12 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 12 January 2023 Current Affairs in Marathi
मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आज काल सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व वाढले आहे, हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या वेबसाइटवर आपल्या सर्वांना Daily Current Affairs in Marathi करायला सुरवात केली आहे.
1. जगातील तिसरे सर्वात मोठे ऑटो मार्केट कोणत्या देशाचे बनले आहे?
उत्तर: भारत
2. कोणते राज्य हे देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य बनले आहे?
उत्तर: केरळ
देशातील पहिल्या गोष्टी आणि घटना
- देशातील पहिले डिजिटल पत्त्यांसह स्मार्ट सिटी शहर – इंदोर
- भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्लांट – आसाम
- देशातील पहिली पोर्टेबल सोलर रुफ टॉप प्रणाली – गांधीनगर
- भारतातील पहिला स्टील रोड – गुजरात
- व्हॅक्यूम आधारित गटार प्रणाली असलेले पहिले शहर – आग्रा
- कार्बन न्यूट्रल शेती पद्धती सादर करणारे पहिले राज्य – केरळ
- पहिल्या शासकीय इंग्रजी माध्यम महाविद्यालय – त्रिपुरा
- भारतातील पहिल्या अमृत सरोवर चे उद्घाटन पटवाई, रामपूर, उत्तर प्रदेश
- भारतातील पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव – मोढेरा
- देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य – केरळ
3. G20 देशांची पहिली शिक्षण कार्यगटाची बैठक कोणत्या शहरात होणार आहे?
उत्तर: चेन्नई
G 20 बैठकी विषयी माहिती
- पहिली आरोग्य कार्य गटाची बैठक – तिरुवनंतपुरम
- पहिली शिक्षण कार्य गटाची बैठक – चेन्नई
- पहिली एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुप मीटिंग – जोधपूर
- पहिली एनर्जी वर्किंग ग्रुप मीटिंग – बेंगलोर
- पहिली पर्यावरण आणि हवामान कार्य गटाची बैठक – कच्छ चे रन
- पहिली कृषी कार्य गटाची बैठक – इंदोर
- पहिली संस्कृती कार्य गटाची बैठक + खजुराहो, मध्यप्रदेश
4. दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो?
उत्तर: 11 ते 17 जानेवारी
5. राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?
उत्तर: 11 जानेवारी
6. ऑस्कर पुरस्कार 2023 साठी द काश्मीर फाईल्स सह किती भारतीय चित्रपट पहिल्या यादीत शोर्टलिस्ट केले आहेत?
उत्तर: 5
इतर चित्रपट कांतारा, आर आर आर , गंगुबाई काठियावाडी, छेल्लो शो ऑस्कर 2023 साठी देखील निवडण्यात आले आहेत.
महत्वाचे पुरस्कार
- आयुष्मान उत्कृष्ठ पुरस्कार 2022 – उत्तर प्रदेश
- मरणोत्तर कर्नाटक रत्न पुरस्कार – पूनित राजकुमार
- पुरुषांचा बलोन डी ओर 2022 – रियल माद्रिद चा करीम बेंझेमा
- महिलांचा बॅलोन डी ओर 2022 – बार्सिलोना ची अलेक्सीया पुटेलास
- सर सय्यद उत्कृष्ठता पुरस्कार 2022 – अमेरिकन इतिहासकार बार्बरा मेटकाल्फ
- बुकर पुरस्कार 2022 – श्रीलंकेचा शेहान करुणातीलका
- आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2022 – गीतांजली श्री
- वर्ल्ड ग्रीन सिटी पुरस्कार 2022 – हैद्राबाद
- सुलतान जोहर कप 2022 – भारत
- फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार – अरुणा साईराम
- कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार – के सिवन
7. खालीलपैकी कोणत्या महिला पंचांनी रणजी मध्ये पदार्पण केले आहे?
उत्तर: वृंदा राठी, जननी नारायणन, गायत्री वेणू गोपालन
- रणजी ट्रॉफी मध्ये पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत.
8. 15 जानेवारी ल बेंगळुरू मध्ये कितवा लष्कर दिवस साजरा करण्यात येणार आहे?
उत्तर: 75 वा
- राष्ट्रीय राजधानीच्या बाहेर पहिल्यांदाच हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
- 15 जानेवारी रोजी सायंकाळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे असतील.
- इंडीयन आर्मी – भारतीय सैन्य
- कमांडर इन चीफ – भारताचे राष्ट्रपती
- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) – लेफ्टनंट जनरल अनिल चौहान
- सेना प्रमुख – जनरल मनोज पांडे
- सैन्य कर्मचारी (उप प्रमुख) – लेफ्टनंट जनरल बी एस राजू
9. परशुराम कुंड महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केलेला आहे?
उत्तर: अरुणाचल प्रदेश
10. मागासलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे?
उत्तर: Aspirational Block Programme
11. भारताने कोणत्या देशासोबत यंग प्रोफेशनल्स योजनेसाठी स्वाक्षरी केली आहे?
उत्तर: ब्रिटन
12. स्टेडियम ला पेलेचे नाव देणारा पहिला आफ्रिकन देश कोणता देश ठरला?
उत्तर: Cape Verde
ब्राझिलियन व्यावसायिक फुटबॉल पटू (पेले)
जन्म – 23 ऑक्टोबर 1940
मृत्यू – 29 डिसेंबर 2022
13. मेटा ग्रुप इंडिया ने कोणाची ग्लोबल बिझनेस संचालक म्हणून नियुक्ती केली आहे?
उत्तर: विकास पुरोहित
नोट: मित्रांनो तुमच्या काही शंका किव्हा suggestions असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
हे देखील वाचा:
1 thought on “12 जानेवारी 2023 चालू घडामोडी | 12 January 2023 Current Affairs in Marathi”