सोमाइटी
D. बिंग ड्वेन
- “पेरी द बुल” हा राष्ट्रकुल खेळ २०२२ चा शुभंकर किव्हा ह्याला mascot देखील बोलू शकता. ह्याच चित्र तुम्ही इथे पाहू शकता.
7. राष्ट्रकुल खेळ 2022 (CWG 2022) च्या उद्घाटन समारोहामध्ये भारतध्वज वाहक कोण बनले होते?
A. पी. व्ही . सिंधू ( बॅडमिंटन खेळाडू)
B. मनप्रीत सिग ( हॉकी खेळाडू)
C. A आणि B दोन्ही
D. यापैकी कोणी नाही
आणि याचे बरोबर उत्तर आहे पर्याय C म्हणजे पी. व्ही. सिंधू जो कि बॅडमिंटन खेळाडू आहे आणि मनप्रीत सिंग जो कि हॉकी खेळाडू आहे. तर मित्रानो तुम्ही इथे फोटो मध्ये पाहू शकता उजव्या बाजूला आहेत त्या पी. व्ही. सिंधू ज्या कि बॅडमिंटन खेळाडू आहे आणि डाव्या बाजूला मनप्रीत सिंग आहेत जे कि हॉकी खेळाडू आहेत.
8. राष्ट्रकुल खेळ २०२२ समापन समारोह मध्ये भारतध्वज वाहक कोण होते?
A. अंचता शरद कमल
B. निकाहत जरीन
C. a आणि b दोन्ही
D. यापैकी कोणी नाही
- अंचता शरद कमल आणि निकाहत जरीन, हे दोघेही, राष्ट्रकुल खेळ २०२२ समापन समारोह मध्ये भारतध्वज वाहक होते.
9. राष्ट्रकुल खेळ २०२२ मध्ये भारतासाठी पहिला सुवर्ण पदक कोणी जिंकला?
A. मीराबाई चानू
B. पी.वि.सिंधू
C. मनप्रीत सिंग
D. यापैकी कोणी नाही.
मीराबाई चानू ह्या वेट लिफ्टर खेळाडू आहेत आणि मीराबाई चानू यांनी राष्ट्रकुल खेळ २०२२ मध्ये भारतासाठी पहिला सुवर्ण पदक जिंकला आहे.
10. वर्ष २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळ २०२२ ची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे?
A. २२ वी
B. २१ वी
C. २३ वी
D. २४ वी
11. राष्ट्रकुल खेळ सर्वात प्रधम केंव्हा आयोजित करण्यात आले होते?
A. १९२५
B. १९३५
C. १९३०
D. १९३९
इ . स. १९३० ला राष्ट्रकुल खेळ सर्वात प्रथम आयोजित करण्यात आले होते.
महत्वाचे मुद्दे
- राष्ट्रकुल खेळ किंव्हा कॉमनवेल्थ गेम्स हि एक आंतरराष्ट्रीय बहु खेल प्रतियोगिता आहे, ज्यामध्ये राष्ट्रकुल देशांमधील ऍथलेट म्हणजे खेळाडू समाविष्ट होतात.
- याचे आयोजन सर्वात प्रथम १९३० मध्ये झाले होते आणि दर ४ थ्या वर्षी हि प्रतिस्पर्धी वेगवेगळ्या देशात आयोजित करण्यात येते.
- राष्ट्रकुल खेळाला १९३० ते १९५० बिटिश एम्पायर गेम्स या नावाने तसेच, १९५४ ते १९६६ बिटिश एम्पायर अँड कंमानवेल्थ गेम्स आणि १९७० ते १९७४ पर्यंत बिटिश कॉमनवेल्थ गेम्स या नावाने ओळखले जात असे.
12. राष्ट्रकुल खेळ सर्वात प्रथम कुठे आयोजित करण्यात आले होते.
A. टोकियो ( जपान)
B. हॅमिल्टन (कॅनडा)
C. बीजिंग (चीन)
D. नवी दिल्ली (भारत)
हॅमिल्टन शहर जो कि, कॅनडा देशात आहे. म्हणजे १९३० ला सर्वात प्रथम हॅमिल्टन (कॅनडा) येथे राष्ट्रकुल खेळ आयोजित करण्यात आले होते.
13. राष्ट्रकुल खेळ किती वर्षाच्या अंतराने आयोजित केले जाते?
A. २
B. ४
C. ६
D. ८
14. भारत देशाने सर्व प्रथम राष्ट्रकुल खेळात कधी सहभाग घेतला?
A. १९३० हॅमिल्टन राष्ट्रकुल खेळ
B. १९३४ लंडन राष्ट्रकुल खेळ
C. २०१८ गोल्ड कॉस्ट राष्ट्रकुल खेळ
D. यापैकी नाही
- १९३४ लंडन राष्ट्रकुल खेळात भारत देशाने सर्व प्रथम सहभाग घेतला.
15.दरवर्षी राष्ट्रकुल दिवस कधी साजरा केला जातो?
A. २४ मे
B. २६ जून
C. १८ ऑगस्ट
D. २७ डिसेम्बर
16. कोणत्या देशांत सर्वात जास्त वेळा (५ वेळा) राष्ट्रकुल खेळ आयोजित केले गेले आहे?
A. भारत
B. कॅनडा
C. जपान
D. ऑस्ट्रेलिया
- ऑस्ट्रेलिया देशात सर्वात जास्त वेळा म्हणजे ५ वेळा राष्ट्रकुल खेळ आयोजित करण्यात आले आहे.
17. राष्ट्रकुल देशांचे मुख्यालय कोठे आहे?
A. ल्युसाने ( स्वित्झर्लंड )
B. लंडन (युनाइटेड किंग्डम )
C. नवी दिल्ली (भारत)
D. टोकियो (जपान)
18. राष्ट्रकुल देशांची स्थापना केंव्हा झाली?
A. २७ जानेवारी १९८७
B. ११ डिसेम्बर १९३१
C. १५ ऑगस्ट १९४७
D. १८जून १९५०
19. राष्ट्रकुल खेळात २०० सुवर्ण पदक जिंकणारा चौथ्या क्रमांकाचा देश कोणता बनला?
A. भारत
B. ऑस्ट्रेलिया
C. जपान
D. रुस
महत्वाचे मुद्दे
आता टॉप ३ देश देखील बघू या.
- ऑस्ट्रेलिया (१००३ सुवर्ण पदक)
- इंग्लंड ( ७७३ सुवर्ण पदक )
- कॅनडा ( ५१० सुवर्ण पदक )
20. राष्ट्रकुल खेळ भारतात कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आले होते?
A. २०२०
B. २०१६
C. २००६
D. २०१०
२०१० ला भारतात सर्वात प्रथम राष्ट्रकुल खेळ , दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते.
21. वर्ष २०१० , भारत आयोजित राष्ट्रकुल खेळाची कितवी आवृत्ती होती?
A. १९ वी
B. १८ वी
C. २० वी
D. २६ वी
22. २१ वे राष्ट्रकुल खेळ २०१८ कोठे आयोजित करण्यात आले होते?
A. गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया)
B. नवी दिल्ली (भारत)
C. लंडन (ब्रिटन)
D. शांघाई (चीन)
23. २३ वे राष्ट्रकुल खेळ २०२६ कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
A. पॅरिस ( फ्रांस )
B. व्हिक्टोरिया (ऑस्ट्रेलिया)
C. टोकियो ( जपान)
D. न्यूयॉर्क ( अमेरिका )
24. राष्ट्रकुल खेळात (CWG) सर्वप्रथम कोणी भारतासाठी सुवर्णपदक जिंकले?
A. मिल्खा सिंग
B. पी.व्ही.सिंधू
C. मीराबाई चानू
D. यापैकी कोणी नाही
मिल्खा सिंग जे एक धावपट्टू होते त्यांनी १९५८ मध्ये कार्डिफ (वेल्स) मध्ये सर्वप्रथम सुवर्णपदक जिंकले .
25. बर्मिंघम राष्ट्रकुल खेळ २०२२ मध्ये एकूण किती देशाने सहभाग घेतला होता.
A. ७२
B. ७५
C. ८०
D. ९२
महत्वाचे मुद्दे
- बर्मिंघम राष्ट्रकुल खेळ २०२२ एलेक्झांडर स्टेडियम इंग्लंड मध्ये खेळले गेले.
- बर्मिंघम राष्ट्रकुल खेळ २०२२ मध्ये एकूण २१३ भारतीय खेळाडूने सहभाग घेतला होता ज्या मध्ये १०७ पुरुष खेळाडू आणि १०६ महिला खेळाडू होत्या.
- सर्वात जास्त म्हणजे ३८ खेळाडू हे हरियाणा राज्यातून होते.
26. भारत देशाने खालील पैकी कोणत्या वर्षी राष्ट्रकुल खेळात सहभाग घेतला नाही?
A. १९३०
B. १९५०
C. १९६२
D. १९८६
E. वरील सर्व
27. राष्ट्रकुल खेळ कोणत्या वर्षी आयोजित केले गेले नाही?
A. १९४२
B. १९४६
C. १९७०
D. A आणि B
28. बर्मिंघम राष्ट्रकुल खेळ २०२२ मध्ये सहभाग घेणारी भारत देशाची सर्वात कमी वय असलेली (१४ वर्ष) व्यक्ती कोण आहे?
A. अनाहत सिंग
B. रजनी त्यागी
C. संजना शर्मा
D. यापैकी कोणी नाही
महत्वाचे मुद्दे:
- अनाहत सिंग स्क्वॅश खेळाची खेळाडू आहे.
- सर्वात जास्त वय असलेली व्यक्ती : सुनील बहादूर ( ४५ वय)
29. राष्ट्रकुल खेळ २०२२ मध्ये भारतासाठी सर्वात प्रथम पदक कोई जिंकले?
A. संकेत महादेव सरगर
B. अनाहत सिंग
C. सुनील बहादूर
D. यापैकी कोणी नाही
महत्वाचे मुद्दे:
- संकेत महादेव सरगर वेट लिफ्टिंग मध्ये भारतासाठी सर्वात पहिला पदक, रौप्य पदक जिंकले
30. राष्ट्रकुल खेळ २०२२ कोणत्या भारतीय खेळाडूं ने पहिल्यांदा उंच उडी मध्ये कास्य पदक जिंकून इतिहास रचला?
A. रोहित टोकस
B. सौरव घोषाल
C. त्रिशा जॉली
D. तेजस्वीन शंकर
तर विद्यार्थीमित्रांनो Commonwealth Games 2022 संबंधी या पलीकडचा प्रश्न विचारला जाणार नाही. त्यामुळे जर का तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे सर्व प्रश्न एकदा वाचून नक्की जा.
हे देखील वाचा