भगत सिंग यांची संपूर्ण माहिती | Biography of Shaheed Bhagat Singh in Marathi
Biography of Shaheed Bhagat Singh in Marathi: शहीद भगतसिंग भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रमुख क्रांतीकार्यां पैकी एक होते. फक्त २४ वर्षांचे असताना देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हे वीर कायमचे अमर झाले. त्यांच्यासाठी क्रांतीचा अर्थ होता – अन्यायामधून उत्पन्न झालेल्या परिस्थितीला बदलणे. भगतसिंग यांनी युरोपियन क्रांतिकारी आंदोलनाबद्दल वाचले आणि समाजवादाप्रती अत्यंत आकर्षित झाले. त्यांच्या मते ब्रिटिश सरकार उलथून टाकण्यासाठी आणि भारतीय समाजाची पुनर्रचना करण्यासाठी राजकीय सत्ता मिळवणे आवश्यक होते.
- पूर्ण नाव: शहीद भगतसिंग
- जन्म: 27 सप्टेंबर 1907
- जन्म स्थान: जारावाला तहसील, पंजाब
- पालक: सरदार किशन सिंह आणि विद्यावती कौर
- भाऊ – बहीण: रणवीर, कुलतार, राजिंदर, कुलबीर, जगत, प्रकाश कौर, अमर कौर, शकुंतला कौर
- मृत्यू: 23 मार्च 1931, लाहोर
- उपलब्धी: भारताच्या क्रांतिकारी आंदोलनाला एक नवीन दिशा दिली, पंजाब मध्ये क्रांतीचा संदेश पसरवण्यासाठी नवजवान भारत सभेची निर्मिती केली, भारतामध्ये प्रजासत्ताक स्थापना करण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत मिळून हिंदुस्तान समाजवादी प्रजातंत्र संघाची निर्मिती केली, लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पोलीस अधिकारी सोंडर्स ची हत्या केली, बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत मिळून केंद्रीय विधानसभेमध्ये बॉम्ब फेकला.
ब्रिटिश सरकारने भगत सिंग यांना आतंकवादी घोषित केले होते पण सरदार भगतसिंग हे वैयक्तिक रित्या आतंकवादावरती टीका करायचे. भगतसिंग यांनी भारतामध्ये क्रांतिकारी आंदोलनाला एक नवीन दिशा दिली. त्यांचे फक्त एकच लक्ष होते ते म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचा विनाश करणे. त्यांच्या दूरदृष्टी मुळेच आणि दृढ निश्चयामुळेच भगतसिंग हे राष्ट्रीय चळवळीतील इतर नेत्यांपेक्षा वेगळे होते. ज्या काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हेच एक पर्याय होते, तेव्हा भगतसिंग हे नव्या विचाराने दुसरा पर्याय म्हणून उदयास आले.
आरंभिक जीवन | Early Life of Shaheed Bhagat Singh in Marathi
भगतसिंग यांचा जन्म पंजाबच्या ल्यालपूर शहर जिल्ह्याच्या बंगा गावामध्ये (आताचे पाकिस्तान) एका सिख परिवारात 27 सप्टेंबर 1907 ला झाला होता. त्यांच्या आठवणीत आता या जिल्ह्याचे नाव बदलून शहीद भगतसिंग नगर ठेवले गेले आहे. ते सरदार किशन सिंग आणि विद्यावती यांचे तिसरे मूल होते. भगतसिंग यांचा परिवार स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रियपणे जुळलेला होता. त्यांचे वडील किशन सिंग आणि काका अजित सिंग गदर पार्टीचे सदस्य होते. गदर पार्टीची स्थापना ब्रिटिश सरकारला भारतामधून हाकलून लावण्याच्या हेतूने अमेरिकेमध्ये झाली होती.तरुण भगतसिंग यांच्या मनावर कौटुंबिक वातावरणाचा मोठा प्रभाव पडला आणि लहानपणापासूनच त्यांच्या अंगात देशभक्तीची भावना जागृत झाली.
1916 मध्ये लाहोरच्या डी ए वी विद्यालयामध्ये अभ्यास करत असताना युवा भगतसिंग प्रसिद्ध राजनेते जसे की लाला लाजपत राय आणि राज बिहारी बोस यांच्या संपर्कात आले. त्यावेळेस पंजाब राजकीय रूपात खूप प्रेरित होते. जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड झाला त्यावेळेस भगतसिंग फक्त 12 वर्षाचे होते. या हत्याकांडामुळे ते खूप अस्वस्थ झाले. या हत्याकांडाच्या दुसऱ्या दिवशी भगतसिंग जालियनवाला बाग मध्ये गेले आणि तेथून मूठ भर माती घेऊन ती माती पूर्ण आयुष्यभर स्वतःकडे एका निशाणीच्या रूपात ठेवली. इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्याचा संकल्प या हत्याकांडामुळे खूपच मजबूत झाले.
क्रांतिकारी जीवन | Revolutionary Life of Bhagat Singh in Marathi
1921 मध्ये जेव्हा महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकार विरोधात असहकार आंदोलनाचे आवाहन केले तेव्हा भगतसिंग हे आपले शिक्षण सोडून आंदोलनात सहभागी झाले. वर्ष 1922 मध्ये जेव्हा महात्मा गांधी यांनी गोरखपूरच्या चौरी चौरा मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर असहकार आंदोलन बंद केले तेव्हा भगतसिंग खूप नाराज झाले. अहिंसामध्ये त्यांचा विश्वास कमकुवत झाला आणि ते या निर्णयापर्यंत पोहोचले की, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांती हा एकमेव उपयुक्त मार्ग आहे. आपले शिक्षण चालू ठेवण्यासाठी भगतसिंग यांनी लाहोर मध्ये लाला लाजपत राय द्वारे स्थापित विद्यालयात प्रवेश घेतला. हे विद्यालय क्रांतिकारक कार्यांचे केंद्र होते आणि येथे भगतसिंग हे भगवती चरण वर्मा, सुखदेव आणि इतर क्रांतिकारकांच्या संपर्कात आले.
लग्न करायचे नव्हते म्हणून भगतसिंग घरातून पळून कानपूरला गेले. येथे ते गणेश शंकर विद्यार्थी नावाच्या क्रांतिकारकाच्या संपर्कात आले आणि क्रांतीचा पहिला धडा शिकले. जेव्हा त्यांना आपली आजी आजारी आहे ही बातमी कळाली तेव्हा भगतसिंग घरी परतले. त्यांनी गावांमधूनच आपले क्रांतिकारी उपक्रम चालू ठेवले. ते लाहोरला गेले आणि ‘नवजवान भारत सभा’ नावाने एक क्रांतिकारी संघटना बनवली. त्यांनी पंजाब मध्ये क्रांतीचा संदेश पसरवण्यास सुरुवात केली. वर्ष 1928 ला त्यांनी क्रांतिकारंच्या एका बैठकीत भाग घेतला आणि चंद्रशेखर आजाद यांच्या संपर्कात आले.या दोघांनी मिळून हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र संघाची स्थापना केली. याचा प्रमुख उद्देश होता की सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून भारतामध्ये प्रजासत्ताकाची स्थापना करणे.
फेब्रुवारी 1928 मध्ये इंग्लंड मधून सायमन कमिशन नावाचे एक आयोग भारत दौऱ्यावर आले. त्यांचा भारत दौऱ्याचा प्रमुख उद्देश होता- स्वायत्तता आणि राजेशाहीमध्ये भागीदारी. पण या आयोगामध्ये कोणतेच भारतीय सदस्य नव्हते ज्यामुळे सायमन कमिशनच्या विरोधाचा निर्णय घेतला गेला . लाहोरमध्ये सायमन कमिशनच्या विरोधात घोषणाबाजी करत असताना लाला लजपत राय यांच्यावर क्रूरपणे लाठीचार्ज करण्यात आला ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. भगतसिंग यांनी लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ब्रिटिश अधिकारी स्कॉट, जे त्यांच्या मृत्यूला जबाबदार होते, त्यांना मारायचा संकल्प घेतला.भगतसिंग यांनी चुकून सहाय्यक अधीक्षक सोंडर्सला स्कॉट समजून मारले.फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी भगतसिंग यांना लाहोर सोडावे लागले.
भारतीयांना हक्क आणि स्वातंत्र्य देण्याऐवजी आणि असंतोषाचे मूळ शोधण्याऐवजी, ब्रिटिश सरकारने अधिक दडपशाही धोरणे वापरली.भारताच्या संरक्षण कायद्याद्वारे ब्रिटिश सरकारने पोलिसांना अधिक दडपशाहीचे अधिकार दिले. या अंतर्गत पोलीस मिरवणूक थांबवू शकतात आणि संशयास्पद हालचालींशी संबंधित लोकांना अटक करू शकतात. केंद्रीय विधानसभेत मांडण्यात आलेला हा कायदा एका मताने पराभूत झाला.तरीही ब्रिटिश सरकारने तो अधिनियम जनहिताचे असल्याचे सांगत अध्यादेश म्हणून काढण्याचा निर्णय घेतला.भगतसिंग यांनी स्वेच्छेने केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकण्याची योजना आखली, जिथे अध्यादेश काढण्यासाठी बैठक होत होती. हा एक काळजीपूर्वक नियोजित कट होता ज्याचा उद्देश कोणालाही मारणे किंवा दुखापत करणे हा नव्हता तर सरकारचे लक्ष वेधून घेणे आणि त्यांच्या दडपशाहीच्या पद्धती यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत हे दाखवणे हा होता.
8 एप्रिल 1929 ला भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या इमारतीत बॉम्ब फेकला. बॉम्ब ने कुणाचेही नुकसान नाही झाले. घटनास्थळावरून पळून जाण्याऐवजी ते मुद्दाम अटक झाले. त्यांच्या खटल्यादरम्यान, भगतसिंग यांनी बचाव पक्षाच्या वकिलाची नियुक्ती करण्यास नकार दिला. तुरुंगात त्यांनी सहकारी राजकीय कैद्यांना तुरुंग प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अमानुष वागणुकीच्या निषेधार्थ उपोषण केले. 7 ऑक्टोबर 1930 रोजी भगतसिंग, सुख देव आणि राज गुरु यांना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. भारतातील सर्व राजकीय नेत्यांच्या प्रचंड दबाव आणि अनेक आवाहनांना न जुमानता, भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना 23 मार्च 1931 रोजी सकाळी फाशी देण्यात आली.
FAQ
प्रश्नः शहीद दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर: 24 मार्च
प्रश्नः भगतसिंगचा जन्म कधी झाला?
उत्तरः 27 सप्टेंबर 1907
प्रश्नः शहीद भगतसिंग कोण होते?
उत्तरः शहीद भगतसिंग हे क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक होते.
प्रश्नः शहीद भगतसिंग यांना किती भाऊ होते?
उत्तर: 5(कुलतार सिंह, कुलबीर सिंह, राजिंदर सिंह, जगत सिंह, रणबीर सिंह )
प्रश्नः भगतसिंग कधी मरण पावले ?
उत्तरः 23 मार्च 1931
प्रश्नः भगतसिंगच्या मृत्यूचे कारण काय होते?
उत्तरः फाशी
मृत्यू
भगत सिंग यांना 24 मार्च 1931 ला फाशी देण्यात येणार होती. परंतु देशातील लोक त्याच्या सुटकेसाठी आंदोलने करण्यास सुरवात केली. यामुळे ब्रिटीश सरकारला भीती वाटू लागली की भगत सिंगला सोडण्यात आले तर ते सरकारला जिवंत सोडणार नाहीत त्यामुळे २ March 1931 ला संध्याकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनीभगतसिंग आणि त्यांचे साथीदार सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली.