अर्थव्यवस्थेवर महत्त्वाचे GK प्रश्न आणि उत्तरे | Indian Economy Questions in Marathi
मागील १० वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूप च महत्वाचे वर्ष होती. भारताची अर्थव्यवस्था हि मिश्र अर्थव्यवस्था आहे, जी मूलतः जी कृषी आणि सेवा याद्वारे संचालित केली जाते. भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेपैकी ५०% योगदान हे सेवा आणि २०% योगदान हे कृषी आणि २८% योगदान हे उत्पादन क्षेत्राचे आहे. आजच्या या Indian Economy Questions in Marathi च्या लेखात आपण याच आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेसंबंधी MPSC परीक्षेला विचारले गेलेले महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत.
Indian Economy Questions in Marathi
Q. जागतिकीकरण म्हणजे काय ?
A. देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे
B. जगभर भ्रमण करणे
C. परदेशात वस्तू विकणे
D. जागतिक पातळीवर विचार करणे,
उत्तर: A. देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे
- आपली अर्थव्यवस्था इतर देशांशी जोडणे / खुली करणे म्हणजे जागतिकीकरण होय.
- भारताने 1991-92 मध्ये जागतिकीकरण सुरू केले.
Q. भागीदारी संस्थेत भागीदारांची जबाबदारी केवढी असते?
A. शून्य
B. मर्यादित
C. अमर्यादित
D. प्रमाणशीर
उत्तर: C. अमर्यादित
- भागीदारी संस्थेमध्ये मिळणाऱ्या नफ्यामध्ये भागीदाराचाही वाटा असतो त्यामुळे संस्थेची वाढ ही भागीदाराच्या वैयक्तिक नफ्यातील वाढ असते त्यामुळे भागीदारीची जबाबदारी अमर्यादित असते.
Q. अर्थसंकल्पातील जीडीपी म्हणजे खालीलपैकी काय?
A. सकल राष्ट्रीय उत्पादन
B. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न
C. राष्ट्राला व्याजापासून मिळालेले उत्पन्न
D. अर्थसंकल्पातील एकूण खर्च
स्पष्टीकरण: A. सकल राष्ट्रीय उत्पादन
- एका आर्थिक वर्षात देशाच्या हद्दीतील एकूण उत्पादनांची किंमत म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन होय. (GDP)
- GDP Full form – Gross Domestic Product
Q. अर्थव्यसस्थेत तृतीय क्षेत्र हे…….. क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.
A. कृषी
B. औद्योगिक
C. सेवा
D. खाणकाम
उत्तर: C. सेवा
अर्थव्यवस्थेची महत्त्वाची तीन क्षेत्रे खालीलप्रमाणे आहेत.
- प्राथमिक क्षेत्र – कृषी, खाणकाम, मत्स्योत्पादन, वनोत्पादन (निसर्गावर आधारीत)
- द्वितियक क्षेत्र – कारखाने, वस्तू, निर्मिती
- तृतियक क्षेत्र – (सेवा क्षेत्र) हॉटेल, बँकिंग, वैद्यकीय इ. सेवा.
Q. 101 ही घटना दुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
A. अबकारीकर
B. उत्पन्नकर
C. विक्रीकर
D. वस्तू व सेवाकर (अमरावती ग्रामीण पोलीस 2023, पुणे ग्रामीण पोलीस 2023, दौंड SRPF 2018)
उत्तर: D. वस्तू व सेवाकर
- वस्तू व सेवाकर कर यासाठी 101 वी घटनादुरुस्ती झाली.
- यासाठी 122 वे घटनादुरुस्ती विधेयक 2016 मांडले.
- 1 जुलै 2017 पासून भारतात GST कर प्रणाली लागू करण्यात आली.
- GST स्वीकारणारा फ्रान्स हा पहिला देश होता.
परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या
- 102 वी – मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा
- 103 वी – EWS आरक्षण (10%)
- 104 वी – SC & ST लोकसभा आणि विधानसभेतील जागांचे आरक्षण 10 वर्षे वाढवले.
- 105 वी – राज्य आणि केंद्र सरकारांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग ओळखण्याचा अधिकार.
- 106 वी – महिलांना लोकसभा व विधानसभेत 1/3 आरक्षण.
Q. एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून……. आकारला जातो.
A. GST
B. CGST
C. SGST
D. UTGST
उत्तर: B. CGST
- CGST एकाच राज्यातील व्यापारासाठी केंद्र सरकार कडून आकारला जातो.
- IGST – हे केंद्र सरकार कडून आकारला जातो व केंद्र व राज्यात वाटून घेतला जातो.
- UTGST हा केंद्रशासित प्रदेशातील सरकारकडून आकारला जातो.
- SGST हा राज्य सरकारकडून आकारला जातो.
- GST-Goods and Service Tax.
Q. 2004 साली GST हा कर कोणत्या समितीने सुचवला होता?
A. केळकर समिती
C. झा समिती
B. रंगनाथन समिती
D. तेंडुलकर समिती
उत्तर: A. केळकर समिती
- केळकर समिती – 2002 मध्ये स्थापना.
- या समितीने कर प्रणालीत बदल करण्याची शिफारस केली.
- GST हा कर सुचवला (VAT ऐवजी)
Q. GST चे पूर्ण रूप काय आहे?
A. Growth and Sales
B. Growth and Service Tax
C. Goods and Service Tax.
D. Goods and Sales Tax
उत्तर: C. Goods and Service Tax
- GST-Goods and Service Tax.
- VAT-Value Added Tax.
- IT-Income Tax
Q. खालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे?
A. केंद्रीय अबकारी कर
B. मूल्यवर्धित कर (VAT)
C. आयकर
D. सेवाकर
उत्तर: C. आयकर
- केंद्राचे प्रत्यक्ष कर आयकर, महामंडळ कर
- राज्याचे प्रत्यक्ष कर – व्यवसायकर, जमिन महसूल
- केंद्राचे अप्रत्यक्ष कर GST
- राज्याचे अप्रत्यक्ष कर – GST, VAT
Q. खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे ?
A. आयकर
B. शेतसारा
C. व्यवसाय कर
D. वाहनकर
उत्तर: A. आयकर
- देशातील आयकर पहिला कायदा 1860 साली संमत करण्यात आला.
- 24 जुलै 1860 पासून भारतात आयकर व्यवस्थेचा कार्यारंभ झाला.
- आयकर हा एक प्रत्यक्ष कर आहे.
Q. जीएसटी वस्तू व सेवा कर हा…… आहे.
A. प्रत्यक्ष कर
2)अप्रत्यक्ष कर
C. दोन्ही बरोबर
D. यापैकी नाही
उत्तर: B. अप्रत्यक्ष कर
- प्रत्यक्ष कर थेट जनतेकडून वसूल केला जातो तर अप्रत्यक्ष कर हा वेगवेगळ्या व्यक्तींवर पडत असतो.
- भारतातील प्रत्यक्ष कर प्राप्तिकर, महामंडळ कर, संपत्ती कर, देणगी कर
- अप्रत्यक्ष कर केंद्रीय अबकारी कर, जकात कर, व्यापारी कर, व्हॅट
Q. अप्रत्यक्ष करांचा भार कोणावर पडतो?
A. उत्पादक
B. विक्रेता
C. ग्राहक
D. शासन
उत्तर: C. ग्राहक
- अप्रत्यक्ष कराचा भार दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित करता येतो.
- अप्रत्यक्ष कर है वस्तूंवर लावले जातात व असे कर उत्पादक व विक्रेता ग्राहकांकडून वसूल करतात.
- प्रत्यक्ष कराच्या तुलनेत अप्रत्यक्ष कराचे प्रमाण अधिक असल्याने भाव वाढीस चालना मिळते.
Q. अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढवलेल्या कराला कोणती संज्ञा आहे?
A. सेस
B. अधिभार
C. मार्गदर्शक कर
D. टोल
उत्तर: B. अधिभार
- अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढवलेल्या कराला अधिभार म्हणतात.
- हा करावरील कर आहे, अधिभार हा नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पन्न होणाऱ्या महसूलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आकारला जाणारा थेट कर आहे.
Q. वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी ……… पासून सुरू झाली.
A. 1 जानेवारी 2017
B. 1 जून 2017
C. 1 एप्रिल 2017
D. 1 जुलै 2017
उत्तर: D. 1 जुलै 2017
- 101 व्या घटना दुरुस्तीनुसार भारतात GST कर पध्दती लागू करण्यात आली.
- भारतात 1 जुलै 2017 पासून GST कर प्रणाली लागू करण्यात आली.
Q. जीएसटी हक्क प्रणाली अंतर्गत विभिन्न वस्तु यांचे वर लागणारे कराचा दर कोण ठरवतात?
A. पंतप्रधान
C. केंद्र सरकार
B. राज्य सरकार
D. जीएसटी कौन्सिल
उत्तर: D. जीएसटी कौन्सिल
- जीएसटीचे दर ठरवण्यासाठी या कायद्यात जीएसटी कौन्सिलची तरतूद आहे.
- केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बनलेली GST परिषद, कर दर, नियम आणि कायदे ठरवण्याचे काम करते.
- GST परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असतात.
Q. जीएसटी (GST) मध्ये S कशासाठी आहे ?
A. वेतन
B. विक्री
C. सेवा
D. अंशदान
उत्तर: C. सेवा service
- जीएसटी Goods and services tax
- जीएसटी 1 जुलै 2017 ला 101 व्या घटना दुरुस्तीने सर्वत्र लागू केली.
MPSC Economics questions in Marathi
Q. पुढीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही?
A. आयकर
B. सेवा कर
C. महामंडळ कर
D. जमीन महसूल
उत्तर: B. सेवा कर
- प्रत्यक्ष कर म्हणजे असे कर ज्यांच्या बाबतीत कायदेशीरपणे ज्या व्यक्तीवर कर लादलेला असतो तीच व्यक्ती कर भरत असते.
- सेवा कराला घटनात्मक दर्जा 88 वी घटनादुरुस्ती कायदा 2003 नुसार देण्यात आला व घटनेत कलम 268 A हे समाविष्ट करण्यात आले होते. (सध्या GST मध्ये)
Q. 8 सप्टेंबर 2016 रोजी अंमलात आलेली 101 वी घटनादुरूस्ती कशाशी संबंधित आहे?
A. काळ्या पैशास प्रतिबंध
B. वस्तू व सेवा कर
C. जनधन खाते
D. नोटबंदी
उत्तर: B. वस्तू व सेवा कर
- 101 व्या घटनादुरूस्तीने GST कर पध्दती लागू करण्यात आली.
- बहुतेक सर्व अप्रत्यक्ष कर GST मध्ये समाविष्ट करण्यात आले.
- एक देश एक कर प्रणाली’ लागू करणे हा GST चा उद्देश होता. ‘
- या कराची शिफारस केळकर समितीने केली होती.
- फ्रान्स या देशात सर्वप्रथम हा कर लागू झाला.
- GST कराचे 4 टप्पे करण्यात आले आहेत.
Q. खालीलपैकी तीन कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरुपाचा आहे, तो कोणता ?
A. कस्टम ड्यूटी
C. अबकारी कर
B. विक्रीकर
D. उत्पन्न कर
उत्तर: D. उत्पन्न कर
- उत्पन्न कर (Income tax) हा प्रत्यक्ष कर आहे.
- हा कर केंद्र सरकार आकारते व वसूल करते.
- या कराचा वाटा केंद्र व राज्य सरकार यांच्यात विभागला जातो.
- 101 च्या घटना दुरुस्तीने GST कर लागू झाला.
- आधीचे सीमा शुल्क (Custom duty) विक्रीकर, सेवा कर, केंद्रीय अबकारी कर है GST मध्ये समाविष्ट करण्यात आले.
Q. “GST” हा खालीलपैकी कोणता कर आहे?
A. कृषी उत्पन
B. उत्पन्न
C. वस्तू व सेवा
D. गुंतवणूक उत्पन्न
उत्तर: C. वस्तू व सेवा
- GST हा अप्रत्यक्ष कर आहे.
- वार्षिक 40 लाखपिक्षा जास्त उलाढाल असलेल्यांना हा कर लागू होतो.
- GST करप्रणालीचे 4 टप्पे 5%, 12%, 18%, 28%
- कृषी क्षेत्रावर GST आकारला जात नाही.
- सोन्यावर GST दर 3% आहे.
- पिण्याची दारु, पेट्रोल यांच्यावर अजून GST लागू नाही.
Q. रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत?
A. सरकारचे वित्तीय थोरण
B. आयात निर्यात
C. रिझर्व्ह बँकेचे पतथोरण
D. सार्वजनिक कर्ज
उत्तर: C. रिझर्व्ह बँकेचे पतधोरण
- रेपो रेट हा एक असा दर असतो ज्यावर बँकांना RBI कडून कर्ज दिले जातो.
- रिर्व्हर्स रेपोरेट हा असा दर आहे ज्यात RBI ला बाजारातील पैसा कमी करायचा असतो, म्हणून RBI बँकांकडून कर्ज घेते.
Q. ……….बँकेचे राष्ट्रीयीकरण होऊन तिचे रूपांतर ‘भारतीय स्टेट बँकेत’ झाले.
A. युनायटेड बैंक
C. रॉयल बैंक
B. इम्पिरियल बैंक
D. युनियन बँक
उत्तर: B. इम्पिरियल बैंक
- 1951 साली स्थापन केलेल्या गोरवाला समितीच्या शिफारसीच्या अधारे इंम्पेरियल बँकेचे स्टेट बैंक ऑफ इंडियामध्ये रूपांतर करण्यात आले.
- गोरवाला समितीची स्थापना ग्रामीण भागातील पतहमी चे मोजमाप करण्यासाठी केली होती.
- SBI चे राष्ट्रीयीकरण – 1955
Q. देशातील पहिले डिजिटल बैंकिंग राज्य कोणते बनले आहे?
A. केरळ
B. तमिळनाडू
C. महाराष्ट्र
D. कर्नाटक
उत्तर: A. केरळ
- Digital Banking राज्य- केरळ
- Digital Banking जिल्हा त्रिशुर, केरळने यापासून प्रेरणा घेऊन संपूर्ण राज्य Digital केले गेले.
- याशिवाय केरळ राज्याने K-FON केरळ फाइबर ऑप्टिकल नेटवर्क परियोजना सुरू केली
Q. भारतीय रूपयाचे चलन चिन्ह (Currency Symbol) हे कोणी डिझाईन केले आहे?
A. रघुराम राजन
B. उदय कुमार
C. उमेश कुमार
D. स्वामीनाथन
उत्तर: B. उदय कुमार
- उदय कुमार यांनी रूपयाच्या चलनाचे डिझाईन केले.
- रुपयाचे चिन्ह-₹ (2010)
Q. ब्लूमबर्ग अहवालानुसार (2024)….. ही भारतीय बँक जगातील सर्वात मौल्यवान बँकापैकी एक ठरली आहे.
A. SBI
B. RBI
C. YES BANK
D. HDFC
उत्तर: D. HDFC
- HDFC मुख्यालय मुंबई, भांडवलानुसार ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे.
- 1977 ला स्थापन केली होती.
- HDFC-Housing Development Finance Corporation
- SBI सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक
Q. RBI च्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती?
A. रेपो दर
B. बँक दर
C. वरील दोन्ही
D. दोन्हीही नाहीत
उत्तर: C. वरील दोन्ही
- RBI ची पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने
- RBI आपले पतधोरण वर्षातून 6 वेळा जाहीर करते. (दर 2 महिन्याला)
Q. नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे?
A. दिल्ली
B. मुंबई
C. सुरत
D. पुणे
उत्तर: B. मुंबई
- 1982 मध्ये मुंबई येथे शिवरामन समितीच्या शिफारशीवरून नाबार्डची स्थापना झाली.
- NABARD कृषी व ग्रामीण भागाला पतपुरवठा करते.
- मुंबई येथे मुख्यालय असणाऱ्या बँका RBI, SBI, NABARD, अॅक्सिस बैंक, HDFC, बँक ऑफ इंडिया
Q. 14 बँकाचे राष्ट्रीयीकरण …… या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले.
A. पहिल्या
B. दुसऱ्या
C. तिसन्या
D. चौथ्या
उत्तर: D. चौथ्या
- चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1966 ते 1971
- 50 कोटी रूपयांपेक्षा अधिक ठेवी असणान्या 14 बँकाचे राष्ट्रीयीकरण 1969 साली करण्यात आले.
- 200 कोटीपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण 1980 साली करण्यात आले.
Q. 1 रूपयाच्या नोटांवर कोणाची सही असते ?
A. RBI गव्हर्नर
B. वित्त सचिव
C. वित्तमंत्री
D. पंतप्रधान
उत्तर: B. वित्त सचिव
- 1 रूपयाच्या नोटेवर वित्त सचिवाची सही असते, इतर नोटांवर RBI गव्हर्नरची सही असते.
- RBI सर्व नोटा छापते आणि चलनात आणते.
- नवे केंद्र सरकार तयार करतात व चलनात RBI आणते.
Q. आरबीआयचे (RBI) शक्तिकांत दास कितवे गव्हर्नर होते?
A. 23
B. 24
C. 25
D. 26
उत्तर: C. 25 वे
- शक्तिकांत दास हे RBI चे 25 वे गव्हनर आहेत.
- 24 वे गव्हर्नर श्री. उर्जित पटेल होते.
- 26 वे व सध्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा
Q. रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवितो?
A. स्टेट बँक ऑफ इंडिया
B. ट्रेझरी बँक
C. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
D. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
उत्तर: C. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
- RBI ची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी 1934 च्या कायद्याने झाली.
- सध्याचा रेपो रेट 4% आणि रिव्हर्स रेपो रेट 3.35% आहे.
Q. रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती?
A. हिल्टन यंग कमिशन
B. अर्थ मंत्रालय
C. रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स
D. C. D देशमुख समिती
उत्तर: A. हिल्टन यंग कमिशन
- रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे.
- RBI चे मुख्यालय मुंबई येथे आहे.
- RBI चे रचना व कार्यपद्धती इंग्लंडची मध्यवर्ती बँक – बैंक ऑफ इंग्लंडच्या धर्तीवर आधारित आहे.
Q. रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच ?
A. SLR
B. CRR
C. REPO
D. OMD
उत्तर: B. CRR(Cash Reserve Ratio)
- CRR हा व्यापारी बँकांनी RBI कडे ठेवायचा किमान निधी आहे.
- साधारणपणे हा दर 3 ते 4 टक्के असतो
Also Read,