222+ Easy GK Question in Marathi with Answers 2024
Easy GK Question in Marathi with Answers: विद्यार्थीमित्रांनो सामान्य ज्ञान नियमित वाचल्याने तुम्ही जिज्ञासू बनू शकता. General Knowledge हा शिक्षणाचा एक महत्वाचा भाग आहे. GK मुले फक्त लहान मुलांना ज्ञानच भेटत नाही तर त्यांना जगात काय चालू आहे याची देखील माहिती मिळते. कमी वयात आवश्यक ज्ञान प्राप्त केल्याने मुलांच्या मेंदूचे संगोपन सुद्धा चांगले होते. एका अध्ययनातून असे देखील लक्षात आले आहे कि ज्या मुलांचे सामान्य ज्ञान चांगले असते ती मुले अभ्यासात खूप चांगली असतात. म्हणूनच आजच्या या लेखात तुमच्या साठी मी काही महत्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे.
Easy gk questions in Marathi with answers
Q. चिखलदरा (जि. अमरावती) हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे?
उत्तर – सातपुडा
Q. चिखलदराचा उंची किती आहे?
उत्तर – 1188 मीटर
Q. शिवाजीसागर म्हणून कोणत्या धरणाला ओळखले जाते?
उत्तर – कोयना धरण
Q. नृसिंहवाडी हे शहर कोणत्या दोन नद्यांच्या संगमावर वसले आहे?
उत्तर – पंचगंगा व कृष्णा
Q. नृसिंहवाडीला कोणती राजधानी म्हणून ओळखले जाते?
उत्तर – दत्तप्रभूची (ता. शिरोळ जि. कोल्हापूर)
Q. यशवंतसागर या नावाने कोणत्या जलाशयाला ओळखले जाते?
उत्तर – उजनी प्रकल्प
Q. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तर – भीमा (माढा तालुका, जि. सातारा)
Q. महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के भाग व्यापला आहे.
उत्तर – 75%
Q. मार्लेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – रत्नागिरी (नदी बाव)
Q. ठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – सातारा (नदी तराली)
Q. सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – बीड (नदी विंचरणा)
Q. रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – अहमदनगर (नदी प्रवरा)
Q. पवना विद्युत प्रकल्प कुठे आहे?
उत्तर – पुणे (नदी – पवना)
Q. तिलारी विद्युत प्रकल्प कुठे आहे?
उत्तर – कोल्हापूर (नदी-खरानी जल्लाह, स्थापना 1986)
Q. भातसा विद्युत प्रकल्प महाराष्ट्रात कुठे आहे?
उत्तर – ठाणे (नदी भातसा)
GK questions with Answers in Marathi hard
Q. येलदरी विद्युत प्रकल्प महाराष्ट्रात कुठे आहे?
उत्तर – परभणी (नदी पूर्णा)
Q. आगपेट्याच्या काड्या बनविण्यासाठी कोणत्या झाडाच्या लाकडाचा उपयोग होतो?
उत्तर – पॉपलर
Q. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पालां युरेनियम पुरविणारी कंपनी कोणती आहे?
उत्तर – अरेवा फ्रेंच (फ्रान्स)
Q. सिंधुदुर्ग येथील रेडी बंदरातून जपानला कोणत्या धातूची निर्यात होते.
उत्तर – लोहखनिज
Q. आर्कियन खडकांत कोणते खनिज आढळते.
उत्तर – लोहखनिज
Q. कोळसा उत्पादनाच्या निगडीत खोरे कुठे आहे?
उत्तर – वर्धा
Q. मँगनिज खनिजाचे जास्त प्रमाणात साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत.
उत्तर – नागपूर व गोंदिया
Q. कोणत्या जिल्ह्यात खनिजसंपत्ती विपूल आहे.
उत्तर – चंद्रपूर
Q. कोणत्या जिल्ह्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प बंद करण्यात आले आहे.
उत्तर – चोला (ठाणे)
Q. कोणत्या जलविद्युत प्रकल्पास आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते.
उत्तर – कोयना
Q. महाराष्ट्रात कोणत्या मृदेचे प्रमाण कमी आहे.
उत्तर – जांभी
Q. महाराष्ट्राच्या एकूण तीन चतुर्थांश भागात कोणती मृदा आढळते.
उत्तर – रेगूर मृदा (कापूस उत्पादनासाठी महत्त्वाची)
Q. NH – 13 हा कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे.
उत्तर – सोलापूर – विजापूर – हुबळी
Q. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल कोणत्या ठिकाणी आहे.
उत्तर – पानवळ (रत्नागिरी)
Q. भारतातील रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल कोणता.
उत्तर – चेनाब (जम्मू काश्मीर)
Q. कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी ट्रॉय ट्रेनने जाता येते.
उत्तर – माथेरान
GK Questions With Answers in Marathi
Q. कोकण रेल्वेमार्गाची एकूण लांबी किती आहे ?
उत्तर – 741 कि.मी. (स्थापना 26 जानेवारी 1998)
Q. कोकण रेल्वेमार्गाची महाराष्ट्रातील लांबी किती कि.मी. आहे?
उत्तर – 382 कि.मी.
Q. कोकण रेल्वे हा कोणत्या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे.
उत्तर – मुंबई व मंगळूर
Q. बुटीबोरी येथील पंचतारांकित औद्यौगिक वसाहत कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर – नागपूर
Q. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरूवात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाली.
उत्तर – यशवंतराव चव्हाण
Q. स्वतंत्र विदर्भाची मागणी प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यावरून केली जात आहे.
उत्तर – आर्थिक व विकास
Q. जिजामाता यांचे जन्मगाव कोणते.
उत्तर – सिंदखेड (बुलढाणा)
Q. गृहनिर्माणासाठी कोणते महामंडळ काम करते.
उत्तर – म्हाडा
Q. जैव तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर – नागपूर
Q. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापना व ठिकाण कोणते.
उत्तर – स्थापना 1990, ठिकाण जळगाव, बदललेले नाव बहिणाबाई चौधरी विद्यापीठ
Q. राज्यातील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम कितव्या क्रमांकाचे आहे.
उत्तर – प्रथम
Q. सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते.
उत्तर – कोंढाणा (पुणे)
Q. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणाच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती.
उत्तर – बेळगाव
Q. नेवासा येथे कोणत्या दोन नद्यांचा संयुक्त प्रवाह गोदावरीस मिळतो.
उत्तर – मूळा व प्रवरा
Q. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जनतेला समजण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी राज्यात कोणते दैनिक सुरू केले
उत्तर – दैनिक मराठा
Q. अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला.
उत्तर – 3 फेब्रुवारी 1974
Q. धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे.
उत्तर – आंबा
Q. जामखंडे हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे.
उत्तर – चाळकेवाडी
Q. खंबाटकी घाट कोणत्या मार्गावार आहे.
उत्तर – पुणे – सातारा
Easy Maharashtra gk question in Marathi
Q. अंबा घाट कोणत्या मार्गावर आहे.
उत्तर – कोल्हापूर – रत्नागिरी
Q. अंबोली घाट कोणत्या मार्गावर आहे.
उत्तर – सावंतवाडी- बेळगाव
Q. कुंभार्ली घाट कोणत्या मार्गावर आहे.
उत्तर – कराड – चिपळूण
Q. शेकरू या राज्यप्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे.
उत्तर – राटुफा इंडिका
Q. वसंतसागर हे कोणत्या धरणाचे नाव आहे
उत्तर – चांदोली धरण
Q. कोळश्यांच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते?
उत्तर – वैनगंगा आणि वर्धा खोरे
Q. मालवण, वेंगुर्ला आणि गोव्याकडे जाण्यासाठी कोणते घाट महत्त्वपूर्ण आहे.
उत्तर – फोंडा व आंबोली
Q. 30 सप्टेंबर 1993 रोजी नोंद झालेल्या लातुर भूकंपाची तिव्रता किती होती.
उत्तर – 6.3 रिश्टर स्केल
Q. कुस्तीशी संबंधीत महत्त्वपूर्ण स्पर्धा कोणती.
उत्तर – महाराष्ट्र केसरी
Q. भारतातील संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू कोण आहे.
उत्तर -पंतप्रधान
Q. आंतरराज्यीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात.
उत्तर -पंतप्रधान
Q. 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते.
उत्तर – इंदिरा गांधी
Q. पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या.
उत्तर – राजकुमारी अमृता कौर
Q. भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते.
उत्तर – संसदेच्या दोन्ही गृहांची
Q. संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला काय म्हणून संबोधतात.
उत्तर – प्रश्नांचा तास
Q. ‘अखिल भारतीय सेवा’ ची तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केली आहे.
उत्तर – कलम 312
Q. राज्याचे वरिष्ठ सभागृह कोणते असते.
उत्तर – विधान परिषद
Q. घटक राज्याचा आकस्मित निधी कोणाच्या अखत्यारित असतो.
उत्तर – राज्यपाल
GK questions in Marathi with answers
Q. राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण आहे.
उत्तर – डॉ. राधाकृष्णन
Q. राज्याचा अर्थमंत्री हा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात.
उत्तर -राज्यपाल
Q. आणीबाणीची संकल्पना स्वीकारताना कोणत्या देशाच्या राज्यघटनेचे अनुकरण केले आहे.
उत्तर – जर्मनी (वायमर प्रजासत्ताक)
Q. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मुलभूत हक्कांचे संरक्षक कोण आहेत.
उत्तर – सर्वोच्च न्यायालय
Q. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात.
उत्तर – माजी सरन्यायाधीश
Q. भारतीय राज्यघटनेतील कलम 371 कशाशी संबंधित आहे.
उत्तर – काही राज्यांना विशेष दर्जा
Q. लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात.
उत्तर – 15 सदस्य
Q. पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या कोणत्या सूचीमध्ये येतात.
उत्तर – राज्य सूची
Q. भारतीय घटनेचा अर्थ लावताना घटनेतील कोणता भाग आधारभूत व महत्त्वाचा ठरतो.
उत्तर – घटनेचा सरनामा
Q. भारताचा संविधानात्मक प्रमुख कोण असतो.
उत्तर – राष्ट्रपती
Q. एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे निश्चित कोण करते.
उत्तर – लोकसभा
Q. माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या वर्षात निर्गमित करण्यात आला.
उत्तर – 2005
Q. नियंत्रक व महालेखापाल यांची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते.
उत्तर – राष्ट्रपती
Q. बक्सारची लढाई कधी झाली?
उत्तर – 22 ऑक्टोबर 1764
Q. आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर – राजा राममोहन रॉय
Q. ‘रामकृष्ण मिशन’ या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली?
उत्तर – स्वामी विवेकानंद
Q. चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा …….शी संबंधित होता.
उत्तर – नीळ
Q. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?
उत्तर – 19 फेब्रुवारी 1630
Q. मुस्लिम लीग ची स्थापना कोठे झाली?
उत्तर – ढाका
Q. ऋगवेद, अरण्यके, त्रिपिटक, ऐने अकबरी यापैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे?
उत्तर – त्रिपिटक
Q. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे?
उत्तर – रॅली कमिशन
Q. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते?
उत्तर – बॉम्बे हेराल्ड
Q. ‘आर्य महिला समाज’ स्त्री-सुधारणा करिता ……ह्यांनी स्थापना केली.
उत्तर – पंडिता रमाबाई
Q. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर – गोपाल कृष्ण गोखले
Q. चौरी-चौरा घटनेने …… हे आंदोलन संपुष्टात आले.
उत्तर – असहकार
Q. पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
उत्तर – संत गाडगेबाबा
Easy general knowledge questions in Marathi
Q. महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म कधी झाला?
उत्तर – 11 एप्रिल 1827
Q. दुसरी गोलमेज परिषद ……….साली भरली.
उत्तर – 1931
Q. ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले?
उत्तर – रामसिंग
Q. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला?
उत्तर – तोरणा
Q. पुण्याजवळ हिंगणे येथे ‘अनाथ बालिकाश्रम’ कोणी सुरू केला?
उत्तर – महर्षी कर्वे
Q. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटीश गव्हर्नर जनरल कोण?
उत्तर – लॉर्ड विल्यम बेंटीक
Q. ‘ऑपरेशन पोलो’ हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले होते?
उत्तर – हैद्राबाद
Q. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरु केली?
उत्तर – लॉर्ड वेलस्ली
Q. स्वातंत्रवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली?
उत्तर – अभिनव भारत
Q. ‘मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते?
उत्तर – सेनापती बापट
Q. हु वेअर द शुद्राज’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर – डॉ. आंबेडकर
Q. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर कोण?
उत्तर – महात्मा फुले
Q. महात्मा ज्योतीबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती?
उत्तर – सत्यशोधक समाज
Q. ‘मुंबई कामगार संघा’ ची स्थापना कोणी केली ?
उत्तर – नारायण लोखंडे
Q. सतीबंदी कायदा कधी पास झाला होता?
उत्तर – 1829
Q. राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?
उत्तर – लोक कल्याण
Q. भारतीय लष्कराने …….. रोजी गोवा पोर्तुगिजाच्या ताब्यातुन मुक्त केला.
उत्तर – 19 डिसेंबर 1961
Q. लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?
उत्तर – केसरी
Q. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?
उत्तर – आचार्य विनोबा भावे
Q. शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे?
उत्तर – बाजीराव पेशवे
Q. दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती?
उत्तर – हम्पी
Q. “The Rises of the Maratha Power’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
उत्तर – न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे
Q. इ.स. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली?
उत्तर – लॉर्ड डलहौसी
Q. ‘पॉव्हर्टी अॅन्ड अनब्रिटीश रूल इन इंडीया’ हा ग्रंथ कोणी लिहीला?
उत्तर – दादाभाई नौरोजी
Q. भारत सेवक समाजाची स्थापना ……यांनी केली.
उत्तर – गो. कृ. गोखले
Q. पंडीत श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडीया हाऊस ही संस्था………. या ठिकाणी स्थापन केली.
उत्तर – लंडन
Q. सेवा सदन पुणे ही संस्था कोणी स्थापन केली?
उत्तर – रमाबाई रानडे
Q. हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना……. यांनी केली.
उत्तर – स्वामी रामानंद तीर्थ
Q. गौतम बुध्द आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करीत असत?
उत्तर – पाली
Q. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली?
उत्तर – 1897
Easy general knowledge questions and answers in Marathi
Q. पुणे करार कोणामध्ये झाला?
उत्तर – गांधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Q. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असे कोणास म्हणतात?
उत्तर – लोकमान्य टिळक
Q. ‘सत्यमेव जयते’ हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले?
उत्तर – पंडित मदन मोहन मालवीय
Q. पहिल्या महायुद्धाचे तत्कालीक कारण कोणते?
उत्तर – ऑस्ट्रियाचा राजपुत्र आर्च ड्युक फर्डिनांड याची झालेली हत्या
Q. हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे?
उत्तर – कालीबंगन
Q. कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती?
उत्तर – महात्मा फुले
Q. आद्यक्रांतिकारक ‘वासुदेव बळवंत फडके’ यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते?
उत्तर – सार्वजनिक काका
Q. 3 मे, 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या………. पक्षाची स्थापना केली.
उत्तर – फॉरवर्ड ब्लॉक
Q. ‘मुस्लीम लीग’ या संघटनेचे संस्थापक कोण होते?
उत्तर – नवाब सलिमुल्ला
Q. भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई व बक्सारची लढाई या लढाया अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या?
उत्तर – 1757 आणि 1764
Q. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
उत्तर – कर्मवीर भाऊराव पाटील
Q. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?
उत्तर – 24 सप्टेंबर 1873
Q. ‘आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाचे अग्रदूत’ या शब्दात कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो?
उत्तर – राजा राममोहन रॉय
Q. नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते?
उत्तर – गोंड राजा बक्त बुलंद शाह
Q. चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – सिंधुदूर्ग
Q. केळी संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – जळगांव
Q. ….. हे क्रांतीकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे.
उत्तर – चिंचवड
Q. कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगाना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखतात ?
उत्तर – नंदुरबार
Q. ‘फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात…… येथे आहे.
उत्तर – पुणे
Q. अजिंक्यतारा’ हा प्रसिध्द किल्ला ……येथे आहे.
उत्तर – सातारा
Q. महाराष्ट्रात ……. ह्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात.
उत्तर – चंद्रपूर
Q. मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी ‘तानसा व वैतरणा’ (मोडकसागर) ही जलाशये कोणत्या जिल्ह्यातं आहेत.
उत्तर – ठाणे
Q. ‘चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – अमरावती
Q. अंतूर किल्ला …….जिल्ह्यात आहे.
उत्तर – छ. संभाजीनगर
Q. पूर्णा, कुंडलिका, सुखना, भीमा यापैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही?
उत्तर – भिमा
Q. नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे?
उत्तर – गोदिया – गडचिरोली
Q. नॅशनल एड्स रिसर्च इनिटटयूट, इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी, कृत्रीम अवयव केंद्र, इन्स्टिटयुट ऑफ रिसर्च इर्न रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ यापैकी कुठली वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी संस्था पुण्यात नाही?
उत्तर – इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरीज
Q. रत्नागिरी जिल्ह्याचा सागर किनारा किती कि.मी. लांब आहे?
उत्तर – 237
Q. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि. का. राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली?
उत्तर – 7 जुलै 1910
Q. पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?
उत्तर – जॉन चेसन
Q. महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर – सोलापूर
Q. महाबळेश्वर जवळील भिलार हे…… चे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
उत्तर – पुस्तकांचे
Q. मिहान प्रकल्प महाराष्ट्रात कुठे आहे?
उत्तर – नागपूर
Q. सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो?
उत्तर – नृसिंहपूर
Q. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे ?
उत्तर – पुणे
Q. एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नाशिक
Q. तारापूर पॉवर प्लैंटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते?
उत्तर – अणुऊर्जा
Q. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?
उत्तर – सिंधुदुर्ग
Q. आलापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिध्द आहे?
उत्तर – सागवान
Q. औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्हयात आहे?
उत्तर – सांगली
Q. औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – कोल्हापूर
Q. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कोणत्या शहरात स्थित आहे?
उत्तर – पुणे
Q. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते?
उत्तर – गोंदिया
Q. रायगड जिल्ह्यातून कोणता महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो?
उत्तर – NH66
Q. पुणे जिल्हयातील ….. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे.
उत्तर – इंदापूर
Q. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीणची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील घडली होती. तालुक्यात
उत्तर – आंबेगाव
Q. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र ………तालुक्यात आहे.
उत्तर – जुन्नर
Q. Μ.Ι.Α., Α.Ι.Τ.Ρ., N.I.V., N.E.E.R.I यापैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही?
उत्तर – Ν.Ε.E.R.I
Q. वासोटा, अलंग, कोरिगड, रांगणा यापैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे?
उत्तर – कोरिगड
Q. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तर – वेळवंडी
Q. जळगाव जिल्हयामध्ये एकूण किती तालुके आहेत ?
उत्तर – 15
Q. नंदुरबार जिल्हयातील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे?
उत्तर – 69.28%
Q. नंदूरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता नंदूरबार व तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
उत्तर – 1 एप्रिल 1977
Q. तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असून त्त्याची समुद्रसपाटीपासून उंची किती मीटर आहे?
उत्तर – 1155
Q. सन 2011 च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती?
उत्तर – 978
Q. नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात कोणता घाट येतो?
उत्तर – चरणमाळ
Q. जगप्रसिध्द कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली?
उत्तर – राष्ट्रकूट
Q. एशियाटीक सोसायटी, ससून वाचनालय, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, पेटीट वाचनालय यापैकी मुंबईतील सर्वांत जुने वाचनालय कोणते आहे?
उत्तर – एशियाटीक सोसायटी
Q. हरिशचंद्रगड व रतनगड ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर – अहमदनगर
Q. भंडारदरा व रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात?
उत्तर – अहमदनगर
Q. भगवान गड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर – पाथर्डी
Q. अमरावती जिल्ह्यात एकुण …… तालुक्यांचा समावेश होतो.
उत्तर -14
Q. अमरावती जिल्ह्यातील हे …… ठिकाण महानुभाव पंथाची काशी म्हणून प्रसिध्द आहे?
उत्तर -रिध्दपूर
Q. अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा यापैकी कोणत्या जिल्हयाची सीमा अमरावती जिल्ह्याला लागत नाही ?
उत्तर – चंद्रपूर
Q. मुदखेड, दरकेशा, गरमसूर, गाविलगड यापैकी कोणत्या डोंगर रांगा अमरावती जिल्ह्यातून जातात?
उत्तर – गाविलगड
Q. पाचाड येथे कोणाची समाधी आहे?
उत्तर – राजमाता जिजाबाई
मित्रांनो Easy GK Question in Marathi with Answers या लेखात मी इतिहास, भूगोल आणि भारताच्या राज्यघटने संबंधी अतिशय महत्वाचे प्रश्न संग्रहित करायचा प्रयन्त केला आहे. तुम्हाला वरील प्रश्नांमध्ये काही शंका असतील तर तुम्ही कंमेंट द्वारे अथवा gkinmarathi@gmail.com या ई-मेल द्वारे मला संपर्क करून शकता.
हे देखील वाचा